Submitted by प्रतिक सोमवंशी on 13 April, 2019 - 00:49
मी नसेल तेंव्हा, तुझ्या डोळ्यासमोर
गडद अंधार दाटून येईल
चाचपडशील, धडपडशील
ठेच लागल्यावर वेदनेत विव्हळशील
डोळ्यात अश्रू आले तर चटकन पुसशीलही
.
चाचपडताना, धडपडताना
कदाचित तुझा धक्का लागून
बेड जवळच्या साईडलॅम्प खालची
आपल्या दोघांची फोटो फ्रेम पडेलही
तू फक्त तिकडे जाऊ नकोस
कारण फुटलेली काच न तुटलेल नात खोल जखमा देऊन जात
.
घाबरशील, मला अंधारात शोधशीलही
पण तू माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीस
पोहोचूही शकणार नाहीस
.
कदाचित मी नसेलही, तुला सावरायला, तुला धीर द्यायला
कधीकाळी मी एक वचन दिलत तुला
“You will never walk alone”
म्हणून ठेवून जातोय तुझ्यासाठी
“एक टॉर्च, माझ्या कवितेची पुस्तके, आणि काही आठवणी”
जगशील ना?
©प्रतिक सोमवंशी
insta @shabdalay
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा