मित्रहो, कदाचित हिरव्या मिरच्यांच्या खरड्या बाबत आणखी एखादा धागा असू शकतो. पण यू ट्यूब वर आढळलेला हा व्हिडीओ अफलातून आहे. रस्टिक आहे. वर्णन करणाऱ्या ताईही कोल्हापूर कडच्या दिसतात. त्यांच्या भाषेच्या लहेजाने व्हिडिओची आणि खर्ड्याचीही खुमारी वाढली आहे . अवश्य पहा आणि करून बघा....
ते सगळे फूड चॅनेल च भारी दिसते आहे....
(ही जाहिरात नव्हे )
https://www.youtube.com/watch?v=E11wbHRLWto
शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार.
फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!
कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!