प्रोफेशनल नेटवर्किंग-एक गरज

Submitted by आशूडी on 10 February, 2012 - 04:57

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रोफेशनल नेटवर्किंग करणं बर्‍याचदा आवश्यक होऊन बसतं. तुमच्या नोकरी - व्यवसायातल्या समस्या, प्रश्न यावर उपाय शोधण्याचं ते एक माध्यम बनतं. मग ते ऑनलाईन असो वा ऑफलाईन. मायबोलीवर 'मराठी उद्योजक' गृप अशाच जाणीवेतून सुरु झाला.
तुम्हाला हे खरंच आवश्यक वाटतं का? त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला? तुम्ही तुमचे 'कॉन्टॅक्ट्स' कसे बनवता, सांभाळता, वाढवता? एकमेकांच्या मदतीने नवीन नेटवर्किंगचे तंत्र आणि मंत्र शिकूया. Happy
इथे लिहा तुमच्या प्रोफेशनल नेटवर्किंगचे अनुभव, युक्त्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आयटी क्षेत्रात आहे.
नोकरी अथवा व्यवसाय करताना प्रोफेशनल नेटवर्किंग करणे महत्वाचे वाटते.पण नेटवर्किंगचा इथे- या क्षेत्रात- सामान्यपणे अर्थ 'ऑनलाईन नेटवर्किंग' असा घेतला जातो तो तितकासा बरोबर वाटत नाही. ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष भेटी, फोनवर बोलणे हे मी जास्त वापरते. फेसबुक, लिंक्डइन यात मला रस नाही आणि सुदैवाने अजून तरी माझे त्याशिवाय काही अडले नाही. (ते स्टेटस मेसेज, फोटो अल्बम, स्क्रॅपबुक इ इ प्रकरणे ऑरकुटपासूनच डोक्यात गेली असल्याने मी फार लांब पळाले त्यापासून.)

मी फार अ‍ॅक्टिव्हली नेटवर्किंग करत नाही. मला उगाच ढीगभर मित्रमैत्रीणी करुन प्रत्येकाशी जुजबी बोलण्यापेक्षा मोजकेच ठेवून त्यांच्याशी जास्त काळ संपर्क ठेवायला आवडतं. मी न आवडणार्‍या लोकांशी 'प्रोफेशनल नेटवर्किंग' साठीही संपर्क ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याने उगाच खोटेखोटे वागण्याबोलण्याचा ताप वाचतो. मुळात 'प्रोफेशनल नेटवर्किंग' असं मुद्दाम करावं लागत नाही इथे. तुमचे नव्या जुन्या कंपनीतील मित्र मैत्रिणी, त्यांच्याशी होणार्‍या गप्पा, नवे अपडेट्स हेच असतं 'प्रोफेशनल नेटवर्किंग' माझ्यासाठी.
ऑफिसबाहेरचे शंभर लोकांशी तुमचं नेटवर्क असेल पण तुमच्या टीममध्ये काय चालू आहे हे माहीत नसेल तर उपयोग नाही. त्यामुळे आपण ऑफिसमध्ये रोज ज्यांना भेटतो त्यांच्याशी ट्यूनिंग जुळवून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यानं तुमच्याच प्रोजेक्टमधे, कंपनीमधे काय घडामोडी चालू आहेत ते समजतं. नुसत्या चहाच्या वेळच्या गप्पांतूनही हे सहज जमतं. टीमसोबत एकत्र लंच, चहा हे सोपे मार्ग आहेत एकमेकांना समजून घेण्याचे. मी सणावाराला काही एसेमेस इ करत नाही कारण तेव्हा जिथे तिथे एसेमेसचा सुळसुळाट झालेला असतो. पण लक्षात असेल तर, वाढदिवशी आवर्जून शुभेच्छा कळवते.
बाकी रिलेशन्स बनवण्यासाठी खास असं काहीच नाही.

ह्या नेटवर्किंगचा तुम्हाला नोकरी/व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपयोग -
मला सर्व जॉब्ज नौकरी किंवा मॉन्स्टर वरुन मिळाले असले तरीही एखादी कंपनी जॉईन करावी की नाही, तिथले कामाचे स्वरुप, वातावरण, ज्या प्रोजेक्टवर काम करायचे आहे त्यात वापरली जाणारी टेक्नोलॉजी, तिथे पुढे मला प्रगतीला असलेला वाव इ ची चौकशी मी माझ्या जवळच्या जबाबदार मित्रमैत्रिणींना विचारते. जी कंपनी जॉईन करायची असेल तिथे कुणाची मित्रमैत्रीण काम करत असेल तर तिचा अनुभव न चुकता विचारात घेते आणि मगच निर्णय घेते.

इतर उपयोग/फायदा -
अशा नेटवर्किंगमध्ये मी वर लिहील्याप्रमाणे माझ्या 'खास' यादीत असणारेच लोक असतात. त्यामुळे त्यांची मदत मी इतर अनेक बाबतीत घेते. उदा. दुसर्‍या मित्रमैत्रिणीसाठी नोकरी शोधणे, ऑफिसच्या काही इव्हेंट्ससाठी सजेशन्स घेणे (थोडक्यात, अमूक स्पर्धा आहे, काय करु सुचवा), ऑनसाईट जाताना करायची तयारी (इतके जण सूचना देत असतात तेव्हा नक्की काय करावे कळत नाही.), सध्याचे ट्रेंड्स, पुढच्या संधी यावर चर्चा आणि त्यातून आपण आपला मार्ग आखणे इ.इ.

* मायबोली हे पण नेटवर्किंगचाच भाग समजते मी. इथे अनेकविध लोकांशी ओळखी होतात, नवी माहिती मिळते. नव्या क्षेत्रातल्या घडामोडी कळतात. त्या नकळतच आपल्याकडून इतरांना समजतात. बहुश्रुत होण्याचा प्रयत्न करता येतो, आणि मुख्य म्हणजे एकाच गोष्टीकडे किती वेगवेगळ्या कोनांतून विचार करता येतो हे समजते. आपले म्हणणे सुस्पष्ट, इतरांना कळेल असे हवे हे जाणवते. दुसर्‍याचे म्हणणे ऐकून घेणे, पटत असेल तर कबूल करणे किंवा अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री होणे, आत्मविश्वास जपणे हे सगळे ट्रेनिंग इथे मिळते. थोडक्यात, अचूक व्यक्त होणे आणि समजून घेणे; जे माझ्या क्षेत्रात अत्यंत उपयुक्त आहे. Happy

आपले म्हणणे सुस्पष्ट, इतरांना कळेल असे हवे हे जाणवते. दुसर्‍याचे म्हणणे ऐकून घेणे, पटत असेल तर कबूल करणे किंवा अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री होणे, >>

आं ? हे कुठल्या बाफ वर दिसलं तुला ? मला पण दुवा दे बघू Proud

इथले लोक चर्च मधे जाऊन ओळखी वाढवतात, आपल्या धर्मात तसे काही नाही.

केवळ एवे ए ठि करण्या ऐवजी माबोकरांना हि हा उद्योग सुरु करता येईल. फक्त नोकरीसंबंधी, धंद्यासंबंधी, काय कामे करतात, कशा प्रकारचे शिक्षण, अनुभव लागतो याची चर्चा झाल्यास, फायदाच होईल.
तसे न्यू जर्सी मधे बरेच क्लब आहेत, ब्रेकफास्ट क्लब, इ.
नोकरी गेली नाही तरी तिथे जाऊन इतर लोकांना भेटणे हे तुमच्या चालू नोकरीत सुद्धा उपयोगी ठरेल. विशेषतः मॅनेजमेंट मधे असलेल्यांना.
प्रोफेशनल सर्व्हिसेस ग्रूप असा NJ Unemployment office तर्फे चालवलेला एक प्रोग्राम गेली दहा वर्षे जोरात चालू आहे. मी काही वर्षे तिथे काम केले आहे. अनेSक लोकांना नोकर्‍या मिळाल्या.

Linked In मधे पण बरेच लोक असतात.

चांगले प्रो नेटवर्क बनविने येरागबाळ्याचे काम नोहे. योग्य वेळी योग्य त्या माणसाला पिंग करता येणे हे स्किल असते. बर्‍याच रितीने हे नेटवर्क बनविता येते. उदा स्वत:च्या कंपनीतील सोशल गॅदरिंग मध्ये जाऊन आपल्या टीम पेक्षा वेगळ्या लोकांसोबत राहने, त्यांचे कार्यक्षेत्र जाणून घेणे इ इ.

कार्पोरेट लॅडर चढायची असेल तर नेटवर्किंगला पर्याय नाही. काम चांगले असतेच, पण ते आपण किती जणांना माहिती आहोत त्यावरून आपण किती वर जाणार हे ठरते. हे माहिती करून घेणे म्हणजे त्यांना समस पाठविने, किंवा स्टेटसला लाईक करणे मात्र नव्हे. त्याची अजिबात जरूरी नाही. त्यांच्या फेसबुकवर फ्रेन्ड राहण्याचीही गरज नाही. पण तरीही सटल वे मध्ये मी हे हे काम करू शकते / शकतो हे मात्र योग्य त्या व्यक्तीच्या कानी पडणे जरूरी आहे.
बरेचदा आपण नवीन कंपनी सोडली की जुने बॉस / बॉसचे बॉस ह्यांना विसरून जातो. तसे अजिबात करू नये. लिंक्डईन ह्यासाठी उपयोगी पडते. आपण कुठे आहोत हे आपोआप त्यांना कळते. एके काळी हे नव्हते. एक किस्सा : माझा एक जुना बॉस मॅक्डी इंडिया हेड झाला. शिकागोत मॅक्डीचे कार्पोरेट ऑफिस आहे. तो अमेरिकेत मिटिंगसाठी आला, त्याने माझा फोन नं वगैरे शोधून काढून मला संपर्क केला. खरे तर मी ज्युनिअर होतो. त्याला गरज नव्हती पण तरीही संपर्क केला. भेटायला येशील का हे विचारले आणि भेटीत परत ऑफर दिली. थोडक्यात गरज दोघांना असते. म्हणून संपर्क हवाच. ( हे सर्व मी मिडल मॅनेजमेंट बद्दल लिहितो आहे. ज्यात आज ना उद्या सर्वच ज्युनीअर्स येतील)

तसेच आयटी म्हणले की क्लायंटशी संपर्क असतो अर्थात ऑफशोअरवरच काम केले / करणार असाल तर क्लायंट फेसिंग रोल नाही मिळत. पण ज्यांना क्लायंट फेसिंग आहे त्यांनी क्लायंटशी संपर्क खूप चांगला संपर्क ठेवणे गरजेचे आहे. क्लायंट म्हणजे आपण ज्याशी नेहमी बोलतो तो नाही, तर त्याचे बॉसेस किंवा त्यांची थोडी मिडल / सिनिअर मॅनेजमेंट. हे संपर्क त्यांना महिन्यातून एकदा जेवायला नेणे / त्यांच्याशी स्पोर्टस / वेदर वर चर्चा करणे ह्यातून वाढत जातात. जेवायला गेल्यावर हमखास भारताविषयी चर्चा सुरू होते. तिथे मेरा भारत महानचे टुमने मात्र अजिबात लावू नये, तसेच एखाद्याने चुकून भारताविषयी फारच खराब बोलले तर आक्षेपही घ्यावा. तो आक्षेप मात्र मर्यादेत असावा. त्याने आपली पर्सनॅलिटी क्लिअर होते. ख्रिसमसला कार्डस पाठवावेत. तिथे तो माझा सण नाही असे म्हणत बसू नये. Happy बरेचदा क्लायंट आपण चांगले काम करणारे असू तर जॉब ऑफर करतो. तिथे विनयाने नाही म्हणावे वा तिथे काम करायचे असल्यास आपल्या सिनिअरला इन्व्हॉल्व्ह करावे. माझ्यासोबत असे झाले तेंव्हा मी माझ्या अ‍ॅन्युअल रिपोर्ट मध्येही अमुक अमुक क्लायंटने जॉब ऑफर केला होता हे लिहिले आहे. ह्याचे फायदे दोन. १. तुमची कंपनी तुम्हाला ग्राह्य धरत नाही, २. तुम्ही चांगले काम करता हे अण्डरस्कोअर होते. हे देखील रिलेशनशिप मध्येच येते त्यामुळे लिहिले. Happy

अ़जून खूप टीप्स - टिप्स म्हणन्यापेक्षा अनुभव आहेत जे लिहिन. Happy

झक्की, NJ Unemployment office तर्फे चालवलेल्या प्रोग्रामबद्दल काही सांगू शकाल काय?
वा, केदार. खरंच खूप छान लिहीले आहेस. अजून लिही जमेल तेव्हा. Happy

केवळ एवे ए ठि करण्या ऐवजी माबोकरांना हि हा उद्योग सुरु करता येईल. >> याबद्दल चांगली सांगायची गोष्ट म्हणजे,
मराठी उद्योजक गृपचे दर महिन्याला पुण्यात एवेएठि होत असते आणि काही सभासद आवर्जून उपस्थित असतात.

झक्की, NJ Unemployment office तर्फे चालवलेल्या प्रोग्रामबद्दल काही सांगू शकाल काय?
मी गेली दोन वर्षे तिथे जात नाही, पण लवकरच चौकशी करून सांगतो.

109 Bassett Highway, Dover, NJ, 07801 , येथे पी एस जी चे ऑफिस आहे. दर बुधवारी सकाळी ८:३० ला नवीन लोकांनी यायचे, मग त्यांना सर्व माहिती दिल्या जाते. तसे समरव्हिल, हॅकेन्सॅक, न्यू ब्रुन्स्विक येथेहि यांच्या शाखा आहेत, पण डोव्हरची सर्वात जास्त उपयुक्त आहे.
तिथे इतर नेट्वर्किंग ग्रूप्सची पण माहिती मिळेल. माझ्याजवळ अनेक नावे व पत्ते आहेत. उदा. - Association for women in Computing of Northern New Jersey (AWC-NNJ), www.awc-nnj.org

MIS Network Associates Yahoo group ID: MISAssoc, http://fgroups.yahoo.com/group/MISAssoc/

पण नेहेमीप्रमाणे तुम्ही जितका जास्त भाग घ्याल, तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. सर्वस्वी volunteer बेसिसवर असल्याने, तुम्ही नुसते जाऊन मला हे द्या, ते द्या असे डीमांड करू शकत नाही. बोलून चालून एकमेकांना मदत करणे हा उद्देश आहे.

भारतात क्लीनीकल रिसर्च मधे नेटवर्कींग करण्याचा मी खूप प्रयत्न करतेय. फारशी लोकं लिन्क्ड इन अ‍ॅक्सेस करत नाहीत. इमेल अपडेट करत नाहीत. त्यामुळे फारच कठीण जातय. कुणाकडे अजून काही आयडीया असतील तर प्लीज सांगा ना. आपल्यातील कुणी क्लीनिकल रिसर्च च्या रिक्रुटमेंट मधे आहे का मुंबईत?

या नेटवर्किंगचा खरेच फायदा होतो. माझा माझ्या जून्या सहकार्‍यांशी नियमित संपर्क असतो.
ऑफिसमधे अनौपचारीक संबंध राखले जावेत या मताचा मी आहे.

आशू, छान धागा

माझा पण स्वतःचा व्यवसाय सुरू करून मला ४ वर्ष झाली आणि या ४ वर्षात नेटवर्किंचा खूपच फायदा मला होत अला आहे अणि तो अजूनही होतोय. अगदी काम मिळण्या पासून ते कामा साठी लोक मिळण्या पर्यंत.

>>>> इथले लोक चर्च मधे जाऊन ओळखी वाढवतात, आपल्या धर्मात तसे काही नाही. <<<<
आपल्या धर्मातदेखिल आहे, पण लोकच पाळू इच्छित नाहीत, पण असो.
नेटवर्किन्गसाठी मी मात्र जवळपास रोज सन्ध्याकाळी मन्दिरात आरतीकरता जातो Proud (तिथे बहुतेकजण माझ्यापेक्षा पन्धरावीस वर्षान्नी थोर सत्तरी गाठलेले वा पार केलेले असे रिटायर्ड लोक काठी टेकीत टेकित आलेले असतात, अन बहुधा आमच्यात तब्येतीविषयक/आरोग्यविषयक गप्पाटप्पा होतात)
कधीकधी मी शाखेत देखिल जातो. तिथे शिशुवर्गाच्या मुलान्पासुन माझ्या मुलाच्या वयाचे तरुण अस्तात. (मग तिथे "आमच्या काळी अस अस होत" असल्या गप्पा त्यान्ना ऐकविण्यापेक्षा Proud मी त्यान्च्या शारिरिक क्षमता/खेळकुद वगैरेचे कौतुक करत बसतो)
हल्लीच मी प्रवचनाला देखिल जाऊन बसलो होतो. "प्रवचन" कसे करतात याचे प्रात्यक्षिक तिथे शिकायला मिळाले.
महिन्यादोनमहिन्यातुन मी माझ्या फ्यामिली डॉक्टरकडे जाऊन मनसोक्त गप्पा मारुन येतो. ते डॉक्टर, डॉक्टरबरोबरच इतरही छंद जोपासत असल्याने त्यान्च्याशी चान्गले जमते. दोन्/तिन वर्षान्पूर्वी स्पेनमधे योगा शिकवायला साताठ महिने जाउन राहीलेले ते हेच डॉक्टर Happy यान्च्याकडे माझे किराणादुकानात असते तसे "खाते" आहे. तर फीचे पैसे वर्षातुन एखादवेळेस, जेव्हा जमेल तेव्हा जमेल तेवढेच देतो.
लिम्बीच्या भिशीच्या गृपबरोबर देखिल मी माझे संबंध राखले आहेत ते त्यान्ना निरनिराळी स्तोत्रे/आरत्या/सूक्ते वगैरेचा छापिल संग्रह देऊन. एकन्दरीत माझ्याबद्दल तमाम भिशि गृपचे मत (अर्थात लिम्बी सोडून Proud ) चान्गलेच आहे. Happy
अजुन काय काय करता येईल बरे?

केदार, चान्गले मुद्दे (खास करुन नोकरदारान्साठी - व नोकरीतुन व्यवसायात उतरण्याचा विचार करणार्‍यान्साठीसुद्धा)

केदार, उत्तम पोस्ट.

आपल्या क्षेत्रातील नोकरी संबंधित ई-ग्रूप्सना सामील झाल्यास नवी माहिती, जॉब व्हेकन्सीज कळत राहतात. शिवाय नव्या-जुन्या कलीग्जशी संपर्क ठेवता येतो.

आयटी क्षेत्रातील मॅनेजर पोस्टवरचा माझा एक मित्र दर सोमवारी त्याच्या हाताखालील सहकारी, कलीग्ज, नवे-जुने सहकारी यांना सप्ताहारंभाचा काही प्रेरणादायी मजकूर इमेलने पाठवितो. गुडविलसाठी व संपर्कात राहण्यासाठी उपयोग होत असावा.

headhonchos.com also has a network. great news and informative articles, plus new job positions etc.

अ.मा - असे डायरेक्ट पगारावर मेम्बरशिप देणे म्हणजे आश्चर्य आहे Happy

पुण्यात सॉफ्टवेअर मधे विविध विषयांवर कॉन्फरन्सेस, सेमिनार्स होत असतील त्याची माहिती कोठे मिळते?

अ.मा - असे डायरेक्ट पगारावर मेम्बरशिप देणे म्हणजे आश्चर्य आहे>> नाही नाही ते देत नाहीत.
ती सिनीअर लोकांसाठी जॉब साइट आहे. त्यांनी अप्रूव्ह केले तर व आपण मेंबरशिप घेतली तर मग पुढे जाता येते. लिंक्डइन सारखे नाही आहे. पगार पण लिहावा लागत नाही. पहिले पोस्ट एडिट करते नाहीतर गैरसमज होतील.

* नोकरी अथवा व्यवसाय करताना प्रोफेशनल नेटवर्किंग करणे तुम्हाला महत्वाचे वाटते का ?

हो. नक्कीच.
- चर्चा करून ( आपल्या क्षेत्रातल्या किंवा आजूबाजूच्या क्षेत्रातल्या लोकांशी ) नव्या कल्पना लक्षात येतात; आहेत ते विचार स्पष्ट होतात.
- अमक्या एका प्रश्नासाठी कोणाला गाठावे हे समजले की भरपूर वेळ वाचतो.
- आपली एक्सपर्टीज / आवड लोकांना माहित असली की ते त्यावरचे प्रश्न विचारतात, त्यामुळे इगो सुखावतो. शिवाय आपल्याला शिकायलाही मिळते.
- नवे ट्रेंड, टूल्स समजतात; उपयोगी पडतात.

* तुम्ही अ‍ॅक्टिव्हली नेटवर्किंग करता का ?

हो.
- वेळोवेळी व्हेन्डरांच्या सेमिनारांना जाणे. अगदी निरुपयोगी प्रॉडक्ट असले तरी इतर लोक काय वापरतात ते कळते.
- आजुबाजूच्या विद्यापीठातल्या भाषणांना जाणे.
- आपल्या टेक्नॉलॉजीच्या लोकांचे क्लब, गट वगैरेचे सदस्यत्व घेणे. त्यांच्या संमेलनांना उपस्थित राहणे.
- ऑफिसातल्या लोकांबरोबर वेळोवेळी पबात जाणे! (खूप महत्त्वाचे)

* करत असाल तर रिलेशन्स कसे बनवता ?

मुख्यत्वे गप्पा मारून.
विविध कार्यक्रमांनंतर कार्डे वाटून.
कुणाला एखाद्या माहितीत रस असेल असे लक्षात आले तर न विसरता ती पाठवून.

* ह्या नेटवर्किंगचा तुम्हाला नोकरी/व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कधी उपयोग झाला आहे का ?

हो. पुष्कळ.
मुख्य मुद्दा म्हणजे कुठे काय चालले आहे ते समजते.

अजून न जमलेल्या गोष्टी -
लोकांनी पाठवलेले मटेरियल सगळे वाचून, त्यावर चर्चा करणे.
माणसे आणि त्यांचे काम लक्षात ठेवणे (किंवा त्यासाठी खास रेकॉर्डकीपिंग करणे.)

डायरेक्ट पगारावर मेम्बरशिप देणे म्हणजे आश्चर्य आहे >>> अमेरिकेतही आहे. लॅडर्स नावाची साईट तशीच https://www.6figurejobs.com/

त्यासाठी खास रेकॉर्डकीपिंग करणे.) >> मृदुला लिक्डईन मध्ये हे आपोआप होतेच. कोण काय करते, कुठला जॉब, त्याचे मुख्य स्किल्स इ प्रोफाईल मध्ये असतात.

Pages