न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!
----------
न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे.
छे! ही पोरगी म्हणजे फार टीपिकल गोष्ट झालेय. काही कळायलाच मार्ग नाही. तीच्या वागण्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता.
हक्क गाजवत ही माझ्याशी अशी का वागतेय? ना ही माझी गर्लफ्रेंड, ना हीच्यात आणि माझ्यात काही होण्याची सुतराम शक्यता. मग प्रत्येक गोष्टीत तिचा- असं अधिकाराने बोलण्याचा अर्थ तरी काय?
म्हणजे हीनं तासनं तास तीच्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारलेल्या चालतात. पण मी कोणाशी बोलायचं म्हटलं तरी तीचं डोकं तापलं पाहिजे!
मुलींचा माझ्याशी ‘क्रश’ म्हणून जास्त असा संबंध आला नाही. आला तो अगदीच मोजक्या मुलींच्या बाबतीत आला. तुल्लू ही त्यातलीच एक. दुसरी- जेव्हा मी ‘एफ.वाय.जे.सी’ च्या सुट्टीत बोरिवलीला सेल्स एजेंट म्हणून काम करत होतो तेव्हाचा.
काही कामानिमित्त गोरेगावला गेलेलो असताना रात्री परतायला उशीर झाला. म्हणजे जवळजवळ अकराच वाजले होते. त्यावेळी एक मुलगी स्टेशनवर आली होती. आता तो प्लॅटफॉर्म, जागा, ठिकाण, मला काही-काही आठवत नाही. आठवतात ते फक्त तीचे डोळे!
वर्ष संपत आलं होतं. एग्झामच्या प्रिपरेशनचं ओझं डोक्यावर पडायला लागलं होतं. आमची नोट्स पुर्ण करायची धडपड चालू झाली होती. त्यात इकोचे प्रोजेक्ट डोकं खात होतं. वेळेत पुर्ण केलं तर ठीक. नाहीतर त्याचे मार्क्स कट! त्यामुळे लायब्रेरित बसून अभ्यास करायचं प्रमाण वाढलं होतं. निदान दीड तास तरी लायब्रेरित घालवायचाच असा अलिखित नियम बनला होता. याच दरम्यान आमचा क्लासमेट्सचा एक कंपू तयार झाला होता. आणि याच कंपुत भर पडली होती ती एका नव्या मुलीची- मितालीची!
हो- तीच ती गोरी-गोरी पान..!!
तशी मी कोणतीही गोष्ट जर ती- तितकीच महत्त्वाची नसली तर, लक्षात ठेवत नाही. त्यावेळीही मिसने सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरुन गेलो होतो. पण ती विसरली नव्हती.
रात्री तर रात्रीच.
बरोबर आठच्या सुमारास फोनची रिंग वाजली. घरच्यांनी फोन उचलला तर पलिकडून- एका मुलीकडून माझी चौकशी करण्यात आली. आश्चर्य आणि धक्का काय असतं हे एकाच वेळी आमच्या घरच्यांच्या चेहर्यावर दिसून आलं (हे मुलींच्या घरी होतं ना? छे! आमच्याइथची गणितच वेगळी आहेत!)
‘माझ्यासाठी एका मुलीचा फोन- तोही इतक्या रात्रीचा??’ नसत्या शंका कुशंकांनी वातावरण ढवळून निघत असतानाच कोणीतरी मला बेडरुममध्ये फोन आणून दिला.
कॉलेजच्या ग्रॅज्युएशनचे लास्ट इअर. आमच्या क्लासमध्ये दोन-तीन न्यु अॅडमिशन आले. यामध्ये एक मुलगी सुद्धा होती. साधीच होती पण तरीही सगळ्यात उठुन दिसत होती. दुधाळ रंग, साध्या लुज- लो पोनीटेल टाईप मागे बांधलेले काळेभोर दाट- गुळगुळीत केस आणि तेजस्वी चेहर्यावर सतत एक आत्मविश्वासी हास्य! स्वभाव सुद्धा मनमिळावू आणि फ्रेंडली होता तिचा. अगदी ‘परफेक्ट वुमनचीच’ उमपा द्यावी अशी होती ती. तिला पाहताच माझ्या डोक्यात-
‘गोरी गोरी पान! फुलासारखी छाsssन, दाsदा मला एक बायssको आsssण!’ या गाण्याच्या लिरिक्स वाजु लागल्या.
प्रणित,
सर्वप्रथम सॉरी!,
मी तुझी वही दुसर्याच दिवशी परत करणार होते पण नाही जमलं. कारण नेमके त्याच दिवशी रात्रीचे आम्ही सर्वजण मामांकडे गेलो होतो. हा कार्यक्रम अचानक ठरल्याने कोणालाही सांगण्या-बोलण्याची संधीच मला भेटली नाही. शिवाय माझ्या जवळपास कॉलेजच्या कोणीच मैत्रीणी राहत नसल्याने तुझी वही माझ्याकडेच राहून गेली.
चार-पाच वर्षांपूर्वी मी जय महाराष्ट्र चेनल वर ऐश्वर्या चा बटवा लिहियाची त्यातलं एक लिखाण :
प्रशांतीने आपलं मोजकंच सामान एकत्र केलं. मुलाचा फोटो, त्याने काढलेली एक दोन चित्र, हरीचा आणि तिचा फोटो. फार नव्हतंच. एका तासात तिला सगळं आवरायचं होतं. जेमतेम तीन महिने एकत्र काम केलेल्या सहकार्यांचा निरोप घ्यायचा की नाही हे तिला समजत नव्हतं. त्यांना ठाऊक असेल? काय म्हणतील? प्रश्न, सल्ले आणि सहानुभूती... नकोच. काय कळायचं ते इथून गेल्यावरच कळलेलं बरं. पण ती नक्की का सोडून जाते आहे ते कुणाला ठाऊक असण्याची शक्यता तिला वाटत नव्हती. काय करावं? सामान पाहिलं की सर्वांच्या नजरा वळणारच. तिला रडायला यायला लागलं. डोळ्यातले अश्रू कसेबसे आवरत ती सामान भरत राहिली.