अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने मोबाईल संगणकावरुन पासवर्ड देऊन लॉक केला, पण पासवर्ड टाकताना मागे मराठी युनिकोड लेआऊट सुरु असल्याने पासवर्ड युनिकोड मध्ये टाकला गेला. आता पासवर्ड मोबाईलवरुन टंकताना त्यातील एक अक्षर मोबाईलच्या किपॅडवरुन टाईपच होत नाही (ते अक्षर Shift + # असे आहे) त्यामुळे मोबईल अनलॉक होत नाही. सदर पासवर्ड मोबाईलला एसएमएस ने पाठवून बफरमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण तसे होत नाहियं, मोबाईलच्या क्लिपबोर्डमध्येही टाकण्याचा प्रयत्न केला पण तरीही पासवर्ड अनलॉक स्क्रीनवर येत नाही. एक्स्टर्नल ओटीजी केबलने किबोर्ड जोडली तर तो फक्त इंग्लिश 26 कॅरॅक्टर किबोर्ड घेतो. माबोवरील अनुभवी मंडळींना यावर काही उपाय माहिती आहे का?
शेवटचा पर्याय मोबाईल फॅक्टरी रिसेट करणे हा आहे पण त्याने सगळा डेटा जातोय. अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरच्या सपोर्टला फिडबॅक ई-मेल केला आहे पण त्याचे उत्तर येईलसे वाटत नाही. कोणाकडे काही उपाय आहे का?
मदत हवीय.... अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने लॉक केलेला मोबाईल....
Submitted by सांश्रय on 29 January, 2016 - 01:14
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे वाचा -
हे वाचा - http://trendblog.net/how-to-bypass-android-phone-lock-screen-pattern-pin...
धन्स, -हितेश- तुम्ही दिलेल्या
धन्स, -हितेश- तुम्ही दिलेल्या लिंकमधील - सॅमसंग फाईंड माय मोबाईलमधील - अनलॉक माय स्क्रीनने मोबाईल अनलॉक झाला.
मनापासून धन्यवाद...
(No subject)
हितेश, ग्रेट ! मी हॅबिच्युअल
हितेश, ग्रेट ! मी हॅबिच्युअल पासवर्ड लुजर आहे. २-३ वेळा फॅक्टरी रिसेट करावा लागला आहे. बाकी बॅक अप होताच पण वॉस्सॅप वरचे काही यादगार चॅटस गेले त्याचं फार दु:ख झालं होतं. आता यापुढे परत असं झालं तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार. माझा एकदम जोरदार वशिला आहे तुमच्या घरचाच.
ok मनिमाऊ , whatssapp चा
ok मनिमाऊ , whatssapp चा backup google drive वर घेत जा , WA मध्ये तसी सुविधा आहे .
थँक्स. हो. ही सुविधा आहे हे
थँक्स. हो. ही सुविधा आहे हे माहित होतं. पण कुठे सेव होतं ते माहित नव्ह्तं. माझं assumption होतं कि वॉस्सॅप सर्वरवर सेव होत असेल. आता नविन सेटिंग्ज केल्यावर गुगल ड्राइव वर घेते आहे.
वाट्स अॅप बॅकप साठी Titanium
वाट्स अॅप बॅकप साठी Titanium Backup हे अॅप वापरावे असे सुचवेन. बाकी, ज्याची त्याची मर्जी.
-दिलीप बिरुटे