Submitted by aschig on 12 March, 2012 - 19:56
बिग बँग थेअरी वर येथे चर्चा झाली आहे का? असल्यास सांगा - तिथे उडी मारेन.
आत्ता हे आठवायचे कारण म्हणजे सध्या स्टिफन हॉकींग कॅलटेकला आहेत (त्यांचा वार्षीक दौरा) आणि ते चक्क ५ एप्रीलच्या बिग बँग थेअरीच्या प्रकरणात अवतरणार आहेत.
http://www.cbs.com/shows/big_bang_theory/photos/62583/behind-the-scenes/...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी शेल्डनचा फॅन आहे!!!
मी शेल्डनचा फॅन आहे!!!
गल्ली चुकलो .. मला वाटले की
गल्ली चुकलो .. मला वाटले की LHC बद्दल आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण फॅन. परवा एक एपिसोड
मी पण फॅन. परवा एक एपिसोड दाखविला त्यात चक्क स्टीव वॉझनिअॅक आले होते. शेल्डन रोबॉट एपिसोड. खूप संवाद पाठ आहेत. लैच भारी सीरीअल.
सध्या स्टिफन हॉकींग कॅलटेकला
सध्या स्टिफन हॉकींग कॅलटेकला आहेत (त्यांचा वार्षीक दौरा) आणि ते चक्क ५ एप्रीलच्या बिग बँग थेअरीच्या प्रकरणात अवतरणार आहेत. >> वॉव.
आम्ही पण फॅन .... सगगळी गँगच
आम्ही पण फॅन .... सगगळी गँगच गॉन्केस आहे आणि शेल्डन म्हणजे कळस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी पाहते..पण फॅन
मी पाहते..पण फॅन नाही...friends वर एक धागा सुरु करावा का असा एक विचार आला माझ्या मनात...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगगळी गँगच गॉन्केस आहे आणि शेल्डन म्हणजे कळस>>>> +१...
बाकी शेल्ड्न सारख एका दमात भरपुर वाक्य कोनीच नाही बोलु शकत
पेनी शेल्डनची रिअल लाईफमधे
पेनी शेल्डनची रिअल लाईफमधे गर्लफ्रेंड आहे म्हणे .....
बिग बँग सिरीयल की हॉकिंग:p
बिग बँग सिरीयल की हॉकिंग:p
आगाऊ, म्हणजे तु हॉकींगचा
आगाऊ, म्हणजे तु हॉकींगचा स्क्वेअर फॅन झालास की!
जेम्स बाँड, मोठेच कोडे आहे - शेरलॉक होल्म्सला बोलवावे लागणार.
की सोडवता तुम्हीच?
इथे अजून १-४ सीझनचे रिरन्सच
इथे अजून १-४ सीझनचे रिरन्सच दाखवतायत.
सगगळी गँगच गॉन्केस आहे आणि शेल्डन म्हणजे कळस << अगदी अगदी!
जेम्स बाँड, मोठेच कोडे आहे -
जेम्स बाँड, मोठेच कोडे आहे
- शेरलॉक
होल्म्सला बोलवावे
लागणार.
की सोडवता तुम्हीच?>>>शेरलॉक होम्स आहे का माबोवर?
आतापर्यंतच्या रिस्पॉन्सेसवरुन
आतापर्यंतच्या रिस्पॉन्सेसवरुन वाटतय की यावरचा धागा नव्हता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांगातर आपापले फेवरेट BBG मॉमेंट्स!
००७, तुमच्या प्रश्नाचे उत्तर ब्रेक के बाद.
फेवरेट मोमेंट- शेल्डन विरुद्ध
फेवरेट मोमेंट- शेल्डन विरुद्ध बाकी सगळे अशी फिजिक्सची क्विझ काँपिटिशन असते तो एपिसोड!
किंवा लिओची आई त्याला भेटायला येते तो भाग!
मस्त धागा. आस्चिगचे पोस्ट
मस्त धागा.
आस्चिगचे पोस्ट वाचल्यावर मला कित्येकदा शेल्डनची आठवण येते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राजचे काम करणार्या मुलाची अॅक्टिंग भारी आहे एकदम.
पहिले शेल्डनच्या प्रेमात सर्व
पहिले शेल्डनच्या प्रेमात सर्व असतात पण विचार केल्यास लक्षात येते कि लेनर्ड जास्त गोड व "लिव्हेबल विथ" आहे. हॉवर्ड ची आई त्याची इतकी काळजी घेते कारण त्याला काहीतरी हार्ट चा विकार आहे. म्हणूनही तो इत्का नाजूक आहे बहुतेक. हॉवर्ड ची आई, शेल्डनची आई, पेनी, सर्व रॉक. प्रत्येक भागाच्या शेवटी प्रोड्युसर चक लोरे चे एक कार्ड येते ते वाचता का? आम्ही भाग रेकॉर्ड करून मग ते नीट वाचून काढतो. मस्त असते.
फेवरिट बीबीजी मोमेंट्स? फार टू मेनी. क्काय क्काय ल्हायचे ? बझिंगा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मराठी संकेतस्थलावर अमेरीकन
मराठी संकेतस्थलावर अमेरीकन मालिकेची चर्चा कशाला? त्यापेक्षा अमरीश खंडात मायबोलीतील सीरीयल दिसत असतात त्याबघत चला.
मी/आम्हीही बिग बँग फॅन.
मी/आम्हीही बिग बँग फॅन. कॅरॅक्टर्स सगळीच आवडतात पण शेल्ड्न, लेनर्ड जास्त आवडते.
लाजो, पेनी रिअल लाईफमध्ये शेल्डनची नव्हे, लेनर्डची गर्लफ्रेंड होती. पण त्यांचं ऑलरेडी ब्रेकप झालंय. शेल्डन बहुदा 'आनंदी' आहे.
पेनी सगळ्या गीक आणि नर्डी
पेनी सगळ्या गीक आणि नर्डी लोकांचा महाकचरा करते ते मला जाम आवडतं.
शेल्डन तिचा कचरा करतो ते
शेल्डन तिचा कचरा करतो ते तिच्यापर्यंत पोचतही नाही आणि ती त्याची दखलही घेत नाही ते मला आवडतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शेल्डनची गर्लफ्रेंड तिच्या
शेल्डनची गर्लफ्रेंड तिच्या आईशी त्याची वेबकॅमवर ओळख करून देते तो भाग पाहिलाय का? इइइइइइ असं होतं..
पेनीचा युनिफॉर्म खर्या चिकेफॅच्या वेट्रेसेस सारखा नसतोच.. !
राज आणि हॉवर्ड बोर करतात मधे मधे...
तो हॉवर्ड मला बर्याचदा बोर
तो हॉवर्ड मला बर्याचदा बोर वाटतो. राजचा आधी कंटाळा यायचा पण आता रोज पाहिल्यावर नाही येत.
मला ते शेल्डनचे 'हाहा' फार आवडते.
आम्ही पण बिग फॅन फेव
आम्ही पण बिग फॅन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आताच्या सीझन ची सुरुवात पण याच्या कन्टिन्युएशन ने होती ... शेल्डन थिन्किन्ग अबाउट "इट्स नॉट व्हॉट इट लुक्स लाइक ...?" व्हॉट कुड शी बी पॉसिबली ट्रायिंग टु इम्प्लाय ... ??? ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
फेव एपिसोड्स
मागच्या म्हणजे सीझन ६ बहुधा - त्यातला शेवटचा भाग ज्यात , राज शेल्डन चा नवा रूम मेट बनतो आणि चुकून पेनी दारू पिउन राज बरोबर रात्र घालवते.महान होता हा भाग!!
त्याचा एन्ड - सकाळी बेल वाजते- शेल्डन दार उघडतो- दारात हॉवर्ड " आय हॅड अ फाइट विथ बर्नाडेट...बिकॉज शी गेव्ह मी धिस ब्यूटिफुल एक्स्पेन्सिव वॉच" शेल्डन क्लुलेस, मग एका पॉज नंतर ... , "लेनर्ड , डु यु अन्डरस्टॅन्ड धिस ???" (अॅक्चुअली बर्नाडेट ला जॉब मिळाल्याने तिने हॉवर्ड्ला महाग गिफ्ट्स देऊन त्याचा इगो हर्ट केला आहे) आणि त्याच वेळी राज अन पेनी बाहेर येतात.. सगळे अवाक (शेल्डन सोडून) !! पेनी- "ओ इट्स नॉट व्हॉट इट लुक्स लाइक" ...पुन्हा शेल्डन क्लुलेस "व्हॉट डज इट लुक लाइक???!!!" इथे एन्ड ..! अशक्य होता हा भाग!!
लेनर्ड - " लेटइट गो शेल्डन... दे स्लेप्ट टुगेदर..दॅट्स इट" शेल्डन पुन्हा- " बट दॅटस व्हॉट इट लुक्स लाइक सो वी कॅन रुल दॅट आउट बिकॉज शी क्लीयरली सेड, इट्स नॉट व्हॉट इट लुक्स लाइक "
शेल्डनचं बझिंगा, देअर देअर
शेल्डनचं बझिंगा, देअर देअर म्हणणं आणि चकल महान आहे.
हॉकिंगला विचारा, देव आहे का
हॉकिंगला विचारा, देव आहे का म्हणून. तो एकदा हो म्हणतो, एकदा नाही. इथे नुकताच एक धागा काधला आहे, त्या धाग्यावर लिहा म्हणावे.
शेल्डनचं बझिंगा, देअर देअर
शेल्डनचं बझिंगा, देअर देअर म्हणणं आणि चकल महान आहे. <<< +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण फॅन....एक नम्बर आहे ही
मी पण फॅन....एक नम्बर आहे ही सिरिअल ...
मी पण फॅन. सीरियल आवडतेच, पण
मी पण फॅन.
सीरियल आवडतेच, पण (परवा पार्ल्यातही बोलले होते) शेवटी चक लॉरीची व्हॅनिटी कार्ड्स दाखवतात तीही मजेशीर असतात.
पण मला ती एमी ज्या प्रकारे पेनीच्या मागे लागते ते दिवसेंदिवस अनॉयिंग वाटायला लागलं आहे.
एमी, पेनी आणि प्रिया यांचं एक
एमी, पेनी आणि प्रिया यांचं एक गॉसिप सेशन पाह्यलं पर्वा.. एमी सुपर डोक्यात गेली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एमी मठ्ठ आहेच पण मला प्रिया
एमी मठ्ठ आहेच पण मला प्रिया सुपर डोक्यात जाते.
त्या वॅनिटी कार्डसअकडे आम्ही कधी लक्ष दिलं नाहीये, ते आता देऊ.
ती प्रिया आवाजाच्या बाबतीत
ती प्रिया आवाजाच्या बाबतीत रानी मुखर्जीची बहिण आहे.
माझा अति फेवरेट सीन ज्यामधे लेनर्ड काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो पण कुणी त्याला बोलूच देत नसतं. तो आपला दरवेळेला "अम्म" "अम्म" इतकेच म्हणत असतो. त्यावर शेल्डन म्हणतो "इफ यु आर ट्रायिन्ग टू मेडीटेट देन राईट वर्ड इज ओम्म"![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages