अहो! असं रोखून काय पाहताय माझ्याकडे? मी फक्त 'वाटतो' असं लिहिलंय. साधा फुगा फोडायला घाबरणारा मी, माझी काय हिंमत दुसऱ्या कोणाचा मोबाईल फोडायची. मला आपलं त्या 'अर्चना सरकार' यांच्या 'त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो' ह्या शिर्षकावरून स्फुरण चढलं आणि देऊन टाकलं तसलंच डेअरिंगबाज शीर्षक माझ्या लेखाला. असो.
काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?
स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.
मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.
अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने मोबाईल संगणकावरुन पासवर्ड देऊन लॉक केला, पण पासवर्ड टाकताना मागे मराठी युनिकोड लेआऊट सुरु असल्याने पासवर्ड युनिकोड मध्ये टाकला गेला. आता पासवर्ड मोबाईलवरुन टंकताना त्यातील एक अक्षर मोबाईलच्या किपॅडवरुन टाईपच होत नाही (ते अक्षर Shift + # असे आहे) त्यामुळे मोबईल अनलॉक होत नाही. सदर पासवर्ड मोबाईलला एसएमएस ने पाठवून बफरमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण तसे होत नाहियं, मोबाईलच्या क्लिपबोर्डमध्येही टाकण्याचा प्रयत्न केला पण तरीही पासवर्ड अनलॉक स्क्रीनवर येत नाही. एक्स्टर्नल ओटीजी केबलने किबोर्ड जोडली तर तो फक्त इंग्लिश 26 कॅरॅक्टर किबोर्ड घेतो.
एक मदत हवी होती. मोटो-ई वर प्ले स्टोअर मध्ये गेल्यावर फक्त रिडीम, सेटींग हे पर्याय येऊ लागले आहेत. आधी स्टोअर उघडायचा. आता असे का होतेय? हेल्प वर जाऊ पाहता - अनफॉर्चुनेटली गुगल स्टोअर हॅज स्टॉपडं वर्कींग - असे म्हणते. रीडीम करायचा ऑप्शन कसा वापरायचा? त्याकरता गिफ्ट कार्ड नं. / प्रोमोशनल कोड कुठे मिळेल? इथे पेमेंट करायचे असेल तर त्याची सविस्तर माहिती, क्रेडीट कार्ड वगैरेचा पर्याय दिसत नाही.
मागिल वर्षी मुलीच्या शाळेत पालकांसाठी लेखन स्पर्धा होती त्या निमित्ताने लिहीलेला हा लेख.
हॅलो, आनंदाची बातमी आहे, मुलगा/मुलगी झाला/झाली. हो हो व्यवस्थित आहे. आता ही माझ्याकडे फोन करताना कशी टुकू टुकू पाहतोय/पाहतेय." आजकाल नवीन जन्मलेल्या बाळाच्या नजरेसमोर येणार्या ह्या पहिल्या प्रसंगातूनच बाळे मोबाइलशी परिचित होत असतील नाही का? आपल्या आई-वडील आणि घरातील इतर सदस्यांबरोबर मोबाइलही आपल्या आयुष्यातील एक घटक आहे हे नक्कीच बाळांना जाणवत असणार.
अडगुलं मडगुलं किंवा ये ग गाई गोठ्यात च्या ऐवजी आजकाल डायरेक्ट मोबाइलवर
इट्स माय पमकीन टमकीन
हॅलो हनी बनी,
फिलिंग समथिंग समथिंग हॅलो हनी बनी
नुकतेच युनाईट २ (मायक्रोमॅक्स १०६) वर अँड्रॉईड लॉलीपॉप अव्हेलेबल झाले आणि मोठ्या उत्सुकतेने मी ते डाऊनलोड केले. माझा युनाईट २ किटकॅट चा लॉलीपॉप केला नी पस्तावले.
काही फिचर्स वगळता लॉलीपॉप व्हर्जन ने मोबाईलमधली इतकी जागा खाल्लीये कि बस.
याव्यतिरीक्त बटणे विचित्र जागी असल्याने फोनवर बोलता बोलता फोन म्युट होणे, स्पीकर ऑन होणे असले भयाण प्रकार होत आहेत.
तरी आता लॉलीपॉप डाऊनग्रेड करुन किटकॅट करणेचे आहे. तूनळीवर सर्च केले असता फास्टबूट नी लॅपटॉपला अॅटॅच करून रुट करणे इत्यादी मार्ग दिसताहेत. तर हे न करता डाऊनग्रेड करणे शक्य आहे का? कारण अपग्रेड करतांना मला असं काहीच करावं लागलं नव्ह्तं.
मध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का?
एक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
दुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय?
असाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?
नवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.
मात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का?
माझ्याकडे सॅमसंग टॅब २ ७.० आहे. ज्याची अंतर्गत स्टोरेज कॅपॅसिटी ८ जीबी व बाह्य स्टोरेज कॅपॅसिटी १६ जीबी आहे. मी मुख्यतः या टॅबचा उपयोग ईबुक्स वाचण्यासाठी करते. कोबो व बुकगंगा हे दोन इबुक रिडर्स मी वापरते. हे दोन्ही रिडर्स टॅबचे इनबिल्ट स्टोरेज वापरत आहेत, जो ४.४९ जीबी दाखवत आहे. या दोन्ही रिडर्समध्ये भरपुर प्रमाणात ईबुक्स डॉउनलोड केल्यामुळे माझी इनबिल्ट स्टोरेज कॅपॅसिटी खुपच कमी झाली आहे.
मोबाईल कोणता घ्यावा या धाग्यावर एक प्रतिसाद टाईप करताना डोक्यात अचानक एक किडा वळवळला. म्हणून हा धागा. किड्याची समरी वर टायटल मधे आहेच. इतके बोलून, नमन झाल्यानंतर उरलेले घडाभर तेल पुढे ओततो -
फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे सुमारे ४थी-५वी मधे असताना आमच्या अख्ख्या कॉलनीत एक फोन होता. तो देखिल लँडलाईन. फोन कसा करतात याची ओ की ठो जाणकारी आम्हाला नव्हती. फोनवाले घर शेजारीच होते. वडीलांच्या ऑफिसात फोन ऑफकोर्स होताच. एकदा आईने मला शेजारी जा अन तुझ्या वडिलांना अमुक निरोप फोन करून सांग असे काम सांगितले.
Finally the wait is over!!!
Feels good to hold this sleek chick in my hand!!
iPhone 5!!!!!!!!!!!!!
---------------------------------------------------------------
* Congrats . . . .for getting ur SLIMMER life back. . . .
* Thats what we call a GEEK. a cool 45 K.
* Yep!!! Worth a spend
* i have already got one.. u just keep on waiting.. !!
* यार मुझे भी लेना था, कहा से ले रहा है..
*
*
*
मित्राने फेसबूकवर आपल्या नवीन फोनची जाहीरात केली आणि पाठोपाठ अभिनंदनाची रणधुमाळी सुरू झाली.
अभिनंदनाच्या पलीकडे ही एक वेगळीच चढाओढ सुरू झाली आणि तासाभरात पन्नास कॉमेंट पडल्या.