प्रोफेशनल नेटवर्किंग-एक गरज

Submitted by आशूडी on 10 February, 2012 - 04:57

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रोफेशनल नेटवर्किंग करणं बर्‍याचदा आवश्यक होऊन बसतं. तुमच्या नोकरी - व्यवसायातल्या समस्या, प्रश्न यावर उपाय शोधण्याचं ते एक माध्यम बनतं. मग ते ऑनलाईन असो वा ऑफलाईन. मायबोलीवर 'मराठी उद्योजक' गृप अशाच जाणीवेतून सुरु झाला.
तुम्हाला हे खरंच आवश्यक वाटतं का? त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला? तुम्ही तुमचे 'कॉन्टॅक्ट्स' कसे बनवता, सांभाळता, वाढवता? एकमेकांच्या मदतीने नवीन नेटवर्किंगचे तंत्र आणि मंत्र शिकूया. Happy
इथे लिहा तुमच्या प्रोफेशनल नेटवर्किंगचे अनुभव, युक्त्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सगळ्या गोष्टी फक्त आयटी, मॅनेजमेंट मधेच होतात का?
मी बायोटेक M.Sc. आहे, lecturer म्हणून कॉलेजमधे काम करते. या विषयातील कोणी इथे नाहीत का? मला इंडस्ट्री मधे जाण्याची इच्छा नाही. मग या क्षेत्रात संपर्क कसा वाढवायचा?
मुख्य म्हणजे p.hd. साठी गाइड कसे शोधायचे?

रितेशद१३ तुमच्या विषयाशी संबंधित एक वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला खुप माहिती मिळू शकेल.
ही साईट निर्माण करणारी व्यक्ती मराठी असुन पुणेस्थित आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता.
http://abhayjere.com/default.aspx

पुणे आणी मुंबई मधील उद्योजकांसाठी.. बीझरेफरल नावाचा एक गृप आहे.. महिन्यातुन एकदा ब्रेकफास्ट गटग.. आणी इतरवेळी ऑनलाईन देवाणघेवाण.. नविन कामे मिळवणे , प्रोजेक्ट फायनान्स या साठी अत्यंत उपयुक्त.. पण फक्त कंपनीच्या मालक किंवा डिसीजन मेकर्स ना प्रवेश...
दुसरे म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स.. या दोन्ही विषयी कुणाला माहिती हवी असेल तर डीटेल मध्ये लिहीन..:)

मला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स बद्दल उत्सुकता आहे. जर कोणाला नविन उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांच्याकडे मदत, मार्गदर्शन, इ. मिळू शकते का ? त्यांची वेबसाईट पाहिली पण त्यामधे ही माहिती मिळाली नाही. नक्की काय स्वरूप आहे चेंबरचे ?

आशुडी,
धन्यवाद !
नोकरीमध्ये हा विषय/लेख खुप महत्वाचा आणी उपयोगी वाटला.
आपण काम करत असलेल्या क्षेत्रातलं नेटवर्क मेंन्टेन न केल्यामुळे बर्याचदा आपण जगाच्या मागे पडु शकतो,नुकसान होऊ शकतं,कारण अपडेट,नविन माहिती सहज मिळत नाही.मी यातुन गेलो आहे, मी आयटीत ४-५ वर्षे काम करत होतो पण माझ उठण-बसणं हे नॉन आयटीतल्या नेटवर्कमध्ये होतं,रुम मेट/शेजारी असे सगळे एम्पीएस्सी/पीएसाय/सीए वाले होते. (तसे सगळेच माझ्यासारखे मुर्ख नसतात म्हणा)

केदारजी,मॄदुला तुम्ही खुप छान लिहिलयं...

इथे कोणी घरुन काम करत आहे का?

मी १ महिना क्लाईंट साईड ला होती पण ते काम पार्ट टाईम या भागात येते [ पार्ट टाईम /फुल टाईम असे दोन भाग]

सध्या घरुन काम करायचे आहे म्हणुन
ही रिक्शा
मी ४ वर्षे व्यवसाईक software tester होती ,
माझ्या कडे QTP 10 , loadrunner , rational robot. अशी testing tools आहेत , तरी कुणाला ,funcational, performance testing करायचे असल्यस सांगा.
[तसेच मी ही tools वापरुन बरीच repetative कामे पण करते जसे ली एका folder मधेल सगळ्या files ला रिनेम करणे ,
एक फोर्म मधे १००० users चा डाटा बनवणे]. ई.

Pages