एक होती रात्र

Submitted by प्रतिक सोमवंशी on 6 April, 2019 - 14:15

एक होती रात्र, बोलण्यात गेली
लाख होते तारे, मोजण्यात गेली

मुकी ती, मुका मी, भावना बोलक्या
आसवे जाणिवांची पुसण्यात गेली

नभांचा किनारा, होता जरा पुसटसा
कित्येक पावसाळे, विसरण्यात गेली

नजरा चोरून आम्ही, बघितल्या कितीदा
ओल भावनांची, लपवण्यात गेली

तशी होती परि, अंतरे कोटींची
तरी का इज्जत, जनसामान्यात गेली

हवी आहे ‛प्रति’ , एक रात्र नव्याने
पुन्हा म्हणेल मी, बोलण्यात गेली
©प्रतिक सोमवंशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users