हेमा ने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला , आणखीन काही दिवस जाऊदे , आम्ही सर्व जाऊन रामशी बोलतो,
सुशीला बाईचा शब्द राम ने मोडला नसता , पण जयाला ते तस करण नको होत , तिने ह्या वेळचा सर्व निर्णय राम वर सोपवला होता , तिने ठरवलं तस झाल तर ठीक नाहीतर , अन्यथा जे काही होईल ते रामच्या मनाविरुद्ध असेल , आपल्या घरच्यांसाठी केलेलं असेल , आणि त्याला काहीही अर्थ नसणार होता ,
तिचा ओढलेला चेहरा , लग्न होत म्हणून बळजबरीने आईने गळ्यात घालायला एक चैन आणि कानातले दिले होते , फक्त तेवढेच अंगावर , राम काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला.
जयाला देखील काय बोलाव हे कळल नाही ती देखील गांगरल्यासारखी त्याला नुसती पाहत उभी राहिली, रामच्या मागून एक माणूस त्याला जवळपास ढकलत निघून गेला त्याच्या धक्क्याने तो जयाच्या अंगावर पडता पडता सावरला, दोघेही भानावर आले .
“एकटाच आलास “ जयाच्या तोंडून पाहिलं वाक्य निघाल.
रामला काही कळल नाही आणखीन कुणाला आणायला हव होत , झेंडूला कि दादांना,
बायडाला शोधाव कि काय कराव , तिला शोधायचं तर आता शेवटचा उपाय म्हणजे तिच्या मावशीच्या घरी वाकडला जाव लागणार , पण त्याला तिकडे जायची अजिबात इच्छा होईना , तो अस्वस्थ होता , पण काही करू हि शकत न्हवता,
दादांच्या जीवावरच संकट जरी टळल असल , तरी राम आणि झेंडू मात्र त्यांना पुन्हा कामावर जाऊ देईनात ,
दादाचं काम बंद म्हणजे साहजिकच सर्व घराचा भार हा एकट्या रामवर आला होता , त्याला अर्ध्या वेळ काम करून येणारा पगार पुरणारा न्हवता ,म्हणून सुट्टी संपली तरीही तो पूर्ण वेळ काम करीत होता.
“मुद्दाम रुमाल ठेवलास, का , कशासाठी , काही दिवसाने राज कोण आहे कळलच असत मला “ राम त्याचा आवाज शक्य तितका सौम्य ठेऊन बोलत होता.
“ राज, कोण हा राज “ जयाला काहीच समजत न्हवत.
“ते माझ्यापेक्षा जास्त तुला माहित असेल ना “ राम त्याची नजर तिच्याकडे रोखून म्हणाला.
“तू काय बोलतोयस , स्पष्ट बोल काय ते “ जया चिडून म्हणाली.
राम ने शांतपणे तो रुमाल काढला आणि तिच्या पुढे धरून त्यावरची इंग्रजी अक्षर जयाला दाखवली.
“ हा राज “ अस म्हणून जयाने कपाळावर हात मारला.
राम चम्त्कारीकपणे जयाकडे पाहू लागला .
“हे राज म्हणजे तू काय समजलास “ जया ने राम ला विचारल.
पोलिसांना बघून राम थोडा घाबरला , त्याला काही कळेना , घराबाहेर प्रचंड धूर त्यामुळे नीटस काही दिसत देखील न्हवत , तो भरभर चालत घराजवळ आला , आत घुसताच एका पोलिसाने त्याने अडवलं.
“ये पोरा , कुठ चालला”पोलिसाने त्याच्या खांद्याला धरून विचारल.
“का , माझ घर आहे हे “ राम पोलिसाकडे आश्चर्याने पाहू लागला.
“तुझ घर , मग तो मेलाय तो कोण तुझा “ पोलिसाने निर्विकार पणे विचारल.
बायडा दुसर्या दिवशीच पुन्हा सासरी निघून गेली, रामला कल्पना देखील न्हवती , तो तिला संध्याकाळी पुन्हा एकदा भेटून तिच्याशी सविस्तर बोलणार होता तिला समजवणार होता , रामने पुन्हा टेकडी जवळ केली, काहीही झाल तरी आपल दु:ख हे दुसऱ्या कुणालाही सांगायचं नाही ह्याची जणू त्याला सवयच झाली होती, पण कितीहि झाल तरी दु:खाचं ओझ पाठीमागे दडवून जरी आपण आयुष्य जगत राहिलो, कितीही उसण अवसान आणून आपण हसत राहिलो, खोट वागत राहिला तरी आपले डोळे आपली वेगळीच कथा सांगत असतात , आणि ते सर्वाना जरी नाही कळल तरी ज्या लोकांना आपली मनापासून काळजी आहे , किंवा ज्यांना आपल्यात स्वारस्य आहे त्यांना आपल्यातला हा बदल लगेच कळतो, रा
जयाला काही कळेना , रामने तिला कानातल्याचे जोड दिले होते , निळ्या रंगाच्या खड्याचे सोनेरी डूल होते ते, त्याला काही विचारव तर तो रस्ता ओलांडून पलीकडे निघून देखील गेला,
तिने ते जोड कोणालाही न दाखवता तिच्या दप्तरात तसेच ठेऊन दिले , तिच्या मनातली रामच्या बाबतीत वाटून राहलेली रागाची जागा आता कुतूहलाने घेतली होती .
विजय आणि राम पुढच शिक्षण आता कस घ्यायचं , कोणती साईट निवडायची आणि कामच काय करायचं ह्या विचारात होते , कारण दोघांनाही शिक्षणासोबत काम करणे अनिवार्य होत, विजय देखील कामला जाता याव म्हणूच रात्र शाळेत जायचा.
क्षमस्व, भाग दोन वेळा पोस्ट झाला .
आई गेल्या नंतर तीच दहाव झाल्यानंतर बाबू शाळेत आणि कामावर जाऊ लागला , सकाळी लौकर उठून तो सर्वांसाठी त्याच्या परीने जमेल तशी भाजी -चपाती बनवत असे , झेंडु त्याला चपात्या लाटायला , कांदे – टमाटे चिरून द्यायला मदत करी , तो तिला जास्त स्टोव्ह जवळ काम करू देत नसे,
तू चहा देखील मी घरात असेल तरच बनवायचा अस त्याने तिला ठाम बजावलं होत , सकाळीच दादा आणि बाबू कामावर गेल्यावर , झेंडु केर काढून फरशी साफ करी , सर्वांचे कपडे धुणे आणि रात्रीच जेवण बनवायचं काम बाबू आणि झेंडु दोघे मिळून रात्री करायचे , त्यामुळे एकट्या झेंडु वर आणि एकट्या बाबू वर घरातल्या सर्व कामाची जबाबदारी पडायची नाही.