टेस्टिंग मधील नोकरी सोडून administration मधे नोकरी पत्करावी का?

Submitted by धनश्री गानु on 3 May, 2012 - 01:27

मी गेली ४.५ वर्ष "Manual Software Testing" मधे काम करते. (PLM). बाळ झाल्यावर मी नोकरी सोड्ली आहे.
आता पुन्हा नोकरी करायची आहे. वर लिहिल्याप्रमाणे या बदलासाठी खालील मुद्द्यांचा विचार मी केला आहे.
१. IT मधील नोकरीचा आता कंटाळा आहे. (कामाच्या वेळा, येणारा ताण या गोष्टी लक्षात घेता)
२. तुलनेने अड्मिन मधे काम कमी असेल. उदा: कमी वेळ, डेडलाईनची फारशी चिंता नसावी असा अंदाज, ऑफिसमधून वेळेत घरी जाता येइल.
टीपः इथे या क्षेत्रातील लोकांना कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा उद्देश नाही. मला माहिती हवी आहे.
३. पगार थोडा कमी मिळेल, पण घराकडे लक्ष देता येईल.
४. तसंच माझ्या घरातल्या लोकांच्या मते ८-१० तास काम करायचेच आहे तर टेस्टिंगच का नाही. पैसे पण चांगले मिळ्तील.

वरील मुद्दे चुकीचे देखील असू शकतात. अ‍ॅडमिन मधे काम करणारे जाणकार काही प्रकाश टाकू शकतील का?
मला मार्गदर्शन हवे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयटी कंपनीत टेस्टिंगमध्ये किंवा इतर स्वरूपाचे 'पार्ट टाईम' काम मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. भारतात अजूनही बहुसंख्य जॉब्ज 'फुल टाईम' जॉब्ज असतात. आयबीएम व इन्फोसिसमध्ये मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगचे काम चालते. तिथे अ‍ॅप्लाय करून पहा.

तुम्ही जिथे राहता त्या विभागात टेस्टींगचे काही कोर्स मिळु शकतात का पहा. काही ऑटोमेशन टुल्स (सेलेनियम) शिकलात तर जास्त मार्केटेबल व्हाल. बर्‍याच इंस्टिट्युट्सचा कंपन्यांशी टाय अप असतो. त्याने मदत होइल.

पुण्यात 'सीड' ट्रेनिंग इन्स्टिट्युटमध्ये ऑटोमेशन टेस्टिंग किंवा परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट टेस्टिंगचा एखादा कोर्स करता येईल. त्यांच्याकडून प्लेसमेंट सुद्धा होऊ शकते.

धनश्री,
तुम्ही सध्या करत असलेल्या कंपनीत बोलुन पाहीलेत का? कदाचित तिथेच तुम्हाला कमी वेळ काम करण्याचा ऑप्शन उपलब्ध होऊ शकेल. तुम्ही विचारलेत आणि कंपनी पॉलिसीमधे बसत नसेल तर फार फार तर नकार येईल. पण विचारल्याशिवाय कळणार नाही.
तुम्हाला शुभेच्छा.

.

मला ६ वर्षाँचा manual testing चा अनुभव आहे. २.५ वर्षाँच्या ब्रेक नंतर परत नोकरी शोधतेय. पुण्यात कुठे ओपनिँग्ज असतील तर सांगा प्लिज.

Sad ब्रेकमुळे येतोय प्रॉब्लेम की मार्केटच डाउन आहे काही कल्पना? २०१३ मधे इंफि सिनेक्रॉन बीएमसी चे बल्क लेऑफ ऐकलेत या बातम्या खर्या आहेत का?

ब्रेकमुळे पण प्रॉब्लेम आहे. पण ओवरऑलच स्लोडाउन आहे. प्रयत्न करत रहाण्याशिवाय आपल्या हातात काही नाही.

तुलनेने अड्मिन मधे काम कमी असेल. उदा: कमी वेळ, डेडलाईनची फारशी चिंता नसावी असा अंदाज, ऑफिसमधून वेळेत घरी जाता येइल.
>>
ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ऑन द अदर साईड Happy

अ‍ॅडमिनमधल्यांना डेडलाईनच नसतात. त्यांची सगळीच कामं 'आत्ताच्या आत्ता' प्रकारची असतात.

पगार थोडा कमी मिळेल,>>> हे तर अजिबातच खरं नाही.

मंजूडी प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अजून विस्तृत माहिती देशील का? विपु केलीस तरी चालेल. मला संधी मिळेल का? म्ह्णजे माझे शिक्षण विचारात घेता.

मी हेच लिहायला आले होते.
मी स्वतः अ‍ॅडमिन मध्ये (मोठ्या आयटी कंपनीत) ५ वर्ष काम केले आहे. भरपूर प्रेशर असते.
पैसा हा क्रायटेरिया नसेलच तर घराजवळच एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ४-५ तासाचा जॉब पहा.
किंवा आवडीच्या क्षेत्रात पहा.
वर कुणितरी सल्ला दिला आहे त्याप्रमाणे या कंपनीतही कमी वेळ काम करण्याची मुभा मिळू शकते का ते पहा.

दक्षा +१. आवडीचे किंवा कंफर्टेबल/सोयिस्कर किंवा या सगळ्याच प्रकारात बसणारा Happy ऑप्शन पहा.

पुर्वा कदम,
तुम्ही नक्की कुठल्या प्रकारचा कोर्स ५००० भरून केला? व कुठल्या क्षेत्रात आहत जेणेकरून घरून काम करून देवू शाक्ता?

मला एकाला मदत करायचीय.... कृपया तुमच्या ह्या कामाविषयी लिहाल का विस्त्रुत?

<आवडीचे किंवा कंफर्टेबल/सोयिस्कर किंवा या सगळ्याच प्रकारात बसणारा स्मित ऑप्शन पहा.> असा ऑप्शन तर मिळेल का? Happy Wink गोंधळलेली आहे मी सध्या. Happy

कागदावर लिहून काढ गं सगळे ऑप्शन्स. आवडीच्या ऑप्शनला पॉइंट्स दे. का आवडीचे हेही थोडक्यात लिही. नावडत्या ऑप्शन्ला मायनस पॉइंट. का नावडते/गैरसोयीचे तेही लिही.

धनश्री ताइ.....सध्दया नोकरी सोडणे ठेवू नका असं मला वाटतं.....(टेस्टिंग मधील नोकरी सोडून administration मधे नोकरी पत्करावी का?)......फार तर फार त्याच company मधे department बदलण्यासाठी काही प्रयत्न करता येतो का ते पहा....पण ताण सगळीकडेच आहे...आणि टेस्टर चा पगार admin मधे मिळेलच याची खात्री नाही....

नाना माझ्यामते सेम कंपनीत वेगळ्या डिपार्टमेंट मध्ये संधी मिळाली (हॉरिझाँटल जम्प) तरिही पगार सेम राहतो.

टेस्टिंग सोडून त्याच कंपनीमध्ये क्वालिटी मध्ये शिफ्ट नाही का होता येणार?

Pages