गद्यलेखन

कथाशंभरी २- "रघ्वात्मजप्रतापकाव्यम :) "-अनन्त्_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2022 - 08:46

अंगणात येवोनीया
रघू पाहे बंद घर
दारावर होता ज्याच्या
षण्मासीचा धूळ थर  

बोले रघू स्वत:शीच
"काल चंद्रप्रकाशात
पाहिले मी कोणीतरी
दारापाशी होते जात?"

नीट निरखून पाहे
दारावरची अक्षरे
"पुन्हा येईन मी रात्री
नको देऊस पहारे" 

रघू पडला कोड्यात
"कोण इथे येतो जातो?
धूळभर्‍या दारावर
कोण संदेश लिहीतो?"

कथाशंभरी-लक्ष्य-कविन

Submitted by कविन on 8 September, 2022 - 06:41

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय? तिने लगेच व्हॉट्स ॲपवर पिंग करत 'पॉपकॉर्नची' स्मायली आणि सोबत मायबोली धाग्याची लिंक पाठवली.
ताबडतोब 'दुसरीने' लॉगीन करत मायबोली उघडली. प्रतिसाद स्क्रोल करत दुसऱ्या विंडोत व्हॉट्सॲप वेबवर 'पहिलीला' एक 'ॲंग्री फेस' आणि 'तलवारबाजीची स्मायली' पाठवून दिले.

'दुसरी' आता आगीत उडी मारणार याची पहिलीला खात्री पटली.

'Chill. नको असलेले धागे अनुल्लेखानेच मारायचे असतात."

कॉलेजचे ते मोरपिशी दिवस- कविन

Submitted by कविन on 8 September, 2022 - 05:22

खरतर हा लेख कॉलेजचे मोरपिशी दिवस आणि त्या मोरपीसांची पिसं काढणे म्हणून खपेल Lol . आम्ही काही 'चार चौघीत उठून / बसून/ कस का होईना पण दिसते' कॅटेगरीतही मोडत नसल्याने आमच्या वाटेला 'मनाला गुदगुल्या' करणाऱ्या स्वतः बाबतच्या आठवणी तशा फार फार कमीच.

कथाशंभरी - पुणे- रायगड

Submitted by रायगड on 8 September, 2022 - 04:30

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. "अरे हे काय .....पाणी पूलावरूनही गेले की! आपल्या वेळचा लाकडी पूलही राहिला नाही!" जुन्या पूलाच्या जागी आधुनिक पूल बांधला होता.
"आपल्यावेळचा पूल नाही आणि आपले पुलं पण नाही उरले", दुसरीने खंत व्यक्त केली. "आपल्यावेळचं पुणं राहिलं नाही, खरं!"

कथाशंभरी २ - घर - निकु

Submitted by निकु on 8 September, 2022 - 03:11

अंगणात येऊन रघूने गेले ६ महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि समाधानाने हसला.
गावात त्याचे मोठ्ठे घर होते तरी तो या छोट्याश्या खोलीत रोज येत असे आणि जाताना शेजारच्या बंद घराकडे पहात बसे.
आता त्या घरालाही जिवंतपणा येणार होता. थोड्याच वेळात अंगण साफ झाले. त्याचे बालपण तिथे बागडू लागले आणि तो काळाकुट्ट् दिवस..; घर, शाळा सोडावी लागली... घरच्या गरिबीने सगळेच संपवले होते. शेजारच्या वाड्यात, जिन्याखालची एक खोली घरमालकांच्या कृपेने मिळाली म्हणून नाहीतर रस्त्यावरच आलो होतो आपण.

कथाशंभरी - २ - फोन कॉल - रायगड

Submitted by रायगड on 8 September, 2022 - 02:33

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि परत एकदा त्याच्या अंगावर काटा आला.

सहा महिन्यापूर्वी सकाळी सुमनच्या फोननी आलेली जाग - " मी इथे कामानिमित्त बाहेर आणि सौरभ गेले २-३ दिवस फोन ऊचलत नाहीये, जरा घरी जाऊन बघ " ही विनवणी. त्याच्याकडील किल्लीने रघूने ऊघडलेले सौरभ-सुमनच्या घराचे दार. आतमध्ये अस्ताव्यस्त पडलेले सामान, झटापटीच्या खुणा...सुकलेल्या रक्ताचा, असह्य दुर्गंधीचा माग घेत सापडलेले प्रेत – सुमनचे!!! ….. त्यानंतर पोलिस, पोस्ट-मार्टेम…अहवाल: सुमनचा ३ दिवसापूर्वी चाकूच्या वाराने मुत्यू!!! ….बेपत्ता सौरभवर खुनाचा आरोप...

कथाशंभरी - २ - डेड एंड - कविन

Submitted by कविन on 8 September, 2022 - 02:11

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तिथले दृष्य बघून मात्र मनात काहीतरी हलले.

फक्त एक घटना, एक चूक आणि अख्खं घर त्यात सोलवटून निघालं, हे ही आणि ते ही. समाधान, स्नेह, जिवंतपणा सगळं भस्म झालं.

जिवनेच्छाच संपली होती जणू, त्या घराची आणि त्याचीही. चमत्कारावर त्याचा विश्वासच नव्हता. 'डेड-एंड' म्हणतात तो हाच म्हणत 'कायमचा निरोप' घ्यायलाच आज तो इथे आला होता.
सवयीने 'तिकडे' लक्ष गेले तेव्हा, उजाड घराच्या त्या भिंतीतून कोवळी पालवी डोकावताना दिसली. तब्बल सहा महिन्यांनी डोळ्यात ओल जाणवली.

कथाशंभरी - हतबल - गीत

Submitted by गीत१७ on 7 September, 2022 - 16:29

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.

साने गुरुजी यांच्यावर निबंध

Submitted by Rahul Zajari on 7 September, 2022 - 09:27
essay-on-sane-guruji-in-marathi

आज आपण या लेखामध्ये साने गुरु यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. आज आपण साने गुरुजी यांच्या जीवन चारित्र्या विषयी, ते कोण होते आणि त्यांनी काय केले या बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. साने गुरुजी हे नाव कोणाला माहित नाही असे नाही कारण हे नाव सर्वांना माहित आहे कारण ते एक लोकप्रिय साहित्यिक होते आणि त्यांच्या अनेक कविता आणि पुस्तके खूप प्रसिद्ध होती. चला तर आता आपण साने गुरुजी यांच्याविषयी जाणून घेवूयात.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन