Submitted by योकु on 26 May, 2015 - 11:28
सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सेट टॉप बॉक्सेस अन रिलेटेड गोष्टी आहेत. मला सेट टॉप बॉक्स घ्यायचा आहे तर सल्ले, कुणाचे अनुभव अन अर्थात मन्थली कॉस्टींगच्या चर्चेकरता हा धागा.
मला हव्या असलेल्या गोष्टी -
- उत्तम सेल्स अन आफ्टर सेल्स सर्वीस
- फुल एच्डी रिझॉल्यूशनचे (१९८० बाय १०८० पिक्सल्स) जास्तीतजास्त चॅनल्स
- रिचार्ज चे सोपे पर्याय
- पावसाळ्यात कमीतकमी वेळ टीव्ही बंद (बहुतेक डिशांना हा प्रॉब्लेम आहेच, पण त्यातल्यात्यात कमी असलेली पाहातोय)
- सध्यातरी फक्त एच्डी बॉक्सेसच पाहातोय, रेकॉर्डिंगवाले, ४के वाले सध्या विचारात नाही घेतलेत. पण त्याविषयी मतं, चर्चा, अनुभव चालतील.
या विषयावरचा धागा आधीच असेल तर कृपया आकडा देणे. हा धागा मग अॅडमिनला सांगून उडवता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मलाही एक प्रश्न विचारायचा
मलाही एक प्रश्न विचारायचा आहे. भारतात युएस्बी टोकनने जसे नेट वापरता येते तसे केबल कनेक्शनही कुठली कंपनी प्रोव्हाईड करते का?
टाटा स्काय. पन सर्विस
टाटा स्काय. पन सर्विस बेकार आहे. पावसाळ्यात डिस्टर्ब होणारच की. त्यावेळा त यू ट्यूब बघता येइल, किंवा हॉट स्टार आहे त्यावर टीव्ही.
डिश टिव्ही, व्हीडीओकॉन डीटुएच
डिश टिव्ही, व्हीडीओकॉन डीटुएच आणी एअरटेल पैकी एअरटेलचे रिसेप्शन पावसाळ्यात जास्त वेळा आणी जास्त वेळ बंद पडल्याचा अणभव आहे.
माझ्याकडे टाटा स्काय ५ वर्षे
माझ्याकडे टाटा स्काय ५ वर्षे होता,डिटिएच फ्री आठ वर्षे आहे आता डिश प्लस दोन वर्षे आहे. सर्व एसडी आहेत एचडी नाहीत. डिश प्लसचा चा फायदा हा आहे की रेकॅार्डींग पेन ड्राइवमध्ये करता येते स्वस्त हे शिवाय सरकारी फ्रि-टु-एर चे सर्व चानेल+रेडिओ एफेम ऐकता येते.
टाटा स्काय माळ्यावर पडून आहे घेऊन जा.(डिश+बॅाक्स+रिमोट+केबल+स्टँड)
पावसाने बंद सर्वच होतात कारण एक मिटर डिश असते,अगदी निकडीचेच असेल तर चार /सहा मिटर मोठी डिश टाका मोठा सिग्नल मिळतो.
चानेल्स:
साधारणपणे २५०/३५०च्या पॅकमध्ये कामाचे बरेच चानेल असतात.टाटाचे एक वार्षक रु पाच हजारचे पॅकेज घेतल्यास टाटाच्या पोतडितले सर्वच चानेल दिसतात
मला पण डिश प्लस ला कन्वर्ट
मला पण डिश प्लस ला कन्वर्ट करायचे आहे. टाटा बोअर झाले आहे.
टाटा स्कायने मधल्या काळात
टाटा स्कायने मधल्या काळात कसलेतरी अपग्रेड मारलेय. आणि त्यामुळे त्यांच्या सर्व्हीसचा जो काही बोर्या वाजलाय, तो वाजलाय! टाटा स्कायने हे प्रकरण व्यवस्थित डॉक्यूमेंट करून 'नियोजनशून्य अपग्रेड पद्धती: एक केसस्टडी' अशासारख्या नावाखाली विकायला ठेवावे, तुफान विक्री होईल.
तेव्हा त्या टाटास्कायला सध्या चार कोस दूर ठेवा. टाटास्काय सोडून बाकी कुठले चांगले आहे (आणि का?) ते मलाही सांगा.
ओके, टाटावर बर्यापैकी
ओके, टाटावर बर्यापैकी डिस्काऊंट मिळत होता. पण वरचे ऑलमोस्ट सगळेच प्रतिसाद टाटास्कायविरोधी आहेत. एअरटेअ मी अजून पाहीलेलं नाही. आता पाहीन. आतल्या गोटाची माहीती अशी आहे की टाटा स्काय एअरटेलकडूनच फीड्स विकत घेऊन ब्रॉडकास्ट करतं (खखोदेजा), सो एअरटेल पाहायला हवं.
I am happy with Tata Sky. I
I am happy with Tata Sky. I never face any problem during their upgradation drive & service is also quick (here in Gurgaon)
टाटास्कायचा इतका बोय्रा वाजला
टाटास्कायचा इतका बोय्रा वाजला आहे का? अजून चानेल दिसण्याचा झमेला सुटला नाही का?
आमजनता साध्या टिव्हिवरच कार्यक्रम पाहाते त्यामुळे एसडी चानेल सेट टॅाप बॅाक्स स्वस्त होत जाणार.
झीची डिशटिव्हि घ्या.
मंदार, मीही टाटास्कायसोबत खूष
मंदार, मीही टाटास्कायसोबत खूष होतो. अगदी मागच्या महिन्यापर्यंत. माझे शेजारी बोंबल बोंबल बोंबलत होते, पण मला काही प्रॉब्लेम येत नव्हता. पण जोपर्यंत तुम्हाला काही अडचण येत नाही तोवरच तुम्ही खूष राहा! असा प्रकार आहे तो.
माझ्या ऑफिसातल्या मुंबईला शिफ्ट झालेल्या एका सहकार्याने टाटास्कायकडे नवीन कनेक्शनची विचारणा केली असता, "आम्ही सध्या नवीन कनेक्शनांची नोंदणी स्थगीत केली आहे." असे सांगण्यात आले. मी मनातल्या मनात हुश्श्य केले! निदान नवीन ग्राहकांसाठी तरी झाकली मूठ लाखाची ठेवण्याची बुद्धी टाटास्कायला उशीरा का होईना झाली. मी माझी एक तक्रार / सेवा-विनंती ११- एप्रिलला नोंदवली आहे, तिचा अजून पाठपुरावा चालू आहे.
व्हिडीअाेेकाॅन बेस्ट
व्हिडीअाेेकाॅन बेस्ट
व्हिडीअाेेकाॅन बेस्ट<<+१११
व्हिडीअाेेकाॅन बेस्ट<<+१११
व्हिडीअाेेकाॅन बेस्ट
व्हिडीअाेेकाॅन बेस्ट आहे
ऐअटेल महाग आहे .. comparatively
रिलायन्सवाला कोणीच नाही काय?
रिलायन्सवाला कोणीच नाही काय?
गेली तीन वर्षे टाटा स्काय
गेली तीन वर्षे टाटा स्काय वापरत आहे, आजवर काहीच प्रॉब्लेम आला नाही. पावसाळ्यांत डिश बंद पडायह्च्या आमच्याकडे लाईट गेलेले असतात त्यामुळे फारसा त्रास तसाही होत नाही.
टाटा स्कायच्या सर्विसचाही आजवर चांगला अनुभव आलाय.
माझ्या ठाण्याच्या घरी टाटा
माझ्या ठाण्याच्या घरी टाटा स्काय आणि माटुंग्याच्या घरी रिलायन्स. दोन्हीचा अनुभव चांगला आहे.
टाटाने MPEG2 To MPEG4 अशी
टाटाने MPEG2 To MPEG4 अशी अपग्रेड केली आहे. ज्यांच्याकडे २ वर्षांपूर्वीचे बॉक्सेस आहेत त्यांना चॅनेल्स मध्ये प्रॉब्लेम येतोय. नवीन बॉक्स अपग्रेड केल्यावर हा प्रॉब्लेम सुटेल - नवीन कळालंय.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मी
दरम्यान, गेल्या आठवड्यात मी व्हिडिओकॉनची सेवा घेतली आहे आणि माझ्या टाटास्काय कृपेनं दोन महिने बंद असलेल्या टिव्हीचा पडदा जिवंत झाला आहे.