मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.
धन्यवाद.
आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे..ठरवून घेतला नाही.. सुरुवातीला हा निर्णय किंवा विचार जयच्या गळी उतरवायला वेळ लागला... टीव्ही नाही म्हणजे आपल्या जगण्यातला एक महत्वाचा हिस्सा नाही, आपण इतरांपेक्षा मागे राहू, आसपासच्या जगामध्ये, आपण जिथे काम करतो त्या इंडस्ट्री मध्ये काय चाललंय आपल्याला कळणार नाही, अशी काहीतरी भावना त्याच्या मनात असावी... त्याला मी समजावलं, ट्रायल बेस वर हे करून बघूया, काही अडलं तर घेऊ की टीव्ही.. असं म्हंटल्यावर तो तयार झाला...
सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सेट टॉप बॉक्सेस अन रिलेटेड गोष्टी आहेत. मला सेट टॉप बॉक्स घ्यायचा आहे तर सल्ले, कुणाचे अनुभव अन अर्थात मन्थली कॉस्टींगच्या चर्चेकरता हा धागा.
मला हव्या असलेल्या गोष्टी -
- उत्तम सेल्स अन आफ्टर सेल्स सर्वीस
- फुल एच्डी रिझॉल्यूशनचे (१९८० बाय १०८० पिक्सल्स) जास्तीतजास्त चॅनल्स
- रिचार्ज चे सोपे पर्याय
- पावसाळ्यात कमीतकमी वेळ टीव्ही बंद (बहुतेक डिशांना हा प्रॉब्लेम आहेच, पण त्यातल्यात्यात कमी असलेली पाहातोय)
- सध्यातरी फक्त एच्डी बॉक्सेसच पाहातोय, रेकॉर्डिंगवाले, ४के वाले सध्या विचारात नाही घेतलेत. पण त्याविषयी मतं, चर्चा, अनुभव चालतील.
LED आणि LFD मध्ये काय फरक असतो? LFD ला सेट टोप बॉक्स जोडून टिव्ही दिसू शकतो का?
बरेचदा घरातील महत्चाच्या वस्तु खरेदीच्या वेळी आपल्याला चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली जाते. कधीकधी मुळातच खराब असलेली वस्तु गळ्यात मारली जाते. अशा प्रसंगात एक ग्राहक म्हणून जर आपण नेट लावून आपल्यावर झालेला अन्याय दूर केला असेल तर असे अनुभव सगळया मायबोलीकरांकरता शेअर करूयात. यात घरातील व्हाईट गुड्स (टिव्ही, फ्रीज, मिक्सर, एसी, कॉम्प्युटर बगैरे), फर्निचर आणि इतर सेवासुविधा (फोन, गॅस, इंटरगेट, टिव्ही कनेक्शन वगैरे) इ.च्या खरेदीच्या वेळी आलेले अनुभव द्यावेत.