जाता जाता
जाता जाता पुन्हा तुला डोळेभरून पाहू दे
आठवणींचा तो एक कप्पा मनामध्ये राहू दे
नाही कुंदन नाही मोती नाही कसले हिरे
काळ्या निशेचे खोटे तारे तरी तुला वाहू दे
जातीखाली चिरडले असतील कितीतरी किडे
लाटांनी तरी किनाऱ्याला खरं प्रेम दाऊ दे
पाहिजे होेत कुणी गाणार आलापात गोडवे
राग माहीत नाही तरी देठापासून गाऊ दे
पायवाटा चुकल्या साऱ्या, काटे पायात टोचले
जखडलेल्या पायांनी मला तुझ्याकडे धावू दे