अनुभव
फ़ुकट तिथे फ़ॅमिलीसकट !
नमस्कार,
हा माझा माबोवर लिहायचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे चुभुद्याघ्या !
जसा अनुभव आला तसा लिहायचा प्रयत्न केलाय. अर्थात आता पुलाखालुन बरंच पाणी वाहुन गेलं आहे कारण या गोष्टीला आता जवळपास ३ वर्षं झाली आहेत !
***********************************************************************************************************
"हॅलो, कम्युनिटीमधे जेवण आहे आत्ता. येतोस का?" - मित्र
"कधी आत्ता? कोणी सांगितलं?" - मी
"अरे बोर्ड लावला आहे एट्रंस गेटच्या बाहेर. मी ऑलरेडी रांगेपाशी पोचलो आहे. तू येणार असशील तर लवकर पोहोच" - मित्र
"तिथे कुठे बसून खाणार रे? काहीतरी वाटतं ते!" - मी
उत्पादन नव्हे, अनुभूती विका!!(पूर्ण)
ऑडीटोरीयम:
"आपण उत्पादने नाही, अनुभूती विकणार आहोत ग्राहकाला.यापुढे मनाशी निश्चय करा.सुंदर ताज महाल आपले प्रतीस्पर्धी विकतात. आपण गिर्हाईकाला ताज महाल नाही विकायचा, त्याला 'मी ताज महाल, लिबर्टीबाईचा पुतळा, माचू पिचू, पिरॅमिड,बुर्ज खलिफा बनवू शकतो' हा आत्मविश्वास, ही अनुभूती विकायची आहे.गिर्हाईकाचा खिसा कोणीही टॉम डिक हॅरी जिंकतो. आपल्याला त्या खिश्याच्या खालचे त्याचे हृदय जिंकायचे आहे."
पोस्ट
"बॅग भर." बहीणीने हुकुम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे टाक. फक्त बाहेरचे. आतले नको. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. मी चाकाची बॅग, ती पत्र्याची बॅग आणि तिसरी एकावर एक भलेमोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.
घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
कॅनडा गीझ : स्थलांतर व्हीडीयो (Migration of Canada Geese)
नोव्हेंबरच्या दुसर्या - तिसर्या आठवड्यात आकाशात काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे उमटायला लागतात आणि अचानक कॅनडा गीझचा आवाज आसमंत भरून टाकायला लागतो. कॅनडाहून दक्षिणेला प्रयाण करणारे हे कॅनडा गीझ मजल दरमजल प्रवास करताना काही काळासाठी आपल्या भागात मुक्कामाला आल्याची जाणीव होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पक्षांचं चाललेलं ट्रेनिंग पाहणं हा विलक्षण अनुभव. त्यांचं एकत्र येणं, विविध गट करणं, आवाजातून आणि पंख फडफडवून संदेश देणं, फिजीकल कपॅसीटी आणि वयानुसार वेगवेगळे ग्रुप्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन उड्डाण करणं हे सगळंच अचंबित करणारं.
जपान, जपानी आणि मी !....भाग ३
http://www.maayboli.com/node/55981
http://www.maayboli.com/node/56035
पुर्वी कधीतरी एक म्हण ऐकली होती की ज्या पुरुषाचे घर अमेरिकन आणि ज्याची बायको जपानी तो माणूस जगातला सर्वात सुखी माणूस आहे....अशा काहीशा अर्थाची...
जपान, जपानी आणि मी !....भाग २
http://www.maayboli.com/node/55981
'ध' चा 'मा' होवुन पुर्वी एक खून पुण्यात पडला होता. इथे अमेरिकेत 'र' चा 'ल' आणि 'ल' चा 'र' करीत इंग्रजी भाषेचे रोज खून पाडले जायचे. '' आय वान्त तू बीसीत रंडन अँड लोम''....हे नेहमीच.
एकीकडे जपानी लोकांची इंग्रजीशी अशी हाणामारी चालली होती तिथे मी सुद्धा आपल्या परीने जपानी भाषेची मन लावून ऐसी की तैसी करत होते.
'अहो' या शब्दाचा जपानी अर्थ होतो मूर्ख, बावळट, ईडियट असा. एकदा भर पंक्तीत मी नवर्याला अहो, अहो... अशा दणादण हाका मारल्या त्या ऐकून समस्त जपानी मंडळींची भीतीने बोबडी वळली होती. या बाईला अचानक वेडाचा झटका आला की काय म्हणून पार हबकुन गेले बिचारे....
जपान, जपानी आणि मी! ....भाग १
'' पमीचान, यु आर अ बेरी गुड कूकर''.....माझ्या हातचा खतरर्नाक स्वयंपाक खाउन सुद्धा मला " गुड कूकर" म्हणणार्या बाईकडे मी थक्क होऊन पहात होते.
पुढे हळूहळू जपानी लोकांच्या या अती नम्रपणाची इतकी सवय झाली की मग त्यांनी मला 'यू आर बेरी स्मार्त' किंवा अगदी 'यू आर बेरी थीन' वगैरे म्हटले तरी मी अजिबात दचकायचे नाही. खरंच कौतुक करताहेत का टोमणा मारताहेत असलं फालतू टेन्शन न घेता बेधडकपणे थॅंक यू ..आरिगातो गोझाईमास म्हणून टाकायचे.
पण देश, भाषा, संस्कृती, रंग- सगळ्याच बाबतीत परक्या असलेल्या मला, या जपानी स्त्रियांनी 'पमीचान' म्हणत आपल्या वर्तुळात अलगद सामावून घेतलं होतं, अगदी सहजपणे.
रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..
आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.
पुनर्भेट
२३४ मुलींपैकी ती एक. इयत्ता सहावीत, म्हणजे तेरा-चौदा फार फार तर पंधरा वर्ष वय असेल तिचं. ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली. त्यापैकी ही एक ‘रापारिगा लीडर’ किंवा ‘लीड गर्ल’.
कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे एक महत्त्वाचं काम. त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी जाऊन, आई-वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं. एक दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं. इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच.
Pages
