धर्म

धर्मो रक्षति रक्षितः

Submitted by maitreyee on 9 April, 2020 - 12:58

परवा टिव्ही वर स्पेशल ऑप्स ही सीरीज बघताना रॉ चे ब्रीदवाक्य दिसले
"धर्मो रक्षतो रक्षितः"
अर्थाचा नीट विचार केलेला नव्हता कधी पण आता केला. आणि डोक्याला किडा लागला.
प्रचलित अर्थ साधारण पणे - धर्माची रक्षा करणार्याचे रक्षण धर्म करतो असा काहीसा सांगितला जातो पण शब्दशः पाहिले तर तो अर्थ चुकीचा वाटतो.
धर्मो रक्षति - हे सरळ आहे , पण धर्मो रक्षति रक्षकः असे नसून ते "रक्षितः" असे आहे. रक्षित = ज्याचे रक्षण केले गेलेले आहे असा होतो. ज्याने त्या ओळीचा अर्थ बदलतो! मग मी तो पूर्ण श्लोक शोधला तो असा :
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः

शब्दखुणा: 

गांधारी एक अद्वितीय नारी (भाग १)

Submitted by Swamini Chougule on 11 December, 2019 - 09:47

सूर्य मावळतीला झुकत चालला होता.सूर्याचा लाल गोळा आकाशात केसरी रंगाची उधळण करत होता. संपूर्ण सृष्टि अंधाराची चादर पांघरूण निद्राधीन होण्यासाठी सज्ज होत होती.आकाशात पक्षांचे थवेच्या -थवे घरट्याकडे उड्डाण करत होते.नदी घाट शांत होता.गुरेढोरे दावणीकडे निघाली होती.हस्तिनापूरची प्रजा ही आप आपली कामे उरकण्यात मग्न होती.शेतकरी शेतातून घरी निघाले होते.व्यापारी दुकाने बंद करण्याच्या तयारीत होते. लहान मुले अजून ही खेळण्यात गुंग होती. कुठे स्त्रीयांची दिवे लावण्याची लगबग सुरू होती तर कुठे स्त्रीया रात्रीचे भोजन रांधत होत्या.

विषय: 
शब्दखुणा: 

धर्म - एक अनवट सिनेमा

Submitted by टोच्या on 20 December, 2018 - 08:24

धर्म. प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा (अन् वादाचाही) विषय. प्रत्येक धर्माची इमारत विशिष्ट मूलतत्त्वांच्या पायावर उभी असते. आज ही मूलतत्वे सर्रास पायदळी तुडवली जाताना दिसतात. धर्माची सोयीने व्याख्या केली जाते. आपापल्या मनाप्रमाणे त्यातील मूलतत्वांचे, नियमांचे अर्थ लावले जातात. मात्र, एखादा असाही असतो, की ज्याची धर्मावर जीवापाड श्रद्धा असते. नव्हे, धर्मपालन हेच जीवन असते. आणि जीवन तर अकल्पित असते. एखादी अशी घटना अचानक घडून जाते की त्यावेळी धर्म म्हणजे नेमके काय, मानवी नीतीमूल्ये महत्त्वाची की धर्माने घालून दिलेली कठोर बंधने महत्त्वाची, असे प्रश्न पडतात.

विषय: 

विज्ञानवाद आणि आस्तिकता

Submitted by नानाकळा on 12 August, 2017 - 23:27

या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.

अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?

विषय: 

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

Submitted by मार्गी on 29 July, 2017 - 04:30

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

Submitted by मार्गी on 19 April, 2017 - 10:51

नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

दि. ३ जुलै २०१६
प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी!

जुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 2 April, 2017 - 04:17

द न्यू ऑर्डरः
१. स्वातंत्र्य, समता, बंधुता
२. पूर्वीच्या राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य, इथून पुढे जे काही वाढीव आहे त्यात समता, बंधुता
पूर्वीचा राज्यकर्ता कोण? धर्म! मागची असमानता? ती पुढे चालूच. मग ,
३. धर्मापासून स्वातंत्र्य, फक्त संधींत समता, बंधुता
जे धार्मिक आहेत त्यांचं काय? त्यांना त्यांचा मूर्खपणा सोडायचा नाही आणि जबरदस्ती सोडून घेता येता नाही. समतेचे निकष काय? तर जे नैसर्गिक आहे त्या पुढे काही करायची धमक नाही, मग

एक वादळी जीवन: ओशो!

Submitted by मार्गी on 25 January, 2017 - 00:05

एक वादळी जीवन: ओशो!

सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - धर्म