नमस्कार!
जिएस्टी बद्दल सध्या वातावारण तप्त आहे. वेगवेगळे मेसेजेस फिरत आहेत. कुठलाही बदल स्विकारणे व तो अमलात आणणे हे अवघड असते. त्यातही भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये असे 'अमुलाग्र' बदल घडताना एक मोठे मंथन होणार यात शंका नाही.
जिएस्टी योग्य का अयोग्य, राजकीय का आर्थिक, दिशादर्शक का दिशाहीन... असले अनेक वाद संवाद सुरू असताना या सर्वाच्या पार्श्वभूमीवर हे एक अतीशय सुंदर ऊदाहरण आपल्या बरोबर शेयर करावेसे वाटले म्हणून हा ऊपद्व्याप.
" आपण नेहेमीच हा विचार करतो की देशाने मला काय दिलं... माझ्यासाठी काय केलं..? पण आपण देशासाठी काय करू शकतो हा विचार अधिक योग्य आहे व गरजेचा आहे.. जर प्रत्येकाने असा विचार केला तर खूप काही चांगलं घडू शकतं.."
हे शब्द आहेत या खालील बातमी मधील हॉटेल 'विनय' चे मालक श्री अनिल टेंबे यांचे.
गेले ७५ वर्षे अस्सल मराठी ऊपहारगृहाची परंपरा यशस्वीपणे चालवणार्या श्री टेंबे, त्यांचे सहकारी व हॉटेल ने घालून दिलेल्या या ऊदाहरणाबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत करावे तितके थोडे आहे. आजच्या जगात कस्टमर वा ग्राहका ला फायदा करून देण्याचा द्रुष्टीकोन ठेवणारे व्यापारी तसे खूपच कमी आहेत, त्यासाठी 'विनय' चे मन:पूर्वक अभिनंदन.
हे असेही होऊ शकते.
https://khabar.ndtv.com/news/mumbai/this-hotel-becomes-first-in-mumbai-t...
[श्री अनिल टेंबे म्हणजे 'बाबा' हे माझे सासरे आहेत.. हे माझे भाग्यच.]
ता.कः ही पोस्ट 'विनय' हॉटेल चे मार्केटींग म्हणून नव्हे तर मराठी व्यापार्याच्या सचोटीने धंदा करण्याचे कौतूक आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा व शेयर देखिल करा. एन्डिटीव्ही चा वार्ताहर नाश्ता करण्यासाठी सहज हॉटेल ला गेला असताना असे नविन रेट कार्ड बघून व कमी आलेले बिल बघून चक्रावला व त्याची बातमी झाली, ईतकच. बातमी ची मराठी लिंक सापडली तर ईथे अपलोड करेन.
जरा हटके आणि खुप छान पोस्ट
जरा हटके आणि खुप छान पोस्ट
जरा हटके आणि खुप छान पोस्ट
जरा हटके आणि खुप छान पोस्ट
<<
सहमत !
इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
छान.
छान.
छान.धन्यवाद.
छान.धन्यवाद.
मुद्दाम इथे सांगितल्याबद्दल
मुद्दाम इथे सांगितल्याबद्दल मनापासून आभार. सकारात्मक शेअर करण्याची एकूण नावड असलेल्या समाजात अशा गोष्टी खूप बऱ्या वाटतात वाचायला.
छान पोस्ट.
छान पोस्ट.
शुद्धलेखनावर जीएसटी बसवलाय का?
छान.
छान.
एक शंका, ह्या दरपत्रकात सगळ्या पदार्थांचे दर ५ रुपयांनी कमी केलेले दिसत आहे. अंदाजे ६ ते १३ % नी दर नेमके कशाच्या आधारे कमी केले आहेत? मालक उलढालीवर ५% कर भरणार आहेत का ?
मार्मिक त्याचे कारण
मार्मिक त्याचे कारण बातमीतल्या ह्या ओळीत आहे.
जीएसटी लागू होने के बाद मुंबई के एक होटल में सस्ता हुआ खाना सुर्खियां बटोर रहा है
काळजी घ्या. हे महागात पडू
हे महागात पडू शकतं मालकाला. आ बैल मुझे मार असा प्रकार नको व्हायला.
20 दिवसानंतर रेट परत 3 -5
20 दिवसानंतर रेट परत 3 -5 रुपयांनी वाढले तर परत कोण चेक करायला जाणार आहे?
नाही पडणार महागात... रेट कमी
नाही पडणार महागात... रेट कमी करुन धंदा वाढला तर फायदाच आहे की.
कालच व्हॉट्सप वर मेसेज फिरत
कालच व्हॉट्सप वर मेसेज फिरत होता कि वैशालि आणि व्याडेश्वर बहिश्कार टाका कारण त्यांनी जीएसटी मुळे १०-१५% दर वाढवले आहेत. खरेतर २-४% च्यावर इम्पॅक्ट येऊ नये.
चांगल्या बातमीला फक्त १२
चांगल्या बातमीला फक्त १२ प्रतीसाद, त्यातही काही शंकात्मक!
एकूणात आपल्याला आजकाल कुठल्या बातम्या व विषयांमध्ये स्वारस्य आहे याचे हे बोलके ऊ.दा. आहे.
[कोणे एक काळी ईथे प्रतिसादातील आकडा बघून I miss that tree view...! इथले वाचक त्या पोस्ट व साहित्याचा दर्जा ठरवत असत. गेल्या काही वर्शात चित्रं पालटलेले आहे. असो. वादग्रस्त, रंजक, अन काल्पनिक कहाण्यांचे बाफ दुथडी भरून वाहत आहेत त्यावरून हितगुजचे सांडपाणी कुजबूज आठवले.]
Great news..abhinandan.
Great news..abhinandan.
He hotel nakki kuthe ahe? Girgaon madhe? Thakurdwar la ahe la? Kadhitari jaycha yog ala tar nakki jayla avdel.
योग +१
योग +१
योग वाईट वाटून घेऊ नका,
योग वाईट वाटून घेऊ नका,
मी चंद्रशेखर टेंबे यांना वैयक्तिक रित्या ओळखतो , आणी ते सचोटीचे धंदा चालवतात यात शंकाच नाही, त्यांच्या सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल सुद्धा मला माहिती आहे आणी त्यांच्या बद्दल मला आदरच आहे.
मात्र त्यांनी कमी केलेली किमत हे मार्केटिंग गिमिक नाही हे कळण्यासाठी काही काळ जाण्याची गरज आहे असे मला वाटते.(हे मार्केटिंग गिमिक असण्यात पण काहीहि वाईट नाही कात्रण ते काहीही बेकायदेशीर करत नाहीयेत उलट हे मार्केटिंग गिमिक असले तर असल्या क्लेवर कॅम्पेन बद्दल त्यांचे कौतुकच आहे)
१) वस्तूंच्य किमती सरसकट ५ रु नि कमी केलेल्या दिसतात, ८० रुची डिश असो किंवा ३० रु ची असो , यात आकडेमोडीची सोय हा एक भाग आहे हे मान्य. हे tax component कमी केला या गोष्टीशी जुळत नाही
२) कदाचित GST बद्दल एकवाक्यता नाही म्हणून आत्ता कमी केलेत, नंतर फाईन ट्यून होऊन रेट वाढतील असे हि होऊ शकते
३) मात्र त्याचं वेळी किमती कमी करण्याच्या एका निर्णयाने त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली (पेपर मध्ये हॉटेल च्या नावा सकट, मेनू छापून आणणे या साठी प्रचंड प्रचंड मार्केटिंग बजेट लागले असते हे तुम्ही मान्य कराल )
४) अजून ३-4 महिन्यांनी हेच रेट असतील तर हॉटेलने खरोखरच किमती कमी केल्या असे म्हणता येईल.
तेव्हा लोकांना पण वेळ द्या , त्यांची खात्री पटली कि नक्की लोक कौतुक करतील.
तुम्ही त्यांचे संबंधी म्हणून अगदी नाव घेऊन प्रतिसाद लिहिला गैरसमज नसावा.
>>Thakurdwar la ahe la?
>>Thakurdwar la ahe la?
बरोबर! फणसवाडी नाका, बालाजी मंदीरा जवळ.
हॉटेल चे दोन मुख्य मालक भाऊ: श्री अनिल टेंबे व श्री चंद्रशेखर टेंबे. गेली ७५ वर्षे सर्वात प्रथम्/जुने व अस्सल महाराष्ट्रियन पदार्थांचे हॉतेल म्हणून अलिकडे BBC ने देखिल मुलाखत दाखवली होती. मुंबाईच्या फेमस गोदी स्फोटात/आगीत पहिले मोठे हॉटेल जळून खाक झाले. तरिही न डगमगता श्री. रामक्रूष्ण टेंबे यांनी पुन्हा नव्याने गिरगाव मध्ये ते उभारले. त्या काळी विनय 'हेल्थ होम' असे हॉटेल चे नाव देणार्या अस्सल मराठी मध्यमवर्गीय मनुष्याच्या जिद्द व नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाचे कौतूक करावे तितके थोडे आहे. गोदी भागातील एका रस्त्याला 'टेंबे गल्ली' नाव देखिल दिले गेलेल आहे. 'विनय' चा तीन पिढ्यांचा इतीहास फार रोचक व विस्मयजनक आहे.
ईथे माबो वर 'संवाद' सदरात तशी मुलाखत प्रसिध्ध करायचा विचार होता....शेट्टी लोकांनी काबीज केलेल्या या धंद्यात पुधील पिढीतील मराठी तरूणांनी ऊतरून काय करता येईल या अनुशंगाने ही मुलाखत घ्यायचा विचार होता. 'आम्ही सारे खवय्ये' च्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष खवय्या चा धंदा करणे म्हणजे काय हे मडता आले असते.
पण एकूणात आजकाल चांगले ऐकेणे, बोलणे, पहाणे, व पसरवणे याचे वावडे असल्याने स्वतःचा असा वेळ, त्यांचा बहुमूल्य वेळ, आणि माबो ची 'फुकट' सोय व सेवा खर्चि पाडावी का हे माहित नाही.
>>तेव्हा लोकांना पण वेळ द्या
>>तेव्हा लोकांना पण वेळ द्या , त्यांची खात्री पटली कि नक्की लोक कौतुक करतील
तुमचा प्रतीसाद थोडा self contradicting aahe. तुम्ही जर त्यांना ईतके चांगले ओळखत असला तर चांगली बातमी पसरवण्यासाठी वाट पहाय्ची गरज नाही. आणि आर्थातच जे प्रश्ण तुम्हाला आहेत त्याची थेट उत्तरे देखिल मग तुम्ही त्यांच्याकडे मागणे योग्य ठरेल?
मी वर लिहीले तसे हा बाफ फक्त एकूणात GST च्या अनुशंगाने एक चांगली बातमी देण्यासाठी होता. बाकी काही नाही.
(बाकी कुणि कधी कुठली बातमी पसरवावी हा ज्याचा त्याचा स्वारस्याचा विषय आहे हे मला मान्य आहे!).
धन्यवाद!
ता.कः चांद्रशेखर काका यांना अलिकडे दृष्टि व ऐकणे यात थोडी समस्या आहे. मात्र तुम्ही बाबा म्हणजेच अनिल टेंबे यांना खुशाल भेटून बोलू शकता. माझा संदर्भ दिलात तरी चालेल.
>>(पेपर मध्ये हॉटेल च्या नावा
>>(पेपर मध्ये हॉटेल च्या नावा सकट, मेनू छापून आणणे या साठी प्रचंड प्रचंड मार्केटिंग बजेट लागले असते हे तुम्ही मान्य कराल )
इथेच चुकलात. ती बातमी छापून आणलेली नाही... आणि बातमी साठी मेनु कार्ड मुद्दामून छापलेले नाही. असो. तुमचा दोष नाही. एकूणातच आजच्या बिकाऊ मिडिया मुळे सर्वांनाच ग्रुहित धरले जाते.
इती लेखनसीमा.
ईथे माबो वर 'संवाद' सदरात तशी
ईथे माबो वर 'संवाद' सदरात तशी मुलाखत प्रसिध्ध करायचा विचार होता....शेट्टी लोकांनी काबीज केलेल्या या धंद्यात पुधील पिढीतील मराठी तरूणांनी ऊतरून काय करता येईल या अनुशंगाने ही मुलाखत घ्यायचा विचार होता. 'आम्ही सारे खवय्ये' च्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष खवय्या चा धंदा करणे म्हणजे काय हे मडता आले असते.
पण एकूणात आजकाल चांगले ऐकेणे, बोलणे, पहाणे, व पसरवणे याचे वावडे असल्याने स्वतःचा असा वेळ, त्यांचा बहुमूल्य वेळ, आणि माबो ची 'फुकट' सोय व सेवा खर्चि पाडावी का हे माहित नाही.>>
योग ! असा विचार करुन कस चालेल? चान्गल प्रेरणादायी लोकाना हवच असत, माबोवर अशी वावटळ आली अन गेली, तुझ्या सारख्या जुन्या सदस्याला हे नव्याने सान्गायला नको. तेव्हा यावर लेख आला तर नक्किच आवडेल.
प्राजक्ता +१
प्राजक्ता +१
<गेली ७५ वर्षे सर्वात प्रथम्
<गेली ७५ वर्षे सर्वात प्रथम्/जुने व अस्सल महाराष्ट्रियन पदार्थांचे हॉतेल म्हणून अलिकडे BBC ने देखिल मुलाखत दाखवली होती. >
हे हॉटेल सर्वांत पहिलं किंवा जुनं निश्चित नाही. त्यापूर्वीच अनेक उपाहारगृहं सुरू झाली होती.
योग, चांगला उपक्रम आणि
योग, चांगला उपक्रम आणि अभिनंदन तुमच्या सासरेबुवांचं.
आजकाल वाईट (भ्रष्टाचार, फसवणुक, लबाडी इ.) बातम्यांचं प्रमाण कमी होउन अशा तर्हेच्या चांगला बातम्या कानावर येत असल्याने लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसणं कठीण आहे. त्यांची मनोवस्था ओळखुन त्यांना सावरायला थोडा वेळ द्या...
>>>>>>>>(पेपर मध्ये हॉटेल
>>>>>>>>(पेपर मध्ये हॉटेल च्या नावा सकट, मेनू छापून आणणे या साठी प्रचंड प्रचंड मार्केटिंग बजेट लागले असते हे तुम्ही मान्य कराल )
इथेच चुकलात. ती बातमी छापून आणलेली नाही...>>>>>>
मुद्दामहून छापून आणली नाही हे मलाही माहिती आहे, आणी मान्य आहे.
मात्र त्यांनी जी कृती केली त्यामुळे ती छापली गेली.
असो... विषयाला भलते वळण लागण्याआधी थांबतो.
>>हे हॉटेल सर्वांत पहिलं
>>हे हॉटेल सर्वांत पहिलं किंवा जुनं निश्चित नाही.
माझ्यासाठी नंबर १
>>त्यांची मनोवस्था ओळखुन त्यांना सावरायला थोडा वेळ द्या... Happy
बरं
मग 'माझ्यासाठी' हा शब्द तिथे
मग 'माझ्यासाठी' हा शब्द कृपया तिथे जोडा.
लोकांपर्यंत चुकीची माहिती जायला नको.
राज
राज
>>लोकांपर्यंत चुकीची माहिती
>>लोकांपर्यंत चुकीची माहिती जायला नको.
आता तुम्ही खुलासा केलाच आहे, अजून काय हवे. [त्या आधिची मराठी हॉटेल्स कुठली हे जाणून घेण्यात मला विशेष स्वारस्य नाही. आणि ती अजूनही सुरू आहेत का हेही माहित नाही. असो. विषय व मुद्दा भरकटू नये.]
>>लोकांपर्यंत चुकीची माहिती
>>लोकांपर्यंत चुकीची माहिती जायला नको.<<
कमाल आहे! सामान्य माणुस हे हॉटेल सर्वात जुनं आहे कि नाहि यावर शंका उपस्थित करत (वाद घालत) रहाणार कि किंमती कमी झाल्या यात समाधान मानणार?
>>कमाल आहे! सामान्य माणुस हे
>>कमाल आहे! सामान्य माणुस हे हॉटेल सर्वात जुनं आहे कि नाहि यावर शंका उपस्थित करत (वाद घालत) रहाणार कि किंमती कमी झाल्या यात समाधान मानणार?
हा बाफ भलत्याच कारणासाठी पन्नाशी वगैरे ओलंडतो की काय?
Pages