अरुण जोशी

सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु!

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 14 April, 2017 - 08:42

आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो.
==============================================================

काय वर्णावे गुंतवणूकदाराचे कौतुक?

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 11 April, 2017 - 05:24

"समजा" मी तुम्हाला १०० रुपये "फ्रीमधे" दिले आणि त्याचे काहीतरी करा म्हटले, तर तुम्ही खालीलपैकी काय करणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्याची उत्तरं काहींना ठावी असतात, काहींना नाही. काहींना उत्तरांची कारणं माहित असतात आणि काहींना मात्र उत्तरांची कारणं माहित नसू शकतात. पण मी तो प्रश्न विचारत नाहीय.

आता या शंभर रुपयांकडून मला पुढे काही अपेक्षा नाही. दिले परत,चालेले, न दिले चालेल. मी फुकट पैसे घेत नसतो असे म्हणणारे असाल तर समजा कि हे पैसे तुमच्याकडे अस्सेच कुठूनतरी आले आहेत. असले कुठलेही वाद घालायचे नाहीत.

एका धर्मांतराची कथा

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 6 April, 2017 - 12:28

लग्न होऊन दोन दिवसही लोटले नव्हते तोवर बायको म्हणाली, "मुझे और एक शादी करनी है।"
"English please, " मी म्हणालो.
बायकोच्या बोलण्याचा न पटण्याजोगा अर्थ निघायला लागला कि मी तिला इंग्रजीत बोलायला सांगतो. मुद्दा असा होता कि दिल्लीतलं आमचं लग्न तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे नातं मान्य होतं, विधी मान्य नव्हते. तर अजून एकदा तिकडच्या पद्धतीने लग्न करावं लागणार होतं.

विषय: 

जुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 2 April, 2017 - 04:17

द न्यू ऑर्डरः
१. स्वातंत्र्य, समता, बंधुता
२. पूर्वीच्या राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य, इथून पुढे जे काही वाढीव आहे त्यात समता, बंधुता
पूर्वीचा राज्यकर्ता कोण? धर्म! मागची असमानता? ती पुढे चालूच. मग ,
३. धर्मापासून स्वातंत्र्य, फक्त संधींत समता, बंधुता
जे धार्मिक आहेत त्यांचं काय? त्यांना त्यांचा मूर्खपणा सोडायचा नाही आणि जबरदस्ती सोडून घेता येता नाही. समतेचे निकष काय? तर जे नैसर्गिक आहे त्या पुढे काही करायची धमक नाही, मग

रैना

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 14 March, 2017 - 09:59

ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.

विषय: 
Subscribe to RSS - अरुण जोशी