"समजा" मी तुम्हाला १०० रुपये "फ्रीमधे" दिले आणि त्याचे काहीतरी करा म्हटले, तर तुम्ही खालीलपैकी काय करणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्याची उत्तरं काहींना ठावी असतात, काहींना नाही. काहींना उत्तरांची कारणं माहित असतात आणि काहींना मात्र उत्तरांची कारणं माहित नसू शकतात. पण मी तो प्रश्न विचारत नाहीय.
आता या शंभर रुपयांकडून मला पुढे काही अपेक्षा नाही. दिले परत,चालेले, न दिले चालेल. मी फुकट पैसे घेत नसतो असे म्हणणारे असाल तर समजा कि हे पैसे तुमच्याकडे अस्सेच कुठूनतरी आले आहेत. असले कुठलेही वाद घालायचे नाहीत.
तर प्रश्न असा आहे कि पैश्यांचे काय करायचे यासाठी ज्याच्याकडे पैसे आहेत (म्हणजे तुमच्याकडे) त्याच्याबद्दल कोणकोणती माहीती माहित असणे आवश्यक आहे? म्हणजे काय गुंतवणूकांचे पर्याय ५०-६० आहेत त्यातले कोणते बरे वाईट ही सगळी माहिती आहे. त्याचे सगळे तपशील माहित आहेत. गुंतवणूक काही का असेना, गुंतवणूकदाराबद्दल काय काय माहित असलं पाहिजे? What ALL should be known about investor irrespective of what is the nature of investment? बनवता येते का एक लिस्ट बघु पाहू!
ज्याच्याकडे पैसे आहेत (म्हणजे
ज्याच्याकडे पैसे आहेत (म्हणजे तुमच्याकडे) त्याच्याबद्दल कोणकोणती माहीती माहित असणे आवश्यक आहे? >> konala havi hi mahiti ani kashala?
छान सुरुवात. पुढचा भाग लवकर
छान सुरुवात. पुढचा भाग लवकर लिहा.
नताशा, ही माहिती सर्वांनाच
नताशा, ही माहिती सर्वांनाच हवी. निर्णयाची योग्यता ठरवण्यासाठी वा तसलेच काही असे तूर्तास समजा.
एक सुचवू का?
एक सुचवू का?
१०० रु. म्हणजे फार नाहीत. जरा ५० लाख अशी तरी रक्कम ठेवा.
शिवाय काय कराल म्हणजे कुठे गुंतवणूक करावी किंवा खर्चहि कुठे करावे याबद्दल माहिती सांगितलीत तर त्याचा उपयोग होईल.
मग ५० लाखच काय अगदी पाच लाख असले तरी या माहितीचा उपयोग होईल.
धन्यवाद.
मलाही नीट समजले नाही. समजा अ
मलाही नीट समजले नाही. समजा अ ला पैशाची गरज आहे, आणि ब कडे ते आहेत.
इथे तुम्ही स्वतःला अ च्या भूमिकेतून "ब" बद्दल माहिती शोधताय, की ब कडे पैसे आहेत आणि विविध पर्याय असू शकतात - ते कोणते व कशी तुलना करायची -अशा अर्थाने लिहायचे आहे?
नन्द्या, रक्कम हवी ती रीयल
नन्द्या, रक्कम हवी ती रीयल संख्या घ्या.
===================
फारएन्ड, त्या देण्याने कोणती लायाबिलिटी येणार नाही असे लिहायचे आहे.
>>. गुंतवणूक काही का असेना,
>>. गुंतवणूक काही का असेना, गुंतवणूकदाराबद्दल काय काय माहित असलं पाहिजे? What ALL should be known about investor irrespective of what is the nature of investment? >>
गुंतवणूकदारा बद्दल कोणाला माहिती हवी? स्वतः गुंतवणूकदारालाच?
म्हणजे मी इम्पल्सिव्ह आहे, हावरट आहे, कुठे थांबायचं कळत नाही, फारच कोन्झर्व्हेटिव्ह आहे, रिस्कपासून दूर पळतो अशी सेल्फ माहिती असली की कुठली गुंतवणूक सोयीची पडेल ते मला शोधता येईल या अर्थाने का?
>>तर प्रश्न असा आहे कि
>>तर प्रश्न असा आहे कि पैश्यांचे काय करायचे यासाठी ज्याच्याकडे पैसे आहेत (म्हणजे तुमच्याकडे) त्याच्याबद्दल कोणकोणती माहीती माहित असणे आवश्यक आहे? म्हणजे काय गुंतवणूकांचे पर्याय ५०-६० आहेत त्यातले कोणते बरे वाईट ही सगळी माहिती आहे. त्याचे सगळे तपशील माहित आहेत. गुंतवणूक काही का असेना, गुंतवणूकदाराबद्दल काय काय माहित असलं पाहिजे? What ALL should be known about investor irrespective of what is the nature of investment?<<
जोशीसाहेब, प्रश्न थोडा अँबिग्युअस आहे. इन्वेस्टर्स किंवा त्या कस्टमर सेगमेंटचं तुम्हाला मार्केट बास्केट अॅनलिसिस करायचं आहे (फायनांशियल ब्रोकर, प्लॅनरच्या द्रुष्टिकोनातुन) - हा अर्थ मी काढला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे अश्या अनेक संस्था आहेत
म्हणजे मी इम्पल्सिव्ह आहे, हावरट आहे, कुठे थांबायचं कळत नाही, फारच कोन्झर्व्हेटिव्ह आहे, रिस्कपासून दूर पळतो अशी सेल्फ माहिती असली की कुठली गुंतवणूक सोयीची पडेल ते मला शोधता येईल या अर्थाने का?
हेहि महत्वाचेच, त्या साठी खालील वाचा.
इथे अश्या अनेक संस्था आहेत ज्या तुमचे पैसे गुंतवतील, सांभाळतील, नि त्यासाठी भरपूर फी पण घेतील. आता मला स्वतःला गुंतवणुकीबद्दल ढिम्म काही कळत नाही म्हणून झक मारत मी त्यांना पैसे देतो. ते दर सहा महिन्यांनी मला फोन करून बरेच प्रश्न विचारतात - जसे तुमचा लाँग टर्म गोल काय? ग्रोथ, इन्कम? किती रिस्क घेऊ शकाल १ ते १० च्या दरम्यान? जर एखादा फंड किंवा स्टॉक तोट्यात जात असेल तर किती वर्षे तुम्ही तो परत वर यायची वाट पहाल? का घाबरून तो विकून टाकावा असे तुमचे मत आहे? तुम्हाला स्वतःला कुठल्या प्रकार ची गुंतवणूक करायची इच्छा आहे? रिअल इस्टेट, कमॉडिटी, सोने चांदी? भारत चीन, द. अफ्रिका वगैरे ठिकाणी गुंतवणुक करण्यास तुमची हरकत आहे का? इ. इ. अनेक., मुख्यतः तुमची मिळकत किती, किती वर्षे ही मिळकत चालू राहील? तुमचे मासिक. वार्षिक खर्च किती, मोठे खर्च जसे गाडी, घर घेणे , जगप्रवास असे काही ठरत आहे का? अचानक मिळकत बंद झाली तर सहा महिने किंवा वर्षभर तुम्हाला पैसे पुरतील अश्या ठिकाणी ते ठेवले आहेत की तेहि गुंतवले? कारण २००८ मधे इथे गुंतवलेल्या पैशाचे नुकसानच झाले, न गुंतवलेले तेव्हढेच राहिले.
तर असे अनेक प्रश्न विचारून ते ठरवतात की कुठे तुमचे पैसे गुंतवावेत. बहुधा डायव्हर्सिफिकेशनवर त्यांचा भर असतो - स्टॉक वर गेले तर बाँड खाली जातात नि स्टॉक खाली गेले तर बाँड वर जातात. किती टक्के स्टॉकमध्ये ठेवायचे नि किती बाँडमध्ये हे तुमचे वय, किती वर्षे मिळकत चालू राहील, किती रिस्क घ्यायची तयारी आहे यावर अवलंबून असते. कारण स्टॉकमधे रिस्क जास्त पण फायदाहि जास्त, बाँड मात्र रिस्क कमी, फायदाहि कमी.
खरे तर या मायबोलीवरच ही माहिती आहे. आणि अनेक लोकांनी या बद्दल मायबोलीवरच लिहीले आहे.
अमितव, पर्फेक्ट!!!
अमितव, पर्फेक्ट!!!
राज, कोणकोणाच्या दृष्टीने काय
राज, कोणकोणाच्या दृष्टीने काय काय माहित असणे आवश्यक आहे? सर्वप्रथम गुंतवणूकदाराच्या नजरेने तरी. आपल्याला एक यादी बनवायची आहे. साधी, सोपी, प्रश्नात काही गहन असं नाही.
नन्द्या, अतिशय उत्तम लिस्ट.
नन्द्या, अतिशय उत्तम लिस्ट. पण बहुतेक अस्पेक्ट्स परिस्थितीवाचक आहेत. काही स्वभाववाचक आहेत. अजून काही वाचक वाचक असू शकतं का?
उदा. इंपल्सिव माणसाचा इंपल्स उंच असतो, पण एरवी तो साधाच असतो. त्याला गुंतवणूक म्हटले कि इंम्प्ल्स होत नसेल कदाचित.