2 कप मटकी
2 मोठे चिरलेला कांदा
12-15 कढीपत्ता
20-25 लसूण
अदरक
2 चमचे मिसळ मसाला (सुहाना)
1/2 चमचे हळद पावडर
1 चमचा लाल तिखट
1 चमचा काळ तिखट
जिरे
मोहरी
2 बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
फरसाण
तेल
लिंबाचा रस
गुळ
१. मटकी संपूर्ण रात्री ७ ते ८ तासात भिजवून घ्या
२. एका कॉटन च्या कपड्यामध्ये मटकी मोड येण्यासाठी 5 ते 6 तास बांधून ठेवा
३. आता मटकी एका भांड्यामध्ये घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी , हळद , चवीनुसार मीठ घालून मिक्स करुन घ्या
४. मध्यम गॅसवर शिजवून घ्या (4 शिट्ट्या ) .(मटकी जास्त शिजवू नका )
- आता मिसळ कट / तर्री तयार करुन घेऊ
५. गॅसवर पॅन गरम करावे त्यामध्ये तेल घालावे
६. तेल गरम होत आले की त्यात जिरे,, मोहोरी घाला नंतर लसूण ,आल, कढीपत्ता मंद आचेवर 3 मिनिटे परतून द्यावे
७. चिरलेला कांदा घाला आणि नंतर ते रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे
८. आता गॅस बंद करा आणि लसूण ,आलं , कढीपत्ता ,कांदा मिश्रण थंड करा
९. मिक्सर मध्ये एकदम बारीक करुन घ्या (पाणी वापरू नका)
१०. आता एक पॅन घ्या,४ ते ५ मोठे चमचे तेल घ्या (त्याला जास्त तेल घ्यावे )
११. तेल गरम झाल्यावर मिक्सर मधले मिश्रण घाला
१२. मिश्रण (१० ते १२ मिनिटांपेक्षा जास्त)शिजवून घ्यावे .मध्ये मध्ये परतावे
१३. आता हळद, लाल तिखट, काळ तिखट, मिसळ मसाला घालून 5 मिनीटे परतावे (मध्ये मध्ये परतावे)
१४. आता पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे
आणि ते १० ते १५ मिनिटे मस्त उकळून घ्यावे
१५. १५ मिनिटांनंतर लिंबाचा रस घाला आणि गॅस बंद करा (तुम्हाला आवडत असेलतर तुम्ही गूळ/साखर घालू शकता)
१६. मिसळ सँपल / कट / तर्री तयार आहे
१७. आता कोळसा गॅसवर गरम करायला ठेवू , त्या दरम्यान प्लेटिंग सुरू करु
१८. आता मातीचे भांडे घ्या, प्रथम फरसाण घाला, नंतर मटकी , बारीक चिरलेली कांदा, कोथिंबीरआणि फरसाण घाला.
कोळसा गरम झाल्यावर तो स्टील वाटीत / लहान मातीच्या पणतीमध्ये घ्या . आत कोळसा ठेवून त्यात 2 चमचे तेल घालावे.
झाकण बंद करा
१९. 2 मिनिटांत झाकण काढा . कोळसा बाहेर काढून त्यामध्ये मिसळ सँपल / कट / तर्री घाला आणि निखारा / तंदूर मिसळ तयार आहे
.
**नमस्कार नम्रताज् कूकबुक हे माझ नवीन चॅनेल आहे युटूब वर .
https://www.youtube.com/channel/UCjsh6KtuWdhxlOjL5nqH6HQ
Namrata's CookBook या चॅनेलला सबस्क्राईब करा हि विनंती . बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हला नोटिफीकेशन येईल .
रेसिपी आवडलीतर नक्की लाइक करा,शेअर करा . जर काही प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.
मायबोली वर लिहीण्याचा हा माझा पहिला प्रयत्न आहे ,काही चूक झाली असेल तर समजून घ्या .
मटकी शिजवताना जास्त पाणी वापरु नये
रेसिपीचा पूर्ण विडिओ : https://youtu.be/EdGJ3gl36LY
धन्यवाद
तयार रेसिपीचा फोटो कसा टकावा
तयार रेसिपीचा फोटो कसा टकावा ?
मस्त आहे चॅनेल, केलं
मस्त आहे चॅनेल, केलं सबस्क्राईब.
चवदार आहे रेसेपी.
चवदार आहे रेसेपी.
कोळशावर तेल घातले तर फारसा चांगला फ्लेवर येत नाही. तुपाने छान स्मोकी फ्लेवर येतो असा माझा अनुभव. यात मी संडे स्पेशल मसाला व किंचीत बेसनपीठ भाजून घालते. दोन वेलदोडेही.
(कोळशाची ओळ जरा गडबडलीय वाटते. )
छान
छान
टायपिंग विंडोच्या खाली निळ्या
टायपिंग विंडोच्या खाली निळ्या अक्षरात इमेज आहे, त्याला क्लिक करून फोटो टाका
(No subject)
रेस्पी चांगली आहे.
रेस्पी चांगली आहे.
कोळशाचं वाक्यं जरा गडबडलंय.
आणि १०-१२ अदरक पण
बदल केला आहे
बदल केला आहे
धन्यवाद बोकलत, वैशाली हरिहर , BLACKCAT , सस्मित
@ वैशाली हरिहर पुढच्यावेळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की करुन बघेन .
मटकी जास्त शिजवायची नाहीये तर
मटकी जास्त शिजवायची नाहीये तर ४ शिट्ट्या जास्त नाही का होणार?
@ सस्मित
@ सस्मित
नाही माझा हॉकिन्स चा छोटा कुकर आहे . एका भांड्यामध्ये मटकी घेवून ४ शिट्ट्या मी घेतल्या होत्या ,तूम्ही विडिओ मध्ये बघू शकता मटकीचा गिचका झाला नाही
ओके
ओके
पाककृती छान, थोडेफार लूप
पाककृती छान, थोडेफार लूप होल्स आहेत (गूळ) पण चालेल.
चॅनेलसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. लवकरात लवकर मिलेनियर चॅनल होवो हीच सदिच्छा!
धन्यवाद महाश्वेता
धन्यवाद महाश्वेता
चॅनेलसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
चॅनेलसाठी मनःपूर्वक शुभेच्छा+१
चवदार पाककृती दिसते.
कालच मी बनवली मिसळ (बायकोला
कालच मी बनवली मिसळ (बायकोला वटपौर्णिमेनिमित्त आराम दिला ). चार शिट्ट्यामधे गिचका होत नाही. बेसन घातल्याने कांदा टोमॅटो बायन्डींग होते का?
तर्रीवर तवंग हवा असेल तर मसाला शिजल्यावर त्यात गरम पाणी घालावे
धन्यवाद सिद्धि
धन्यवाद सिद्धि
@ चिवट नक्की करुन बघेन
(No subject)
मस्त लिहिलंय.. करुन बघणार..!!
मस्त लिहिलंय.. करुन बघणार..!!
फोटो पोस्ट करताना जे एचटीएमएल
फोटो पोस्ट करताना जे एचटीएमएल कोड आलं, ("img src" पासून चं) ते कट पेस्ट करून मूळ धाग्यात अॅड करता येतं.
img src="https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67871/Nikhara%20image.jpg" हे सगळे चोचीच्या कंसात घातले की एचटीएमएल कोड तयार होईल.
रेसिपी लिहिताना त्यात इमेज देण्याची सोय नाही. त्यामुळे कोणताही वाहता धागा दुसर्या टॅबमधे उघडून इमेज पोस्ट करायचे कोड तयार करणे व ते इकडच्या रेसिपीमध्ये डकवणे हे काम मी करतो.
धन्यवाद DJ.. ,
धन्यवाद DJ.. ,
आ.रा.रा. खूप छान माहिती दिलीत