कथाशंभरी २ - घर - निकु

Submitted by निकु on 8 September, 2022 - 03:11

अंगणात येऊन रघूने गेले ६ महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि समाधानाने हसला.
गावात त्याचे मोठ्ठे घर होते तरी तो या छोट्याश्या खोलीत रोज येत असे आणि जाताना शेजारच्या बंद घराकडे पहात बसे.
आता त्या घरालाही जिवंतपणा येणार होता. थोड्याच वेळात अंगण साफ झाले. त्याचे बालपण तिथे बागडू लागले आणि तो काळाकुट्ट् दिवस..; घर, शाळा सोडावी लागली... घरच्या गरिबीने सगळेच संपवले होते. शेजारच्या वाड्यात, जिन्याखालची एक खोली घरमालकांच्या कृपेने मिळाली म्हणून नाहीतर रस्त्यावरच आलो होतो आपण.
आता मात्र लवकरच याच घरात रघू दिमाखाने प्रवेश करणार होता.. या विकत घेतलेल्या जागेत गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह सुरु होणार होते.

Group content visibility: 
Use group defaults