आईला शाळेत जायचंय : अमेरिका (संयुक्ता मातृदिन २०१२)
Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 May, 2012 - 11:13
अमेरिकेला आल्यावर व्हिसा, घरच्या जबाबदार्या अशा कारणांनी अनेक स्त्रियांना नोकरी करणे शक्य होत नाही. बर्याच स्त्रिया स्वतःहून मुलांसाठी आपली नोकरी बाजूला ठेवतात. एकदा मुलं शाळेला जायला लागली की मग पुन्हा नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या कालावधी नंतर सुरुवात करणे फार कठिण जाते. डिग्री जुनी झालेली असते. स्किल सेट सध्याच्या जॉब मार्केटपेक्षा मागे पडलेला असतो. अशावेळी बरेचदा नवीन क्षेत्रात शिक्षण घेणे किंवा आपल्या डिग्रीला पूरक शिक्षण घेणे हे दोन पर्याय शिल्लक राहतात. योग्य माहिती असल्यास / मि़ळवल्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास अमेरीकेत शिक्षण घेणे सोपे आहे.
विषय: