या अधी १/२ ठिकाणी हाच लेख लिहिलेला असल्यानी,अता बरेच जण आमच्या या करंट मिसळचे चहाते/भक्त झालेले आहेत,इथेही लिहायच होतच,आज मुहुर्त लागला...तर ठिकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी
गाडि ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्या अट्टल गिर्हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री
आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल
हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते.
१)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा
तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात
) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर
हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले---
१)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं
२)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते
३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं
४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट
५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला
६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय...
७) ही...लागली बघा तर्री.....
८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड
९)उसळ फरसाण पोहे
१०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव
११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा
१२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी )
१३) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही
करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)
Submitted by अत्रुप्त आत्मा on 19 July, 2012 - 03:49
गुलमोहर:
शेअर करा
अहो अतृप्त आत्मा कुठे फेडाल
अहो अतृप्त आत्मा
कुठे फेडाल हे पाप? का असे जीवघेणे फोटो टाकताय?
इथे मिसळीची भूक डाळ तांदुळाच्या खिचडीवर भागवावी लागतेय.
अप्रतिम आलेत फोटो, भूक लागली फोटो पाहून.
आत्मा भौ... लै सुटला
आत्मा भौ... लै सुटला जनु.......
लै भारी राव... तुम्ही तर येकदम झकास फोटु काढु राहिलेत राव....
आता लंच टायमाला काय काय तरी चाळावणारे फोटु टाकताय.... काय करावं म्हणते मी आमच्या सारख्यांनी...
डोके फिरवलेत
डोके फिरवलेत
बाकीच्यांचे आत्मे अतृप्त करून
बाकीच्यांचे आत्मे अतृप्त करून तुम्हाला कसला आसुरी आनंद मिळतो हो?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या सारख्या मुंबैकरांचे कसे व्हायचे?
अहो अतृप्त आत्मा कुठे फेडाल
अहो अतृप्त आत्मा![Click to get more.](http://cdn.content.sweetim.com/sim/cpie/emoticons/000205AF.gif)
कुठे फेडाल हे पाप? >>>
असेच धागे टाकुन,इथेच फेडणार हे पाप....![Click to get more.](http://cdn.content.sweetim.com/sim/cpie/emoticons/000203FC.gif)
श्याआआआआआआआआ सगळ्या तोंडाची
श्याआआआआआआआआ सगळ्या तोंडाची चव घालवली....या तरीने......![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
कुफेहेपा.......![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अत्रुप्त आत्म्या, फोटु लई
अत्रुप्त आत्म्या, फोटु लई भारी राव.. पर आता आम्च्य आत्म्याच्या अत्रुप्तीचे काय?? आम्ही कधी येऊ म्हणताय मंगला थेटरापाशी?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आपण तर अत्रुप्त आत्मा
आपण तर अत्रुप्त आत्मा ह्यांच्या लिवन्याच्या ष्टाईलीचे फ्यान झालो बॉ.
उद्या ही मिसळ खावीच लागणार.
मस्त! लाइट मिसळ३) व्हाइट
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
याला मिसळ म्हणू नये. दगडाला पांडुरंग म्हटल्यासारखे आहे.
उद्याच धाड टाकते आता
उद्याच धाड टाकते आता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तोंपासु ( पाककृती विभाग
तोंपासु
( पाककृती विभाग धोक्यात आला भौतेक
)
आत्मा भाऊ.. पण करंट गॅरण्टेड ना ? रविवारी भेटूच !
)
( फार ब्रिगेड पण जवळच आहे तिथंच
माधव, >> आमच्या सारख्या
माधव,
>> आमच्या सारख्या मुंबैकरांचे कसे व्हायचे?
तुम्ही ठाण्याला येऊन मामलेदार मिसळीचा आस्वाद घेऊ शकता. ह्येबी येकदम पावरबाज व्होल्टेजकरंटवाली मिसळ हाय. ती मामलेदार कचेरीजवळच्या श्री उपाहारगृहात मिळते. सोबत महिलावर्ग असल्यास (अधिक खर्चिक) पर्याय म्हणून तिथूनच हाकेच्या अंतरावर आमंत्रण नावाचे दुसरे एक उपाहारगृह आहे. तिथेही हीच मिसळ मिळते. दोन्हींचे मालक एकच.
आ.न.,
-गा.पै.
मस्तच्,भारी एकदम.
मस्तच्,भारी एकदम.
अगगगगगगगगगगगगगगगगगगगगगग ...
अगगगगगगगगगगगगगगगगगगगगगग ... मेलो मेलो फोटो पाहूनच मेलो. इतकी जहाल पोस्ट मायबोलीवर क्वचितच पडली असेल......या अतृप्त आत्म्याला पोष्टी टाकायला बन्दी करा रे...... आता रात्र झाली आहे नाही तर आत्ताच गेलो असतो तिकडे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भारी..
भारी..
अहो अतृप्त आत्मा कुठे फेडाल
अहो अतृप्त आत्मा
कुठे फेडाल हे पाप? का असे जीवघेणे फोटो टाकताय?
इथे मिसळीची भूक फ्रोजन भाज्या खाऊन मिटवावी लागतेय त्याचं काय?? ( साभार दक्ष :P)
एक पांढरी मिस्सळ द्या की राव पाठवून...म्होरल्या वारीत कोल्हापूर करावंच म्ह्न्ते...कसं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फर्मास मिसळ !!! काय भन्नाट
फर्मास मिसळ !!! काय भन्नाट आहेत फोटो !!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिसळेची तर्री झकास बनवलेय,
मिसळेची तर्री झकास बनवलेय, तोपांसु
![hungry taz.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/hungry%20taz.jpg)
तुम्ही ठाण्याला येऊन मामलेदार मिसळीचा आस्वाद घेऊ शकता. >>>>>>>> कालच खाऊन आलो, नेहमीपेक्षा जरा जास्तच तिखट बनवलेली होती, मिरच्यांचे तुकडे बाजुला काढावे लागले,
Jabarahat!
Jabarahat!
आज साधा वरण-भात बनवायचा विचार
आज साधा वरण-भात बनवायचा विचार चालु होता..... हे फोटो बघुन विचार बदलत चालले आहेत..... काय काय जमवावे लागेल बरे अशी झणझणीत मिसळ बनवायला...... मिशन मिसळ सुरु झाले आहे घरात....... बाकी अतृप्त आत्मा, तुमची कल्पकता व रोजच्या रुटीन जीवनातील सौंदर्य तुम्ही खुप चांगले टीपता..... या फोटोंसोबत तुम्ही केलेले वर्णन तर फोटोंपेक्षा खुमासदार आहे..... ते फोटो नसले तरी तुम्ही केलेले त्या मिसळीचे वर्णन वाचुन देखील तोंडाला पाणी सुटेल......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम आलेत फोटो, भूक लागली
अप्रतिम आलेत फोटो, भूक लागली फोटो पाहून.>>>++१११
yummy फोटो...भूक लागली...
yummy फोटो...भूक लागली...
सामी क्वल्लापुरातली ही ठिकानं
सामी क्वल्लापुरातली ही ठिकानं कुटं हैता ते सांगावे. लौकरच क्वल्लापुरात जायचं हाय...
तसेच क्वल्लापुरात अप्रतिम नॉन्वेज कुठे मिळते? (ह्याबीबीशी विसंगत आहे पण माहीतगार सापडल्याने ल गे हाथ विचारून घेतोय)
गापै +१.... मागच्याच आठवड्यात
गापै +१....
मागच्याच आठवड्यात आमंत्रण मध्ये खाल्ली......
ही घ्या लिंक
http://www.themumbaicity.com/2011/10/21/mamledar-misal/
करंट लागला राव... प्रायश्चित
करंट लागला राव... प्रायश्चित म्हणून संध्याकाळी मामलेदारला हमखास हजेरी.
तोंडाला पाणी सुटलं राव ! ही
तोंडाला पाणी सुटलं राव !
ही काटा किर्र ची तर्री![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठे फेडाल हे पाप? का असे
कुठे फेडाल हे पाप? का असे जीवघेणे फोटो टाकताय?>>>>+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
केवळ तुमचे हे फोटो पाहिल्यामुळे काल आमच्या इथली फेमस मिसळ आणुन खावी लागली
(किती लोकांच डायेट मोडल्याच पाप तुमच्या माथी असेल देवच जाणे
छान
छान
@किती लोकांच डायेट मोडल्याच
@किती लोकांच डायेट मोडल्याच पाप तुमच्या माथी असेल देवच जाणे) >>>
डाएटिंग हा मानवी जीवनाला लागलेला शाप आहे,असं आमचं मत आहे.
ही काटा किर्र ची तर्री >>>
ही काटा किर्र ची तर्री >>> शेवटी ज्याची त्याची अवड हे मत मान्य करुनच, हे संगावसं वाट्टं की काटा किर्र ही मिसळ दगडुशेठ गणपति सारखी नुसती(च) नावानी फेमस झालेली आहे,अजुनही तिचे ठाई मिसळीच्या आत्म्यानी प्रवेश केलेला नाही....
Pages