अतृप्त ठेवणारा झपाटलेला २
एखाद्या चमचमीत खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये जावे… आणि जेवणाच्या अपेक्षेने आलेल्या खवैयांना हॉटेल मालकाने केवळ उत्कृष्ट स्टार्टर देवून बोळवण करावी अशी काहीशी झपाटलेला २ ची गत आहे. खरं तर आधीच्या सिनेमाची (झपाटलेला ) पुण्याई आणि तात्या विंचू सारखा ब्रांड हाताशी असूनही महेश कोठारेंनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला जाणवत नाही. सिनेमाचे कथानक असे- वीस वर्षांपूर्वी इन्स्पे. महेश जाधव यांनी खात्मा केलेला तात्या विंचू हा बहुला एका संग्रहालयातून चोरी होतो.