मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव
मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव
झणझणीत तर्री अर्धी वाटी
ओता त्यात होईल खाशी
नाकातोंडातून येईल धुर
मग दह्याने बदला नूर
असली मिसळ अन दहा पाव
खाऊन तर पहा राव
मिसळ पाव मिसळ पाव
मिसळ
रिकाम पणाची घेऊन बशी
आठवणींचे फरसाण भरी
चिरून कल्पनेचा कांदा
डोळ्यात श्रावण सरी
तीच आमची तर्री
सुखाचे खोबरे, मनाची कोथिंबीर
थोडं दुःखाचे मीठ भुरभुरी
करून शब्दांची मिसळ
वाट पाहतो मित्रांची
श्री च्या बाकड्यावरी
एकच आस मनी
भेटतील ऐका रविवारी
राजेंद्र देवी
कोल्हापुरातील बावड्याची मिसळ :- एक अनुभूती
शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार.
या अधी १/२ ठिकाणी हाच लेख लिहिलेला असल्यानी,अता बरेच जण आमच्या या करंट मिसळचे चहाते/भक्त झालेले आहेत,इथेही लिहायच होतच,आज मुहुर्त लागला...तर ठिकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी
"चल ए छोटूss त्या तीन नंबरवर फडका मार... ए बब्बन, त्या दोन पोरी केव्हाच्या बसल्यात बे, ऑर्डर घे ना बेटा त्यांची... हा बोलो साब..??",
"एक चिकन हंडी... पार्सल", मी मेनूकार्डवर नजर न टाकताच ऑर्डर केली.
"बस..."