पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची.
एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?"
माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला. नंतर," तुझ्या पणज्याचं वय किती?" हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकलं.
बाहुली – कुट्टीची गोष्ट
"अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा दत्ता ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता गिलास |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा विलास ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होत्या पिना |
भुलोजीला लेक झाली , नाव ठेवा मीना ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होतं कॅलेंडर |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा अलेक्झांडर ||
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.
“हेलो, नॅंसी, काय झालं?”
“बॉस, तीन सभ्य गृहस्थ आपल्याला भेटू इच्छितात. तुम्हाला वेळ असेल तर.....”
सेक्रेटरीने ‘सभ्य’ असा शब्द वापरून इशारा दिला होता. पण मी त्यांची भेट घायचे ठरवले. त्या आधी माझे पिस्तुल टेबलावर दिसेल अशा तऱ्हेने ठेवले. आणि सी सी टी वी वर नजर टाकली. खरेच जरा गुंडे दिसत होते खरे.
“ओके,” मी बेदरकारपणे नॅंसीला सूचना दिली.
“सर, पण जरा काळजी घ्या.”
तिघे जण माझ्या केबिन मध्ये घुसले.
“काय उकाडा आहे पुण्यात.” अस म्हणून एकाने फॅन फुल केला.
“अरे रूम एसी असताना फॅन कशाला लावलास?”
"हट .. भें s s चो"
"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं
मी फक्त नकारार्थी मान डोलावली.
"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना
"हट .. भें s s चो"
"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं
मी फक्त नकारार्थी मान डोलावली.
"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना
टुकारवाडीचे सरपंच रामरावांना गावातल्या लोकांनी प्रगतीशील सरपंच अशी उपाधी बहाल केली होती. या कृतीत कुणी म्हणेल गावक-यांना त्यांचा आधुनिक दृष्टिकोन आवडला असेल पण तसं काही नाही. यासाठी त्यांची बायको लक्ष्मी हीचा मोठा वरदहस्त त्यांच्यावर होता.तिला रामराव लाडानं प्रगती म्हणतं. सरपंच शेतीवाडी अजिबात बघत नव्हते. शेतीकारण हे लक्ष्मीचं खातं. तिला शासनाने प्रगतीशील शेतकरी ही उपाधी देऊन गौरविले होते. म्हणून लोक रामरावला प्रगतीशील सरपंच म्हणत. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या बायकोला मुख्यमंत्रीनबाई उपाधी आपोआप लागते तसं काहीसं.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. गौरीच्या लग्नात शिल्पाला पाहिलं अन् तिला धक्काच बसला. तिला चुकवत गौरीला आशीर्वाद देऊन घाईघाईने ती बाहेर पडली. घरी आली. पलंगावर निपचीत पडून राहिली. आयुष्यात हा प्रसंग कधी येईल ही कल्पनाच तिने कधी केली नव्हती. रमेशने काय झाले विचारताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. रडता रडता शिल्पा भेटल्याचं सांगितले. रमेश तिची समजूत घालत म्हणाला की आपण वरदाशी बोललो ना काही एक न लपवता व आपण सगळे मिळून तिचा शोध घेऊ असं प्रॉमिस केलं होतं ना .... होतं ना ?
हस्तलेखन स्पर्धा २०२२
मोठा गट : ब
नाव : साक्षी
ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं … नाही नाही काहीतरी चुकतय. म्हणजे तिने जिंकलं हे बरोबर पण ती यायच्या आधीच तिने जिंकलं होतं. आधी नुसतेच तिच्याबद्दल कळले. काही न कळतावळता कनेक्षन जुळले आणि तिने जिंकले. मग ती आली आणि तिने पाहीले.. असा सिक्वेन्स आहे इथे.
ती म्हणजे माझी धाकटी, आमच्या घरचं शेंडेफळ आणि आमचं चार पायांचं फरी बाळ.
माझा इतकी वर्ष जुन्या दम्यासारखा चिकटलेला 'ॲनिमल फोबिया' एका पंजात दूर करायचं श्रेय तिलाच.