Submitted by राजेंद्र देवी on 26 June, 2019 - 07:07
मिसळ
रिकाम पणाची घेऊन बशी
आठवणींचे फरसाण भरी
चिरून कल्पनेचा कांदा
डोळ्यात श्रावण सरी
तीच आमची तर्री
सुखाचे खोबरे, मनाची कोथिंबीर
थोडं दुःखाचे मीठ भुरभुरी
करून शब्दांची मिसळ
वाट पाहतो मित्रांची
श्री च्या बाकड्यावरी
एकच आस मनी
भेटतील ऐका रविवारी
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद
धन्यवाद
करुण रसाने भरलेली मिसळीची बशी
करुण रसाने भरलेली मिसळीची बशी. संध्याछाया भिववती..