अनुभव

बिग बेंड राष्ट्रीय उद्यान

Submitted by मोहना on 24 December, 2020 - 08:25

९ दिवस आणि ३५०० मैल गाडी हाकायची ठरली तेव्हा मी माझं Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान घरातल्या घरातच करायचं ठरवलं पण दरवर्षीच्या नेमामध्ये कोविड काळ येऊ न देता कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं, विमानाने न जाता गाडीने प्रवास करायचा या विचारावर मुलं ठाम होती. शेवटी गाडी कशी चालवायची याबद्दल हजार सूचना तोंडी दिल्यावर माझं समाधान झालं पण सूचना लिखित पाहिजेत अशी सूचना आली. मी लिहिलेल्या पाच सूचनांनंतर, ६ क्रमांकावर आईने ओरडत बसायचं नाही ही सूचना मुलांनी घुसडवली आणि हल्लीच गाडी शिकलेल्या मुलीने घरातली ती सर्वोत्कृष्ट वाहन चालक असल्याचा निर्वाळाही दिला.

प्रतिसाद

Submitted by विनायक पेडणेकर on 9 August, 2020 - 01:16

आमच्या ठाण्याच्या घराच्या खिडकीत बसून, वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत बसायला मला फार म्हणजे फारच आवडतं. सोबतीला एखादं छानसं पुस्तक किंव्हा ताजं वृत्तपत्र. मधून मधून बाहेर नजर टाकत असं चहा पिण्यातली गंम्मत काही औरच. माझी निवांतपणाची ती व्याख्या आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यात बाहेर पाऊस पडत असेल तर काही विचारायलाच नको.

शब्दखुणा: 

मियाऽऽउं! (भाग-१) - चिमा

Submitted by वर्षा on 22 May, 2020 - 07:11

(माझ्या पाळीव मांजरांच्या अनुभवांवरचे हे लेख मी फार पूर्वी लिहिले होते आणि बहुतेक जुन्या हितगुजवरही होते जे आता त्यासमवेत गडप झालेत. हा लेख मी पाळलेल्या मांजर क्र. २बद्दल आहे. मां. क्र. ३-४ आणि १ चे लेख नंतर टाकेनच.)

आमची बजेट टूर

Submitted by पराग र. लोणकर on 1 April, 2020 - 09:31

२०११च्या मध्यात सिमला मनाली चंदिगड अशी टूर करण्याचा योग आला. आमची ही ग्रुप टूर पहिलीच! आत्तापर्यंतची भटकंती फक्त वैयक्तिक बुकिंग करूनच केली होती.

जायचे ठिकाण ठरल्यानंतर कोणत्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे जायचे हे ठरवण्यासाठी कमीत कमी चार पाच संस्थांमध्ये चौकशी केली. काहींचे दर खूपच महाग, तर काही ठिकाणी टूरची माहितीच इतकी उदासपणे देण्यात आली की आपली टूर हे किती उत्साहाने conduct करणार असा प्रश्न पडला.

या सर्वांमध्ये छाप पडली ती एका टूर कंपनीची. आमच्या प्रत्येक चौकशी भेटीमध्ये अतिशय आदरपूर्वक आणि उत्साही संवाद; याने अतिशय आत्मीयता वाटली. त्यात भर म्हणजे अतिशय वाजवी दर.

शब्दखुणा: 

इथे पुस्तके राहतात ...

Submitted by कुमार१ on 27 January, 2020 - 08:25

लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच.

विषय: 
शब्दखुणा: 

जपानमधलं आमचं ’काबूकी’!

Submitted by मोहना on 16 December, 2019 - 08:41

जपानला ’पारंपरिक’ घरात राहू असं नवरा म्हणाला आणि माझ्या पोटात गोळा आला. कोकणातलं ’पारंपरिक’ घर आठवलं. शरीरधर्मासाठी रात्री अपरात्री जायची वेळ आली तर ’परसा’कडे जीव मुठीत धरुन जाणं, कटकटी शरीररक्षक भावंडं सोबतीला नेणं, कंदीलाच्या उजेडात सावल्यांच्या खेळांनी जीव गेल्यागत होणं असं सगळं डोळ्यासमोर आलं. जापनीज पारंपरिक घरात शिरलो आणि एवढंसं घर आमच्या चार देहांनी व्यापून टाकलं. बॅगा जमिनीवर इतस्त:त तोंडं उघडून विखुरल्या. इकडे तिकडे नजर टाकली आणि माळ्यावर जाण्यासाठी अरुंद जिना दिसला. मी वर जायचंच नाही असं ठरवून टाकलं पण इलाज नव्हता. झोपायची व्यवस्था वर होती.

शब्दखुणा: 

आजोळचे घर - मोसम

Submitted by मोहना on 26 October, 2019 - 12:08

गड्याच्या खांद्यावर बसलेली, टुकूटुकू नजरेने आसमंत न्याहाळणारी लहानगी. खळाळणारी नदी, नदीपलिकडे रांगोळीच्या ठिपक्यासारखी दिसणारी घरं आणि मागे - पुढे आपल्याच नादात असलेली भावंडं, मोठी माणसं. त्यांच्या बोलण्याचे आवाज. पाहता- पाहता गड्याच्या चालीने ते आवाज हवेत विरायला व्हायला लागतात, मागे पडतात. आता फक्त साथीला आसमंत आणि गड्याचं झपाझप चालणं. बघता बघता त्या चिमुकलीला गड्याच्या खांद्यावर बसायचा कंटाळा येतो. ती खांद्यावरून उतरते. कपड्यांवर उडालेली माती झटकत पुन्हापुन्हा पायाने माती उडवत राहते. मातीतलाच हाताला लागलेला दगड उचलून नदीच्या दिशेने भिरकावते.

आजोळचे घर - मोसम

Submitted by मोहना on 26 October, 2019 - 12:08

गड्याच्या खांद्यावर बसलेली, टुकूटुकू नजरेने आसमंत न्याहाळणारी लहानगी. खळाळणारी नदी, नदीपलिकडे रांगोळीच्या ठिपक्यासारखी दिसणारी घरं आणि मागे - पुढे आपल्याच नादात असलेली भावंडं, मोठी माणसं. त्यांच्या बोलण्याचे आवाज. पाहता- पाहता गड्याच्या चालीने ते आवाज हवेत विरायला व्हायला लागतात, मागे पडतात. आता फक्त साथीला आसमंत आणि गड्याचं झपाझप चालणं. बघता बघता त्या चिमुकलीला गड्याच्या खांद्यावर बसायचा कंटाळा येतो. ती खांद्यावरून उतरते. कपड्यांवर उडालेली माती झटकत पुन्हापुन्हा पायाने माती उडवत राहते. मातीतलाच हाताला लागलेला दगड उचलून नदीच्या दिशेने भिरकावते.

झाशीची राणी आणि शाबासकी

Submitted by मोहना on 23 October, 2019 - 07:32

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता.

Pages

Subscribe to RSS - अनुभव