ग्राहक
उत्पादन नव्हे, अनुभूती विका!!(पूर्ण)
ऑडीटोरीयम:
"आपण उत्पादने नाही, अनुभूती विकणार आहोत ग्राहकाला.यापुढे मनाशी निश्चय करा.सुंदर ताज महाल आपले प्रतीस्पर्धी विकतात. आपण गिर्हाईकाला ताज महाल नाही विकायचा, त्याला 'मी ताज महाल, लिबर्टीबाईचा पुतळा, माचू पिचू, पिरॅमिड,बुर्ज खलिफा बनवू शकतो' हा आत्मविश्वास, ही अनुभूती विकायची आहे.गिर्हाईकाचा खिसा कोणीही टॉम डिक हॅरी जिंकतो. आपल्याला त्या खिश्याच्या खालचे त्याचे हृदय जिंकायचे आहे."
ऑनलाईन खरेदी आणि आपण
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
जागो ग्राहक जागो....
आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने...
ग्राहक म्हणून आपल्याला आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्वांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील अशी अपेक्षा आहे.
माझे [ सध्या लगेच आठवणारे ] दोन अनुभव..
*****************************************************************
लै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक.
स्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच.
दिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही.
वेळ: दुपारी १:००
ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता
''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''
''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''
अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.
ग्राहकांची दिशाभूल
ग्राहकांची दिशाभूल
एखाद्या वस्तू संदर्भात विशेष करून खाद्यवस्तूसंदर्भात वेष्टन कायद्यानुसार त्या वस्तूसंदर्भातील संपूर्ण तपशील कंपनीने वेष्टनावर लिहिणे बंधनकारक असते. त्यानुसार सदर मजकूर बारीक अक्षरांमध्ये वेष्टनावर लिहिलेला असतो. पण तो वाचण्याचे आपण कष्ट घेत नसतो. तो वाचल्यानंतर कित्येकदा आपणास त्रुटी आढळतात. कित्येकदा त्यावर धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात. अशा सूचना व त्रुटी सर्वांना कळाव्यात म्हणून हा धागा काढलेला आहे. तरी सर्वांनी आपापल्या परीने योगदान करावे.
आपण आग्रही ग्राहक
बरेचदा घरातील महत्चाच्या वस्तु खरेदीच्या वेळी आपल्याला चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली जाते. कधीकधी मुळातच खराब असलेली वस्तु गळ्यात मारली जाते. अशा प्रसंगात एक ग्राहक म्हणून जर आपण नेट लावून आपल्यावर झालेला अन्याय दूर केला असेल तर असे अनुभव सगळया मायबोलीकरांकरता शेअर करूयात. यात घरातील व्हाईट गुड्स (टिव्ही, फ्रीज, मिक्सर, एसी, कॉम्प्युटर बगैरे), फर्निचर आणि इतर सेवासुविधा (फोन, गॅस, इंटरगेट, टिव्ही कनेक्शन वगैरे) इ.च्या खरेदीच्या वेळी आलेले अनुभव द्यावेत.
ग्राहका, फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान...!!!
खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसर्या कुणासोबर घडणार नाही:
"माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे.
अचानक मला सप्टेंबर २०१० ला एस एम एस आला की कागदपत्रके जमा करा.
४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसर्याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले.
१६ तारखेला परत एस एम एस आला होता की कागदपत्रके परत जमा करा.
दसर्याला १७ ऑक्टॉबरला त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
ऑफिसचे कॉल महत्त्वाचे असल्या कारणाने मी दुसर्या कंपनीचा नंबर घेतला.
मग काही दिवस आयडीयाचे ऑफिस बंद होते.