सौ. लतिका पडळकर, एक माजी प्रशासकीय अधिकारी. तामिळनाडू राज्यात अनेक प्रशासकीय पदे यांनी सांभाळली. अतिशय पारदर्शी अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. इंग्रजी साहित्याची अतोनात आवड आणि प्रचंड वाचन, कलासक्त, अंगभूत हुशारी आणि दुसर्याला समजून घेण्याची हातोटी असणारे, असे हे त्यांचे अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व!
अमेरिकेला आल्यावर व्हिसा, घरच्या जबाबदार्या अशा कारणांनी अनेक स्त्रियांना नोकरी करणे शक्य होत नाही. बर्याच स्त्रिया स्वतःहून मुलांसाठी आपली नोकरी बाजूला ठेवतात. एकदा मुलं शाळेला जायला लागली की मग पुन्हा नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या कालावधी नंतर सुरुवात करणे फार कठिण जाते. डिग्री जुनी झालेली असते. स्किल सेट सध्याच्या जॉब मार्केटपेक्षा मागे पडलेला असतो. अशावेळी बरेचदा नवीन क्षेत्रात शिक्षण घेणे किंवा आपल्या डिग्रीला पूरक शिक्षण घेणे हे दोन पर्याय शिल्लक राहतात. योग्य माहिती असल्यास / मि़ळवल्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास अमेरीकेत शिक्षण घेणे सोपे आहे.
मी गेली ४.५ वर्ष "Manual Software Testing" मधे काम करते. (PLM). बाळ झाल्यावर मी नोकरी सोड्ली आहे.
आता पुन्हा नोकरी करायची आहे. वर लिहिल्याप्रमाणे या बदलासाठी खालील मुद्द्यांचा विचार मी केला आहे.
१. IT मधील नोकरीचा आता कंटाळा आहे. (कामाच्या वेळा, येणारा ताण या गोष्टी लक्षात घेता)
२. तुलनेने अड्मिन मधे काम कमी असेल. उदा: कमी वेळ, डेडलाईनची फारशी चिंता नसावी असा अंदाज, ऑफिसमधून वेळेत घरी जाता येइल.
टीपः इथे या क्षेत्रातील लोकांना कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा उद्देश नाही. मला माहिती हवी आहे.
३. पगार थोडा कमी मिळेल, पण घराकडे लक्ष देता येईल.
कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.
आयुष्यात एक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःची वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही!
काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला. त्यातील ''सुपरवूमन सिंड्रोम'' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. मग जालावर थोडी शोधाशोध केल्यावर या विषयाशी संबंधित पुष्कळ लेख मिळाले. बरीच अभ्यासपूर्ण माहिती वाचनात आली. उपयुक्त वाटली. त्याच माहितीचा सारांश येथे देत आहे.
बायका लिहा-वाचायला शिकू लागल्या, घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्या, स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या.... पण त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?
नमस्कार्..मला थोडी माहिती हवी आहे.
लग्न, मुलगी, अमेरिकेत येणे अशा अनेक कारणांमुळे माझ्या जॉब मधे चांगलीच गॅप पडली आहे. आणि आता EAD मिळाल्यामुळे पुन्हा सुरुवात करायची आहे. तर मला असे प्रश्न आहेत,
१. ही गॅप कव्हर लेटर मधे एक्स्प्लेन करावी की नाही?केल्यास कशी?
२. कव्हर लेटर लिहिण्यास मदत करणार्या साईट्स सुचवू शकेल का कोणी?
धन्यवाद..
कांदा कैरीचा कुस्करा असा एक चविष्ट प्रकार मी जस्ट खाऊन संपवला आहे.
तुम्हा सर्वांना जळवण्यासाठी खाली फोटू टाकीत आहे.
आज (म्हणजे १२ वाजून गेलेत म्हणून) होळी.
होळी पेटल्याशिवाय थंडी संपत नाही. पण तरीही मी 'कैरी' घालून केलेली पाकृ खाल्ली हे तुम्हा सग्ळ्यांना जळवण्यासाठी इब्लिसपणे पोस्ट करतो आहे:
वरील फोटू मधे कांदा, कैरी व कोथिंबीर चिरून ठेवलेली दिसत आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रोफेशनल नेटवर्किंग करणं बर्याचदा आवश्यक होऊन बसतं. तुमच्या नोकरी - व्यवसायातल्या समस्या, प्रश्न यावर उपाय शोधण्याचं ते एक माध्यम बनतं. मग ते ऑनलाईन असो वा ऑफलाईन. मायबोलीवर 'मराठी उद्योजक' गृप अशाच जाणीवेतून सुरु झाला.
तुम्हाला हे खरंच आवश्यक वाटतं का? त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला? तुम्ही तुमचे 'कॉन्टॅक्ट्स' कसे बनवता, सांभाळता, वाढवता? एकमेकांच्या मदतीने नवीन नेटवर्किंगचे तंत्र आणि मंत्र शिकूया.
सध्या ब-याच संस्थळांवर बरेच जण बरंच काही लिहीत आहेत. बरेच हा शब्द मागे पडून बहुतेक हा शब्द देखील मागे पडतोय आणि जवळजवळ सर्वच असा नवाच शब्दप्रयोग रूढ होऊ पाहतोय. पूर्वी कसं मोजकेच लोक लिहायचे. इतरांना त्यांचं अप्रूप असायचं. ते देवलोकातून आले असावेत असं लोकांना वाटायचं. काही जण तर त्यांना हात लावून पहात असत. आता मात्र सगळेच लिहू लागल्याने लिहीणे म्हणजे विशेष काय ते असं वाटू लागलं आहे. उलट जे कुणी लिहीत नाहीत त्यांच्याबद्दल हल्ली अप्रूप वाटतं. न लिहीता हा मनुष्य कसा काय राहू शकतो असं वाटून लोक त्यांना हात लावून पाहताना दिसतात.