नोकरीत बदल

टेस्टिंग मधील नोकरी सोडून administration मधे नोकरी पत्करावी का?

Submitted by धनश्री गानु on 3 May, 2012 - 01:27

मी गेली ४.५ वर्ष "Manual Software Testing" मधे काम करते. (PLM). बाळ झाल्यावर मी नोकरी सोड्ली आहे.
आता पुन्हा नोकरी करायची आहे. वर लिहिल्याप्रमाणे या बदलासाठी खालील मुद्द्यांचा विचार मी केला आहे.
१. IT मधील नोकरीचा आता कंटाळा आहे. (कामाच्या वेळा, येणारा ताण या गोष्टी लक्षात घेता)
२. तुलनेने अड्मिन मधे काम कमी असेल. उदा: कमी वेळ, डेडलाईनची फारशी चिंता नसावी असा अंदाज, ऑफिसमधून वेळेत घरी जाता येइल.
टीपः इथे या क्षेत्रातील लोकांना कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा उद्देश नाही. मला माहिती हवी आहे.
३. पगार थोडा कमी मिळेल, पण घराकडे लक्ष देता येईल.

Subscribe to RSS - नोकरीत बदल