Submitted by हरिहर on 18 February, 2013 - 09:28
ग्राहकांची दिशाभूल
एखाद्या वस्तू संदर्भात विशेष करून खाद्यवस्तूसंदर्भात वेष्टन कायद्यानुसार त्या वस्तूसंदर्भातील संपूर्ण तपशील कंपनीने वेष्टनावर लिहिणे बंधनकारक असते. त्यानुसार सदर मजकूर बारीक अक्षरांमध्ये वेष्टनावर लिहिलेला असतो. पण तो वाचण्याचे आपण कष्ट घेत नसतो. तो वाचल्यानंतर कित्येकदा आपणास त्रुटी आढळतात. कित्येकदा त्यावर धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात. अशा सूचना व त्रुटी सर्वांना कळाव्यात म्हणून हा धागा काढलेला आहे. तरी सर्वांनी आपापल्या परीने योगदान करावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्यापासून सुरुवात करतो - मी
माझ्यापासून सुरुवात करतो -
मी तयार स्वीटकॉर्न सूपचे (क्नॉर कंपनीचे) पाकीट आणले होते. पाकिटावर मोठ्या अक्षरात "नो ऍडेड एम्. एस्. जी.' असे लिहिलेले होते. याचा अर्थ असा होतो की सूप पावडरमध्ये कंपनीने वरून एम्. एस्. जी. घातलेले नाही. पण मसाल्यामध्ये एम्. एस्. जी. असण्याची शक्यता आहे. कारण कन्टेन्टस्मध्ये इतर घटकांच्या बरोबरच स्पाइसेस् लिहिलेले आहे. पण स्पाइसेस्चे कन्टेन्टस् मात्र लिहिलेले नाहीत. हा काय प्रकार आहे? या कंपन्या "नो एम्. एस्. जी.' किंवा "एम्. एस्. जी." असे का बरे लिहित नाहीत ?