आजचा विषय आहे - घन घन माला नभी दाटल्या ...
घन घन माला नवी दाटल्या कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ।।
पहिला पाऊस पडताच या गदिमांच्या ओळी आपोआप गुणगुणल्या जातात. आषाढात मुसळधार कोसळणारा पाऊस श्रावणात ऊन पावसाचा खेळ खेळताना दिसतो. निसर्ग नवचैतन्याने बहरलेला असतो. मग आता आपण काय करायचं तर हे नजरेने टिपलेलं पावसाळी दृश्य कॅमेऱ्यात पकडायचं. कोणतही पावसाळी दृश्य जसं - दऱ्याखोऱ्यातून बेधुंद कोसळणारे धबधबे, पावसाने ओलेचिंब झालेले डोंगर, आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस, हिरव्यागार डोंगरावरून हळुवार रांगणारे दाट ढग, नदीला आलेला पूर, पावसात ठप्प झालेली वाहतूक ....
या प्रकाशचित्रांच्या खेळातून पावसाची मजा लुटुया.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
काननी असावं.
काननी असावं.
(No subject)
घन घन माला नभी दाटल्या
कोसळून झाल्या धारा
रस्ता झाला ओला,
अन धुतला गेला सारा
मग काय.. आता फिरायला चला
(No subject)
(No subject)
त्र्यंबकेश्वर चा फोटो आहे हा
(No subject)
लेक डिस्ट्रिक्ट... डोंगरावर
लेक डिस्ट्रिक्ट... डोंगरावर रेंगाळणारे पावसाळी ढग
दख्खनच्या राणीतून बाहेरचा
दख्खनच्या राणीतून बाहेरचा पाऊस
(No subject)
(No subject)
(No subject)
ढगांनी माझा वॉटरमार्क उलटा
ढगांनी माझा वॉटरमार्क उलटा टाकला
अमितव , डबल इंद्रधनुष्य फारच
अमितव , डबल इंद्रधनुष्य फारच सुंदर
(No subject)
कोलंबसमधल्या घन घन माला नभी
कोलंबसमधल्या घन घन माला नभी दाटल्या...
धारा मात्र जरा उशीरा कोसळल्या. पण तोवर अंधार झालेला
कॉमन पॅसेजच्या खिडकीतून
कॉमन पॅसेजच्या खिडकीतून दिसणारा पाऊस.
ईथे शू रॅकची सीट असल्याने आरामात बसून पाऊस बघू शकतो.
काननी असावं. >> होय भरत काननी
काननी असावं. >> होय भरत काननी पाहिजे.
केकारव करी मोर कानणी उभवून उंच पिसारा ।।
ऐवेजी
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ।।
असे पाहिजे.
संयोजक वरची दुरुस्ती कराल काय ?
सगळे प्रची सुंदर आहेत.
धबधब्यांच्या देशात - Iceland
धबधब्यांच्या देशात - Iceland ला आत्ताच जाऊन आल्यामुळे तिथला एक प्रसिद्ध धबधबा.
शहारुख-काजोलने तर तो अजून फेमस केलाय
अरे अफलातून दिसतो आहे हा
अरे अफलातून दिसतो आहे हा धबधबा!
वॉटकिन्स ग्लेन गॉर्ज ट्रेल -
वॉटकिन्स ग्लेन गॉर्ज ट्रेल - वॉटकिन्स ग्लेन स्टेट पार्क, न्यूयॉर्क
भारी आहेत दोन्ही धबधबा फोटो.
भारी आहेत दोन्ही धबधबा फोटो.. बघून तिथे जावेसे वाटतेय
(No subject)
(No subject)
वर पाहिले तरी ढग आणि खाली देखिल मेघाच्छादन!
ताम्हीणी घाट पुणे-रोहा मार्ग!
फार सुंदर फोटो
फार सुंदर फोटो
हा अगोंदा बीच गोवा. नंतर मुसळधार पाऊस आलेला.
अरे कसले ढगाळ फोटो आहेत
अरे कसले ढगाळ फोटो आहेत दोघांचे.. मस्त !
पहिल्या पावसानंतर सवतसड्याचा
पहिल्या पावसानंतर सवतसड्याचा धबधबा
हा अजून एक तिथला फेमस धबधबा.
हा अजून एक तिथला फेमस धबधबा.. वरच्या अमितव च्या फोटोत असलेल्या दर्या खोर्याशी साधर्म्य असलेला
वरचे सगळेच फोटो सुंदर आहेत
वरचे सगळेच फोटो सुंदर आहेत
काय बहार सुंदर फोटो आहेत
काय बहार सुंदर फोटो आहेत सगळे! आपल्या सह्याद्रीतल्या डोंगर रांगांमध्ये पाऊस कसा मनसोक्त उधळून कोसळतो, इथे ब्रिस्बेन मध्ये मात्र मोजून मापून कोसळतो असा वाटतं . इथला पाऊस मनाला चिंब बीजवात नाही, नुसताच ओला करतो. पाऊस पडल्यानंतर चा येणार मृदगंध आणि स्मृतिगंध ही इथे नाही. पण तरीही इथला पाऊस छान आहे! हिरवाकंच आहे , नद्या-नाल्यांमधून ओसंडून वाहणारा आहे.
घन घन माला नभी दाटल्या ...
घन घन माला नभी दाटल्या ...
(No subject)
Pages