Submitted by पाषाणभेद on 31 October, 2020 - 17:57
मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव
मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव
झणझणीत तर्री अर्धी वाटी
ओता त्यात होईल खाशी
नाकातोंडातून येईल धुर
मग दह्याने बदला नूर
असली मिसळ अन दहा पाव
खाऊन तर पहा राव
मिसळ पाव मिसळ पाव
एकदाच खा अन ढेकर द्या
उगाच नंतर जेवायचे काम नाय
नको ते इडली सांबर
पुन्हा घ्याल का पराठे नंतर?
मिसळीत आहे सारे गुण
एकदा खाल तर व्हाल टुन्न
हातावरचे अन पोटावरचे
एकच झाले मिसळीवरचे
केवळ नाव तुम्ही घ्याल
मिसळ खाल मिसळ खाल
मिसळ पाव मिसळ पाव
- पाषाणभेद
०१/११/२०२०
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटलं अमक्या तमक्या
मला वाटलं अमक्या तमक्या साईटची जाहिरात आहे
तोंपासु.. खाऊगल्लीत
तोंपासु.. खाऊगल्लीत आल्यासारखे वाटलं.. आता बनवावी लागणार मिसळ