सूर्य मावळतीला झुकत चालला होता.सूर्याचा लाल गोळा आकाशात केसरी रंगाची उधळण करत होता. संपूर्ण सृष्टि अंधाराची चादर पांघरूण निद्राधीन होण्यासाठी सज्ज होत होती.आकाशात पक्षांचे थवेच्या -थवे घरट्याकडे उड्डाण करत होते.नदी घाट शांत होता.गुरेढोरे दावणीकडे निघाली होती.हस्तिनापूरची प्रजा ही आप आपली कामे उरकण्यात मग्न होती.शेतकरी शेतातून घरी निघाले होते.व्यापारी दुकाने बंद करण्याच्या तयारीत होते. लहान मुले अजून ही खेळण्यात गुंग होती. कुठे स्त्रीयांची दिवे लावण्याची लगबग सुरू होती तर कुठे स्त्रीया रात्रीचे भोजन रांधत होत्या.
इकडे हस्तिनापूरच्या राजमहालत ही दास-दासी दिवे लावण्यात मग्न होते.तर बल्लभाचारी मुदपाक गृहात रात्रिचे भोजन रांधन्यात व्यस्त होते.पण या सगळ्या गडबडीत देखिल कोठेच उत्साह जाणवत नव्हता. सर्व राजमहालावर एक उदासी एक शोककळा पसरली होती.
या सगळ्या गडबडीत एक व्यक्ति झपाझप पावले टाकत राजसभेकडे जात होती. सर्व दास दासी त्या व्यक्तीला अदबीने मुजरा करत होते. ती व्यक्ति तीस-पस्तिस वर्षांची तरुण,उंची सात फूट ,शरीराने बलदंड ,नितळ गोरी कांति ,अंगावर तलम व शुभ्र रेशमी वस्त्रे, मानेवर रुळणारे कुरळे केस ,मुखावर सात्विक तेज असलेली. आपल्या हातावरील उपरणे सांभाळत राजसभेकडे सरसावत होती. ती व्यक्ति म्हणजे राजकुमार देवव्रत होती नंतरचे भीष्म पितामह! त्यांनी एका दासीला बोलावून ते आल्याची वर्दी द्यायला सांगितले.
दासी राजसभेत गेली.मुजरा करून राजकुमार देवव्रत आल्याची वर्दी तिथे थांबलेल्या स्त्रीला दिली.त्या स्त्रीने हातानेच आत पाठव असा इशारा केला.शुभ्र धवल वस्त्रे नेसलेली. ती स्त्री रंगाने गोरी शिडशिडीत बांधा कंबरेच्या खाली पर्यंत रुळणारे मोकळे केस ,मुखावर आलेली अकाली वृद्धत्वाची झाक व तिच्या अस्तित्वाची चाहूल देणारा व राजसभेच्या बाहेर पर्यंत दरवळणारा तिच्या शरीराचा मोहक सुगंध ,ती स्त्री म्हणजे राजमाता सत्यवती होती .
ती उदास नजरेने राजसभा न्याहळत होती. प्रवेशद्वारा पासून अंथरलेला मखमली लाल रंगाचा गालीचा,दोन्ही बाजूंनी दिमाखात उभारलेले गोलाकार शिसवी अगणित खांब त्या समोरा-समोरील दोन्ही खांबांना ठीक-ठिकाणी सांधणार्या सोन्याच्या महिरपी कमानी त्या खांबांवर व कमानीवर केलेली सोन्याची वेल-बुट्टीची सुंदर नक्काशी .सभेच्या मधोमध झुलणारे मोठे झुंबर ,दोन्ही बाजूने सामोरा-समोर असलेली आसने त्यावर ही केलेली सुंदर सोनेरी नक्काशी, त्यावर असलेल्या रेशमी गाद्या ,राजसभेच्या समोर शेवटच्या टोकाला दहा पायऱ्या उंच असलेले मोठे दिमाखदार सोन्याचे सिंहासन हे सगळं नुकत्याच प्रज्वलित केलेल्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघत होते. ठीक-ठिकाणी असणाऱ्या गवाक्षातून येणार्या वाऱ्याच्या झुळूके बरोबर हलणाऱ्या दिव्यांच्या वातीमुळे अजूनच चमकत होते. ऐश्वर्याचे मूर्तीमंत उदाहरणच जणू !
हे सर्व राजमाता सत्यवती उदास नजरेने न्याहळत होत्या. तेवढ्यात राजकुमार देवव्रत(भीष्म) आले. त्यांनी राजमाता सत्यवतीना मुजरा केला.
राजमाता सत्यवती ,“ आयुष्यमान भव पुत्र ”
देवव्रत ,“ माते असे अचानक राजसभेत बोलवण्याचे प्रयोजन ?” प्रश्नार्थक नजरेने राजमातेकडे पाहत देवव्रत बोलले.
राजमाता (सत्यवती),“तसेच महत्त्वाचे प्रयोजन आहे म्हणून बोलावले आहे पुत्र ,तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे होते .”
देवव्रत ,“आज्ञा करावी माते !”
एक दीर्घ निःश्वास सोडत राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“आपल्याला आता राज सिंहासन व राज्या विषयी निर्णय घ्यावा लागले पुत्र”
देवव्रत(भीष्म) , “ माते महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूला अजून एक मास ही सरला नाही आणि अशा शोक समई तुम्हीं या विषयी बोलायला मला बोलावले आहे?राज्य कारभारा सुरळीत सुरू आहे चिंता नसावी.” राजकुमार देवव्रत दुःखी अंतकरणाने बोलले.
राजमाता सत्यवती ,“ पुत्र तुम्हीं असताना आम्हाला राज्य कारभाराची चिंता नाही.तुम्हीं जसे महाराज विचित्रविर्याच्या रुपात अनुज गमावला तसा आम्हीं आमचा पुत्र गमावलाय पण आम्हीं नुसत्या विचित्रविर्याच्या माता नाही तर या राज्याच्या माता आहोत. विचित्रविर्याचा मृत्यू आपल्या सर्वांच्या जिव्हारी लागला आहे.पण आपण राज्यकर्ते आहोत पुत्र ! आपल्याला आपली दुःखे कुरवाळत बसण्याचा अधिकार नाही. आपल्याला सतत राज्याच्या हिताचा विचार करावा लागणार .खरं तर आम्हीं तुम्हाला इथे काही मागण्यासाठी बोलावलं आहे. ”
राजमाता हे सगळं दुःखी स्वरात बोलत होत्या.त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.राजकुमार देवव्रत जरा वरमले व पुढे म्हणाले.
देवव्रत (भीष्म),“ मातेने पुत्राकडे मागायचे नसते तर पुत्राला आज्ञा करायची असते .आज्ञा करावी माते! ”
राजकुमार देवव्रत विणयाने म्हणाले.रिकाम्या सिंहासनाकडे पाहत राजमाता सत्यवती बोलू लागल्या.
राजमाता सत्यवती ,“पुत्र देवव्रत रिक्त सिंहासन हे विधवा स्त्री समान असते. ज्यावर अनेक लोक टपून असतात.घरचे ही आणि दारचे ही आमची अशी इच्छा आहे की तुम्हीं माझ्या पित्याला दिलेले वचन मोडावे.तुमची प्रतिज्ञा सोडावी व विवाह करून सिंहासनावर बसावे.कारण आता हस्तिनापूरचे सिंहासन व कुरु वंश दोन्ही तुम्हींच सावरू शकता.”
राजमाता सत्यवती अजीजीने बोलत होत्या .राजकुमार देवव्रतांनी शांतपणे ऐकून घेतले व मोठ्या निश्चयाने बोलू लागले.
देवव्रत(भीष्म), “ माते तुम्हीं माझा प्राण मागा पण तुम्हीं जे मागताय ते मला देणे कदापि शक्य नाही .माझी प्रतिज्ञा व माझे वचन अढळ आहे.मला क्षमा करा.”
राजमाता सत्यवती खाली पडून रडू लागल्या व बोलल्या.
राजमाता सत्यवती ,“ पुत्र तुम्ही घेतलेली आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा व सिंहासनावर न बसण्याचा निर्णय माझ्या पित्यामुळे घेतला होता.अप्रत्यक्ष पणे माझ्यामुळे ; या कुरु वंशाच्या नाशाला मी कारणीभूत होईन पुत्र ,माझं नाव इतिहासात कुरु वंशाच्या नाशाला कारण ठरलेली स्त्री म्हणून लिहिले जाईल.मी एका वंशाच्या व राज्याच्या नाशाला कारण बनू इच्छित नाही पुत्र देवव्रत !”
अस राजमाता मोठयाने बोलून रडत होत्या .
देवव्रत (भीष्म),“ माते आवरा स्वतःला ,तुम्हीं शांत व्हा ;ना कुरु वंश संपेल; ना हस्तिनापूर राज्याचा नाश होईल ,काही ना काही मार्ग नक्की निघेल आपण आपल्या कक्षात जाऊन आराम करावा.”
असे बोलून राजकुमार देवव्रत(भीष्म) तेथून निघून गेले .राजमाता सत्यवती त्या रिक्त सिंहासनाकडे पाहत किती तरी वेळ तिथेच रडत राहिल्या व नंतर मनात काही तरी निश्चय करून आपल्या कक्षात निघून गेल्या .
क्रमशः....
(जमतंय का ? ते नक्की सांगा कारण तुमच्या प्रतिसादावर पुढील लिखाण अवलंबून आहे.)
https://www.swamini85.tk/2019
https://www.swamini85.tk/2019/12/blog-post_11.html
छान लिहिलय.
छान लिहिलय.
जमलं.. खुप छान. तुमचा पाहिला
जमलं.. खुप छान. तुमचा पाहिला लेख वाचला इथला आणि हा आताचा.. खुप सुधारणा आहेत. पुढील लेखनास शुभेच्छा.
जमतंय. जरा मोठा लेख असावा..
जमतंय. जरा मोठा लेख असावा...लेखातील विषयाचा समर्पक शेवट त्याच लेखात करण्याचा प्रयत्न असल्यास उत्तम. अन्यथा संगडीतील दोन-तीन लेख एकदम पोस्ट करणे.
एक-दोन शुद्धलेखनाच्या चुका, पण ऑल गुड ओव्हरऑल. Feedbacks ची चिंता सोडून विषयात वाहून जाणे आणि लेखणीतून कागदावर साहित्य उतरवणे, यात खरी मजा.
छान! जमतय!
छान! जमतय!
छान लिहीले.. शेवटचा कंस टाकू
छान लिहीले.. शेवटचा कंस टाकू नका.. हवे तर प्रतिक्रियेत टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुध्दलेखनातील काही चुका सुधारा.. बाकी छानच..
उदा. स्त्रिया, समयी, विनयाने इ.इ.
छान लिहिल आहे आवडल.
छान लिहिल आहे आवडल.
छानच लिहीलंय.. वर सगळ्यांनी
छानच लिहीलंय.. वर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे शुद्धलेखनाची काळजी घ्या फक्त.
प्रतिसादांचा विचार न करता मोकळेपणानी लिहा. पुलेशु!
@हरिहर
@हरिहर
@अनघा
@सिद्धी
@निलाक्षी
@नीलिमा
धन्यवाद ,खूप आभार आणि मी शुद्ध लेखन आणखीन सुधारण्याचा प्रयत्न करेन
@vichar
@vichar
@shitalkrishna
धन्यवाद, vichar मी नक्कीच तुमच्या सूचना लक्षात ठेवेण
छान सुरुवात पुलेशु...
छान सुरुवात
पुलेशु...
धन्यवाद @मऊमैया
धन्यवाद
@मऊमैया
धन्यवाद
धन्यवाद
@मऊमैया>>>>
मऊमैया नाही हो!
माऊमैया नाव आहे त्यांचं.
तो काना अंबा, अंबालिकांना
तो काना अंबा, अंबालिकांना दिलाय.
(No subject)
हायला, इथे पण वल्लभाचारी आहेच
हायला, इथे पण वल्लभाचारी आहेच!! इतकं फूटेज तर अजय देवगणला पण सिंबामध्ये मिळालं नसेल.
कुठे स्त्रीयांची दिवे
कुठे स्त्रीयांची दिवे लावण्याची लगबग सुरू होती तर कुठे स्त्रीया रात्रीचे भोजन रांधत होत्या.------
पूर्वीच्या काळी जेवणाची टाइमिंग आयुर्वेद आणि आहारशास्त्राची योग्य सांगड घालून असायची आणि डिनर टाइमिंग लवकर असायचे म्हणजेच ही रांधण्याची प्रोसेस दिवेलागणीच्या फार आधी सुरु होत असणार. कृपया ते हस्तिनापुरचे HMT घड्याळ तुमच्या मोबाईलच्या घड्याळ्यासोबत एकदा मॅच करून घ्या.
कुठल्यातरी धाग्यावर महाभारत
कुठल्यातरी धाग्यावर महाभारत काळात टेस्ट ट्यूब बेबी आणि अण्वस्त्राचा वापर होत असे असं वाचलं. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेशी ऑटो अॅडजस्ट करणारे सोलर लँप्स नव्हते का त्या काळात? दिवे लावायची लगबग वाचली असती.
गुरेढोरे दवणीकडे निघाली होती.
गुरेढोरे दवणीकडे निघाली होती....
हु इज धिस दवणी नेशन वॉन्ट्स टू नो
------------------------------------------
ऑप्शन १ -
३ तासाची बोरिंग मुव्हि मध्ये ठरविक वेळाने येणाऱ्या गाण्यातील आयटम गर्ल जशी करमणूक करते तसे दिवसभर रानात चरुन आलेल्या थकव्याचे श्रम परिहार योजने अंतर्गत कोणी असेल का ही दवणी ?
ऑप्शन २ -
दवणीय अंडे संबधी काही असावे का हे ?
ऑप्शन ३ -
दवणी फक्त गुराढोराना इंटरटेंट करायची की त्यांच्या गुराख्यानासुद्धा ?
ऑप्शन ४ -
वल्लभाचारीचं हे काही विबासं असावं का !!
दवणीय अंडे संबधी काही असावे
दवणीय अंडे संबधी काही असावे का हे ? >> हाहा!
देवव्रत (भीष्म),“ माते आवरा
देवव्रत (भीष्म),“ माते आवरा स्वतःला ...." >> आवरा! आजकाल पुण्याचे लोक असली भाषा वापरतात. देवव्रत त्यातल्या त्यात 'माते, सावर स्वतःला' असे म्हणू शकतो. आवरायला काय ती माता म्हणजे पसारा आहे का?
आणि हगवण आणि पो या शब्दाचा
आणि हगवण आणि पो या शब्दाचा तुमचा लोभ पाहून तुम्ही माबोवर स्वच्छता कामगार आहेत का?
त्याला आम्ही भंगी म्हणतो
Submitted by Swamini Chougule on 17 December, 2019 - 14:38
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा उजळवताय उजलवा
स्वतः लिहिलेलं सगळं डिलिट करून पण एक लक्षात ठेवा अंतर्जालातून काही ही डिलीट होत नसत
बापरे, अरे काय चालूये..
बापरे, अरे काय चालूये.. स्वामिनी ताई काय टायपिंग केलंत तुम्ही? अजिंक्यराव.. काय चालूये?
Shitalkrishna विपु पहा तुमची
Shitalkrishna
विपु पहा तुमची
इथेच लिहा ना - उगी आम्हाला
इथेच लिहा ना - उगी आम्हाला त्रास जाऊन विपू वाचायला ...
च्रप्स, भयंकर हसायला आलंय
च्रप्स, भयंकर हसायला आलंय वरचा प्रतिसाद वाचुन.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)