मजेशीर अनुभव

Submitted by kokatay on 22 March, 2018 - 18:09

चार-पाच वर्षांपूर्वी मी जय महाराष्ट्र चेनल वर ऐश्वर्या चा बटवा लिहियाची त्यातलं एक लिखाण :
आज माझ्या बटव्या च्या चीट मध्ये लिहिले आहे ते “ मजेशीर अनुभव “ हे ऐकताच मला बऱ्याच गोष्टी आठवतात. ६०-७० दशकाच्या दरम्यान जे लोकं भारतातून अमेरिकेत आले त्यांना पुष्कळ गोड-कडू अश्या परिस्थितीतून जावे लागले कारण त्या वेळेला आजच्या सारख इंटरनेट नव्हतं , त्या कारणाने अमेरिकेतल्या रोजच्या जीवनाविशयी काहीच कल्पना नसायची. आमचे एक काका जे कि भारतात वास्तूविशारद होते, आणि ते एका मुलाखती साठी अमेरिकेत आले. संध्याकाळी विमान न्यूयोर्क ला पोहोचलं आणि ते रात्री हॉटेल मध्ये थांबले. सकाळी ते मुलाखती साठी ऑफिस मध्ये गेले. जरा तास भर आधीच पोहोचले होते, तेव्हां त्यांनी लॉबी मध्ये वेळ काढायचे ठरविले, त्यांना खूप तहान लागली होती आणि कोका-कोला प्यावसं वाटलं, ते बिल्डिंग च्या कॉफी शॉप मध्ये गेले आणि दुकानदाराला सांगितलं कि मला एक कोका-कोला ची बाटली हवी, त्या दुकानदाराला काही कळलेच नाही. नंतर ते बिल्डिंग च्या बाहेर जायला निघाले तो दारावर उभा असलेल्या द्वार पालकाला विचारलं कि कोका –कोला ची बाटली कुठे मिळेल? तर त्याला देखील काही कळले नाही, मग शेवटी त्यांनी हातवारे करून सांगितलं कि मला पाणी प्यायचं आहे, तेव्हां त्याला अभिप्राय कळला आणि तो म्हणाला कि सरळ जाऊन उजवीकडे वळा, तिथे एक ‘फाऊनटन” आहे. त्यांना खूपच राग आला कि हा मनुष्य मला काय कावळा समजतो? जो मला कारंज्यात पाणी प्यायला सांगतो. ते तिथून निघून पुढे गेले तर तिथे खरोखरच एक कारंज होतं, पण त्याचाही पुढे एक सार्वजनिक पाण्याचा नळ होता. नंतर काही दिवसांनी त्यांना कळले कि इथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याला “ फाऊनटन “ असं म्हणतात!
माझ्या स्वतः बरोबर झालेली एक गोष्ट आठवते. मी माझी दीड वर्षाची मुलगी आणि माझे पती, असे आम्ही एकदा एका दुकानांत गेलो, माझ्या मुलीला मी शॉपिंगकार्ट मध्ये बसवली होती, तर तिथे आलेली एक अमेरिकन बाई माझ्या मुलीशी बोलू लागली आणि तीचं कौतुक करू लागली. तिन्ह विचारलं कि तुझं नाव काय आहे? तर मी माझ्या मुलीला सांगितलं कि ‘ऑन्टी” ला सांग तुझं नाव काय आहे? ताबडतोप त्या बाई च तोंड आंबट झालं आणि तिनं काढता पाय घेतला. नंतर मला माझ्या पतींनी सांगितलं कि इथे जर तुमचं खरच नातं असलं तरच त्या नात्याने बोलवतात, नाहीतर सरळ नावानेच हाक मारायची पद्धत आहे .
पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. आताची पिढी आधीच सगळी चौकशी करतात आणि ति इंटरनेट मुले खूपच सोपी झालीये. परवाच माझ्या मावस बहिणी चा भारातून फोन आला कि ति आणि तिचे पती दोघं अमेरिकेत नौकरी साठी येणार आहेत तर त्यांना मी सांगितलं कि तुम्ही लॉस अन्जेलीस ला आलात तर खूपच छान वाटेल, तर ति म्हणाली ताई, मला ही आवडेल पण तिकडे राहण्याचा खर्च मिनिआपोलीस पेक्षा दुप्पट आहे, तेव्हां आम्ही मिनिआपोलीस ला जायचं ठरवलं आहे! मला फारच कौतुक वाटलं कि जेंव्हा सुमारे १९ वर्ष आधी मी लग्न करून अमेरिकेत आले तेव्हां इथे राहायचा किती खर्च लागेल इत्यादी चा विचार ही मनात आला नाही.
काळ प्रमाणे सगळ बदलतं पण मला अजूनही ३०-४० वर्ष आधी जी मंडळी अमेरिकेत आली, त्यांच कौतुक करावस वाटतं , त्यांनी सहजपणे नवीन वातावरण अंगीकृत केलं आणि त्यांना तसं करायला फार अवघड ही गेलं असावं, त्यांना मनः पूर्वक अभिवादन!
ऐश्वर्या कोकाटे, संपादिका
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>पण मला अजूनही ३०-४० वर्ष आधी जी मंडळी अमेरिकेत आली, त्यांच कौतुक करावस वाटतं , <<
झक्किंना ब्याटिंगला बोलवा... Proud Light 1

छान Happy
पण कोका कोला का नाही समजलं?

>>@raj हे झ्क्की कोण ?<<

ते मायबोलीचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. आम्हि हाफ-प्यांट मध्ये असताना ते अमेरिकेत आलेले आहेत...

परत एकदा Light 1 Proud

दोन्ही किस्से आधी वाचल्यासारखे वाटले
अगदी जसेच्या तसे

आधी कुठे लिहीले होतेत का आपण ?

दोन्ही किस्से आधी वाचल्यासारखे वाटले >>> हो! मलाही! म्हणून वर जाऊन मी ह्या लेखाची तारीख बघितली तर आजचीच दिसली. आणि गोंधळायला झाले. मला वाटले होते की मी जुनाच लेख पुन्हा वाचायला घेतलाय की काय!

जेंव्हा आजकालची मुले विचारतात की सेल फोन, जीपीएस, घरोघरी कॉम्प्युटर नसताना तुम्ही जगलातच कसे? तेंव्हा काही काही प्रसंग आठवतात त्याची आता गंमतच वाटते! अहो व्हॉइस मेलपण नाही घरी! कॉलर आय डी नाही!
ऑफिसमधे व्हॉइस मेल असे. तेंव्हा दूरदूरच्या देशात पसरलेल्या लोकांचे निरोप ऐकून त्यांना पुनः व्हॉइस मेल वर निरोप ठेवणे असे काम चाले. दोन तीन लोकांशी तर मी फक्त तसेच काम केले. शेवटी एकदाची मीटींगमधे ते इकडे आले किंवा मी तिकडे गेलो तरच प्रत्यक्ष भेटणे!
आणि ते टेलेक्स! आणि भारताचा फोन बुक करून एक दोन दिवसांनी फोन लागल्यावर बोलणे. मुलगा झाल्याची तार भारतात दोन दिवसांनी पोहोचली! नातीच्या वेळी मात्र जन्मल्या दिवशी फोटोसकट भारतात बातमी! (लग्गेच कुणासारखी दिसते वगैरे, फोनवर! डोंबल. नवजात अर्भक कुण्णासारखे दिसत नाही!! असे माझे मत!)

मग तेंव्हा कुणि ऐकला नाही म्हणून इथे लिहिला का?
उगीच एक सदाशीव पेठी शंका हो, म्हणजे I am just saying! (दात विचकणारी बाहुली) Light 1

चला आता, मूळ विषय बाजूला पडून, मायबोलीवरून मा़झे उच्चाटन करावे की नाही यावरून धमाल चर्चा, मला शिव्या वगैरे सुरु होईल.
त्यानिमित्ताने लेख पण वाचला जाईल!

<< आम्हि हाफ-प्यांट मध्ये असताना ते अमेरिकेत आलेले आहेत...>>
तुम्ही नाही, तुमचे बाबा हाफ-प्यांट मध्ये असताना! असे मी कुठेतरी वाचले!

अमेरिकेत येणार्‍या प्रत्येक पिढीच्या समस्या वेगळ्या. पण समस्या आणि जुळवून घेणं यातून कोणी सुटलयं असं वाटत नाही. अमेरिकेत स्थायिक होणे, तेव्हा फार कठिण होते आणि आता फार सोपे झाले आहे असं अजीबात नाही.
भारतात बसून अमेरिकेतल्या जीवनाची पुरेशी माहिती मिळवण हे ६०-७० च्या दशकात आलेल्या लोकांना कठिण वाटलं असणार. आजकाल इंटरनेट्मुळे ते अगदीच सोपं झालं आहे. पण त्याचबरोबर अमेरिकेचे इमिग्रेशनचे कायदे ही आता जास्तच कडक आणि गुंतागुंतीचे बनत चालले आहेत. ६०-७० च्या दशकात भारतात आपल्या घरात बसून ग्रीनकार्ड मिळायचं असं ऐकलं आहे. हल्ली अमेरिकेत आल्यावरही ग्रीनकार्डसाठी १०-१२ वर्ष वाट पहावी लागते.