मला जरा ताप येतो आहे. मीना म्हणाली बघु म्हणुन तीने मनगटाला हात लावला.
जरा सोयीचे म्हणुन तीला ते बरे वाटले असावे.
शेजारीच आई होती. माझ मातृप्रेम म्हणाल, अशी प्रतारणा करू नकोस.
आई आणि बायको सोबत संसार करताना ही काळजी मी घेतो.
मी आईला म्हणल तु या हाताला हात लाऊन पहा.
( नशीब दोघींना गळा धरावा असे सुचले नाही .... )
आईच मत पडल ताप नाही.
मीनाच मत पडल ताप आहे.
न पिता माझा तळीराम झाला. मी म्हणालो मग कुणाचे औषध सुरू ठेऊ ?
वैद्यांच की अॕलोपॕथी डाॕ च.
आई आणि बायको सोबत एकाच घरात दोघीच्या दयेने रहायचे म्हणजे मी असे काही करतो.
मी जेंव्हा सॉक्रेटिस म्हणजे सुक्रातची कहाणी वाचली तेंव्हा थोडा अस्वस्थच झालो. तो एकटा अगदी लहानपणापासून एका निर्मनुष्य बेटावर रहात होता. पूर्ण आयुष्य त्याने तेथेच व्यतीत केले. हे जरी वाचायला सोपे असले तरी कल्पना करा की किती अवघड असते असे रहाणे. आपण कधी इतरांना न बोलता जगू शकतो का? मी असेही वाचले अहे की सुक्रातला कुणीही बोलायला नसल्याने तो स्वतःही बोलू शकत नव्हता. आपली लहान मुले आपले बोलणे ऐकून स्वतः जीभ हलवून बोलायचा प्रयत्न करतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तात्पर्य, सहजीवन हे माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना पण अवश्यक असते. एक म्हण आहे ना "Man is a social animal".
सध्याच्या जगात मग तो आपला देश असो वा जगातील इतरत्र देश असोत, दिवस साजरे करायचे फॅड पसरलेले आहे. त्याला थाटात म्हणतात हे नवीन कल्चर आहे. आता काय बोलावे! आपल्याकडे एखादी नवीन गोष्ट आली की त्याचा अतिरेक होतो आणि जिकडे तिकडे हेच दिसते. लक्ष देऊन पाहिले तर असा एकही दिवस दिसणार नाही जो कोणाच्या तरी स्मरणार्थ अर्पण केलेला नाही. आठवून बघा किती दिवस आपण साजरे करतो ते!
भाग – १५
बाबू ची अश्या प्रकारे फजिती झाल्यावर उरलेला सिनेमा काही दोघांनीही पहिला नाही ते तिकडून निघाले आणि त्यांच्या नेहमीच्या जागी टेकडीवर जाऊन बसले ,संध्याकाळ उलटून गेली होती , टेकडीवर आता अंधार दाटायला लागला होता , बायडाला घरी जाऊन जेवण बनवायचं होत , तिची मात्र चुळबुळ सुरु झाली , पण बाबू अगदीच शांत होता लांब कुठेतरी एकटक पाहत , तंद्री लागल्यासारखा.
“आपण जायचय का घरला” बायडा ने शांततेचा भंग केला.
“.................................”
“मी काय म्हणती, मला येळ होतोय, आजून जेवण बी बनवायचय”
“...............................”
“चला चला. वेळ झाली.”
किती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत.
अंधाऱ्या भोगद्यातून प्रवास. ए धक्का देऊ नकोस. कुणीतरी ढुंगणावर चापट्या मारत होता. डोळे उघडले तर लख्ख प्रकाश! एलइडी लॅंप हं.
मागच्या खेपेला कंदिल होता. गावातली सुईणबाई होती. आता पांढरा शुभ्र पोषाख केलेली नर्स बाई. प्रगति आहे.
अरे बापरे! म्हणजे पुन्हा सगळे नशिबी आले. गमभन, पाढे, व्हफा, मॅट्रिक, नोकरी, लग्न, मुलेबाळे, हगेरी मुतेरी, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं, त्यांची मुलेबाळे, त्यांची लग्नं, त्यांची मुलेबाळे, त्यांची लग्नं, त्यांची...
ओ, शिट! रडू आवरेना. .
भारताचे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. (लेख त्याबद्दल नाही) लवकरच सध्याचे राष्ट्रपती दिल्लीतील भव्य राष्ट्रपती भवनातून दुसरीकडे राहायला जातील आणि नूतन निर्वाचित राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय रायसीना हिलवरच्या ब्रिटिश राजवटीने बांधलेल्या व्हॉईसरॉय हाऊस उर्फ आताचे राष्ट्रपती भवन नामक राजेशाही प्रासादात राहायला येतील.
मालकिणीला बघून बाबु भानावर आला आणि आपण काय चूक करून बसलो हे त्याच्या लक्षात आल , पण आता वेळ निघून गेली होती , कारण तो आता तिच्या समोरून पळूनही जाऊ शकत न्हवता.
“कोण मांगता” मालकिणीने त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत विचारल.
बाबूच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत न्हवते.
“अरे बाबा , कोण मांगता तुमको“मालकीण आणखीनच चिडली.
“ब ...ब...ब.....” बाबु भांबावल्या सारखा झाला होता ,
आणि तेवढ्यात आतून बायडाच बाहेर आली , बाबुला बघून ती देखील चापापली , पण तिने परिस्थिती क्षणार्धात सावरून घेतली.
मल्टी युनिव्हर्सिटी नावाचा एक उपक्रम ह्र्दयेश देशपांडे ( चु.भु,दे.घे ) यांनी पुण्यात काही वर्षांपुर्वी इंजिनीयरींग शिकलेल्या व नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या साठी सुरु केला होता. मी गाईड या पदासाठी अर्ज केला होता. अश्यांचे एक हाय टी डॉ. विजय भटकर सरांच्या समवेत देशपांडे सरांनी आयोजीत केले होते.
समस्या एकच होती की इंजिनीयरींग शिकलेल्या तरुणांना कोअर इंजिनीयरींग नको आहे. त्यांना आय टी कंपनीत जॉब हवा आहे. कारण आय टी कंपनीत हात काळे करायला नको आणि पगार जास्त आहे.
तरुणाई होय तरुणाईच्च , तारुण्य म्हणायचं नाहीये मला. तर तरुणाई आणि थेरडेशाहीतला फरक काय? तरुणाईत कानशिलं सणसणुन तापतात. थेरडेशाहीत कान फक्त चष्म्याच्या काड्या सांभाळण्याकरता असतात. माणुस भयंकर दुरगामी वगैरे विचार करु लागला आणि वर्तमानाची वाट लावु लागला की समजावं म्हातारपण जवळ येऊ घातले आहे.
शुन्याक्षर कथा हे वाचून अनेकांना अचंबा वाटला असेल. अनेकांना हे वाटले असेल की शब्द सोडा एकही अक्षर न वापरता लिहली गेलेली कथा ही चित्र कथा तर नाही ? अनेकांना असे ही वाटले असेल की ही कथा अनुस्वार, वेलांटी, उकार, पुर्णविराम. प्रश्नचिन्ह किंवा उद्गार चिन्हाने साकारली आहे किंवा कसे ?