Submitted by शांत on 15 April, 2013 - 02:16
बघून जरा आश्चर्य वाटले ….
ह्या विषयावर विषयावर आपल्या मायबोलीवर कशी चर्चा नाहीये ते …
१) ८५ हजार विसा साठी ह्यावेळी १२४ हजार अप्लिकेशन्स
२) २००८ नंतर प्रथम "लॉटरी"
३) सर्वात विशेष म्हणजे USCIS ने ह्यावेळी अजूनही बरेच details दिले नहित… जसे की २०K साठी एकूण किती अप्लिकेशन्स आले आणि ६५ K साठी किती …
तर मित्रानो काय चालू आहे ह्यावेळी … इथेही काही राजकारण (I square act)???
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
अजुन थोडं डिटेल लिहा ...काही
अजुन थोडं डिटेल लिहा ...काही टोटल लागत नाहीये
इथेही काही राजकारण अर्थातच.
इथेही काही राजकारण
अर्थातच. कुठेहि राजकारण असतेच, नि राजकारणाच्या मुळाशी पैसा असतो.
सध्या अमेरिकेत अवैध मार्गांनी १ कोटी हून जास्त मेक्सिकन व दक्षिण अमेरिकेतले लोक आले आहेत, ते अत्यंत स्वस्त दरात संडास साफ करतात, कुठेहि दसपट कमी किंमतीत काम करतात. अगदी आमच्या च्या देवळात डोसे, वडे वगैरे करणारे पण मेक्सिकन.
तर ते अवैध असल्याने टॅक्स भरत नाहीत, पण त्यांनी येऊ नये असे कुणालाच वाटत नाही, कारण अमेरिकन पगार परवडत नाहीत, नि तसली कामे करायला अमेरिकनहि तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांना W व्हिसा द्यावा या प्रश्नावर जोरात चर्चा चालू आहे.
त्यामानाने भारतीय इथे येऊन आपल्या नोकर्या घेतात याबद्दल इथल्या लोकांना रागच आहे. मग त्यांचा विचार कोण करणार?
बाकी भारतीय लोक ज्या कामांसाठी इथे येतात, ती कामे खरे तर इथले अमेरिकनहि करू शकतात. खरे तर भारतीयांना काँप्युटर म्हणजे काय हे माहित होण्यापूर्वीच इथल्या लोकांनी भरपूर प्रगति केली होती. खरे तर आय टी मधील, डेटा बेस, युनिक्स, नेटवर्किंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, जर्मनीतले सॅप, व तसल्या अनेक सिस्टिम्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड इ. सर्व सर्व प्रकार भारतीय इथे येण्यापूर्वी होतेच. विशेषतः कमी लोक वापरून अत्यंत उत्तम काम, लवकर कसे करता येईल, यावरहि पुष्कळ सुधारणा झाली होती .
मध्यंतरी जागतिकीकरण झाले. नि भारतानेहि जागतिकीकरण, खाजगीकरण नि लिबेरलायझेशन केल्यावर अमेरिकेला भारतातली प्रचंड बाजारपेठ मोकळी झाली. नि भारतीय अत्यंत हुषार, कामसू, नि उच्च प्रतीचे काम करतात, इतर कुठल्याहि देशांतल्या लोकांपेक्षा प्रचंड स्वस्तात. मग त्यांचे स्वस्तात काम करणारे लोक इथे आणले तर इथल्या कंपन्यांचे फायदे वाढतीलच. नि भारतालाहि आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधि मिळाली.
पण स्वस्तामधे संडास कोण साफ करणार, शेतीमधे दिवसभर काम करून एक तासाच्या पगारात कोण करणार? हलकी कामे जास्त स्वस्तात कोण करणार? हे इथल्या लोकांना सध्यातरी जास्त महत्वाचे आहे.
सध्याच्या जागतिक अर्थपरिस्थितीत नवी प्रॉजेक्ट्स करण्यासाठी कोण पैसे गुंतवणार? बरे असेहि नाही की भारतीय इथे येणे बंद करतील. कारण अजूनहि स्वतःच्या देशात जास्त प्रगति करावी यापेक्षा परदेशात राहून तिथे काम करावे ही भारतीयांची वृत्ति आहेच नि ती बदलते आहे याची चिन्हे नाहीत.
मग भारतीयांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार?
हे असे मला इथे बसून दिसते.
मी या क्षेत्रात अनेक वर्षे काम केले, खरे तर इंटरनॅशनल सिस्टीम्स डेवलोपमेंट चा मॅनेजर म्हणून. पण मी अमेरिकेतला, माझे मित्र अमेरिकन, मला काय कळणार?
भारतीयांना अर्थातच अमेरिकेबद्दल जास्त माहिती असते. खरे तर सगळ्या गोष्टींची जास्त माहिती असते, निदान तसे ते सांगतात तरी.
पण मी आपले मला काय दिसते ते सांगितले.