शाळेत इ.९ वीत असताना मला एक मुलगी मनापासून आवडायची, सहाजिकच तिच्या माग मागे फिरण व इतर ज्या गोष्टी करता येण्यासारख्या होत्या त्या मी करायचो जस कि माझा वर्ग सोडून तिचे लेक्चर अटेंड करणे खिडकीतून कटाक्ष टाकणे इ. पण तिच्याशी बोलायचे धाडस झाले नव्हते.
एकदा आमचा आणि तिचा पीटी तास एकत्र आला, मी एकटाच माझ्या वर्गात बसलो होते सर्व मुले ग्राऊंडवर खेळायला गेली एवढ्यात ती अचानक माझ्या वर्गात आली , वर्गामध्ये आम्ही दोघेच होतो माझी खर तर टरकली,
त्यात माझे टपोरी मित्र बाहेरुन सगळा कार्यक्रम बघत होते त्यांनी माझ्या वर्गाचे दार बाहेरुन लावून घेतले आणि दरवाजाबाहेर रखवालदार ठेवावा असा एकजण ठेवला (डू नॉट डिस्ट्र्र्ब साठी) जवळपास अर्धा तास आम्ही वर्गात होतो . मला तर घाम फूटला होता काय बोलाव काही कळत नव्हत शेवटी मी मित्रांच्या वतीन माफी मागितली ,
तिनेही स्मित करुन जाउदे म्हटल.त्पण तो प्रसंग अजूनही अचानकच आठवतो आणि मनात् गुदगुल्या होतात.
शाळा चांदोबा गुरुजींची ( शाळेतल्या गमती जमती)
Submitted by किरण कुमार on 13 May, 2013 - 03:25
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
(No subject)
आपल्या शाळेच्या आठवणी
आपल्या शाळेच्या आठवणी लिहीव्या ही सर्व मित्रांकडून अपेक्षा
मी शाळेत अभ्यास
मी शाळेत अभ्यास केला......................(माझी आठवण)
लिहिते जरा वेळाने.
लिहिते जरा वेळाने.
मी पण शाळेत अभ्यास केला...
मी पण शाळेत अभ्यास केला... लिखाण खुप असायच आमच्या शाळेत... खुप ओरडायचे सगळे 'किती वह्या भरतेस' म्हणुन पण तेवढीच मज्जाही केलीये...बाकी वेळ मिळाला की लिहिते
शाळेत अभ्यास केला ही काय गंमत
शाळेत अभ्यास केला ही काय गंमत आहे का तो तर प्रत्येकाला करावा लागतोच त्याशिवाय का आपण चौथी पास झालो आहे.
मी तर पहिल्या बेन्च वर बसुन
मी तर पहिल्या बेन्च वर बसुन बॅक बेन्चर करत नसतील इतक्या गम्मती केल्या आहेत...
जसे- सरांच्या ब्याग मधे कागदाचे बोळे टाकणे..
टेबलावरचे खडु पळवणे...
आवडत नसलेला तास बुडवून ग्राऊंड वर खेळत बसणे.. आणी मग पकडले गेल्यावर खाल्लेला मार..
खुप आठवणी आहेत... .बाकी वेळ मिळाला की लिहितो.
मी आणि माझी बहीण मागिल बाकावर
मी आणि माझी बहीण मागिल बाकावर बसुन मस्ती करायचो
मी इयत्ता ६,७,८ मॉनिटर होते
मी इयत्ता ६,७,८ मॉनिटर होते माझ्या वर्गाची.... मग काय .. आमचेच राज्य.. तेव्हा शाळेत एक पदधत होती.. बाई वर्गात नसतील तर सगळ्यांनी शांत अभ्यास करायचा.. बोलणार्या मुलींची.. दंगा करणार्या मुलीची नाव फळ्यावर लिहायची...मग काय माझ्या नावडत्या मुलींची नाव त्यांनी तोंडाचा आ जरी वासला तरी मी लगेच लिहायचे...आगाऊपणा
बर मग शाळेच्या खेळांच्या टीम तयार करताना पण आमचाच पुढाकार.. डान्स कुठला बसवायचा... वोटींग घेण्याचे काम माझ्याकडेच...इतिहासाच्या तासाला उत्तर देण्याआधी माझ्या आधी कोणी हात वर केला की माझा जळफळाट.... व्वा...काय दिवस होते.... लिहेन आठवेल तस
माझ्या आयुष्यातला हीही एक
माझ्या आयुष्यातला हीही एक किस्सा -
माझी शाळा ही खेडेगावातली होती, तिथे व्हेडीओ (व्ही सी आर) वर चित्रपट पाहण्याची त्या काळी (साधारण ९४-९५) क्रेझ होती, आमच्या इयत्तेतील सर्व तुकड्याच्या विद्याथ्यांना चित्रपट (शैक्षणिक / माहितीपट) दाखवावा अस एका शिक्षकाला वाटल आणि त्यांनी सर्व विद्यार्थांना माझ्याकडे प्रत्येकी २ रुपये याप्रमाणे पैसे गोळा करण्यास सांगितले एकूण ३ तुकड्यातले मिळून १०७ मुलांपैकी काही मुलांनी माझ्याकडे पैसे जमा केले.
माझ्याकडे एकूण ११० रुपये जमा झाले होते, त्यानंतर जवळपास २ ते ३ आठवडे झाले तरी चित्रपटाचे प्लॅनिंग झाले नव्हते, एक दिवस अचानक शालेत जाता जाता मला पेरुवाला दिसला आणि पेरु खाउ वाटल माझ्याकडे स्वतंचे पैसे नव्हते पण बाकिच्या मुलांचे होते मग काय खर्च केला १ रुपया, खर तर ही फक्त सुरवात होती मी मग निर्लज्जासारखा भेळ चॉकलेट बॉब्या (पोंग्या) यावर पैसे उडवू लागलो या काळात मास्तर नेहमी विचारचे पैसे आहेत ना ?
मी म्हणायचो आहेत अजून गोळा होताहेत उरलेल्यामुलांचे.
माझ्या खर्चाला नंतर सुंबार राहिला नाही शेवटी फक्त १४ रुपये शिल्लक राहिले ,मला आता शाळेत जायचीपण भिती वाटू लागली होती ,बरीच मुले विचारायची कधी येणार पिच्चर ?
मी म्हणायचो अजून वेळ आहे.
एक दिवस मला अस कळल कि त्या मास्तरची बदली झाली आहे आणि ते जाणार आहेत मग काय ते जाईपर्येंत वाट बघितली आणि सगळ्या मुलांना सांगितल कि मी पैसे मास्तरांकडे जमा केले होते.
अशा त-हेने माझे जवळपास ९६ रुपये (पचले) , ही गोष्ट जर घरी किंवा शाळेत कळली असती तर मी नक्कीच सुजलो असतो.
:):
माझी शाळा कल्याणची सुप्रसिद्ध
माझी शाळा कल्याणची सुप्रसिद्ध ओक हायस्कूल. ही शाळा कल्याणच्या जुन्या भागात आहे. टिपीकल शहरी शाळा. जवळ चाळी, अपार्टमेंटस् इत्यादी. शेजारच्या इमारतींमधून बोलण्याचे, टी.व्ही.चे आवाज काही वर्गात स्पष्ट ऐकू येत.
मी सातवीत होते. दुपारची शाळा. शाळेत अत्यंत कडक, मारकुटे म्हणून प्रसिद्ध असलेले शिक्षक विज्ञानाचा तास घेत होते. वर्गात पूर्ण शांतता. त्या दिवशी भारत आणि इंग्लंडची क्रिकेट मॅच चालू होती. शेजारच्या घरात टी.व्ही. चालू होता. एक महत्त्वाची विकेट गेली. वर्गातल्या एकदम अभ्यासू, खडूस मुलगी अचानक जोरात ‘आउट!!’ अस ओरडली! त्या मॅडमच लक्ष शेजारच्या टी.व्ही.कडे होत! क्षणभर कोणाला काहीच कळल नाही. त्या सरांच्या तासाला आम्ही बोलायलाही घाबरायचो, तिथे हा प्रकार? त्यातून ह्या मुलीकडून?
खरा प्रकार लक्षात आल्यावर आम्ही हसून हसून वर्ग डोक्यावर घेतला. कधी न हसणाऱ्या सरांनाही हसू आवरल नाही. इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्या मुलीचा विषय निघाला की पाठोपाठ हा किस्सा येतोच!
मी ४ थीत असताना मास्तरांनी
मी ४ थीत असताना मास्तरांनी इंग्रजीतून संभाषण पाठ करुन घेतले आणि स्टेजवर बोलायला सांगितले,
स्टेजवर गेल्यावर माझ पहिल वाक्य मी अस म्हणालो.
हॅलो वैभव - व्हाट इज युवर नेम
सगळे खो खो हसायला लागले
:):