मायबोली गणेशोत्सव 2022
कथाशंभरी-लक्ष्य-कविन
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय? तिने लगेच व्हॉट्स ॲपवर पिंग करत 'पॉपकॉर्नची' स्मायली आणि सोबत मायबोली धाग्याची लिंक पाठवली.
ताबडतोब 'दुसरीने' लॉगीन करत मायबोली उघडली. प्रतिसाद स्क्रोल करत दुसऱ्या विंडोत व्हॉट्सॲप वेबवर 'पहिलीला' एक 'ॲंग्री फेस' आणि 'तलवारबाजीची स्मायली' पाठवून दिले.
'दुसरी' आता आगीत उडी मारणार याची पहिलीला खात्री पटली.
'Chill. नको असलेले धागे अनुल्लेखानेच मारायचे असतात."
शब्दखेळ - एकोळी कथा.
शब्दखेळ - एकोळी कथा
काल करमरकर काकूंनी काकांच्या कोर्टाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.
हे वाक्य बऱ्याचजणांनी लहानपणी ऐकलेलं/ म्हणलेलं आहे. त्यात भर सुद्धा घातली आहे. आज असेच वेगवेगळी अक्षरे घेऊन जितकं लांब करता येईल तेवढं वाक्य करा.
आज आमच्या आईने आणि आरवने आडापलीकडून आवळे आणले.
नियम:
१. ही स्पर्धा नाही, खेळ आहे.
२. एकाने एक अक्षर घेऊन वाक्य लिहिलं की पुढील प्रतिसादकाने कोणतंही वेगळं अक्षर घेऊन वाक्य लिहावे.
कार्टून कॅरॅक्टर - मायबोली आयडी -मनमोहन -छोट्या दोस्ताचे नाव - अंजली
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ५ - घन घन माला नभी दाटल्या...
आजचा विषय आहे - घन घन माला नभी दाटल्या ...
घन घन माला नवी दाटल्या कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ।।
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा
पाणी हे जीवन आहे. भर उन्हात डोंगरदर्यातून फिरताना एखादा झरा, ओढा वाटेत लागला की त्याचं पाणी किती गोड लागतं हे फिरणाऱ्याला चांगलंच जाणवतं.
तर आजचा विषय आहे जलाशय. विहिर,नदी, शेततळे,तलाव, ओढा, झरा, धरण, समुद्र, कुंड अशा प्रकारची कोणतीही जलाशय असलेली प्रकाशचित्रे झब्बू म्हणून द्यायची आहेत.
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो
मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.
तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!
हे लक्षात ठेवा:-