बायडाला शोधाव कि काय कराव , तिला शोधायचं तर आता शेवटचा उपाय म्हणजे तिच्या मावशीच्या घरी वाकडला जाव लागणार , पण त्याला तिकडे जायची अजिबात इच्छा होईना , तो अस्वस्थ होता , पण काही करू हि शकत न्हवता,
दादांच्या जीवावरच संकट जरी टळल असल , तरी राम आणि झेंडू मात्र त्यांना पुन्हा कामावर जाऊ देईनात ,
दादाचं काम बंद म्हणजे साहजिकच सर्व घराचा भार हा एकट्या रामवर आला होता , त्याला अर्ध्या वेळ काम करून येणारा पगार पुरणारा न्हवता ,म्हणून सुट्टी संपली तरीही तो पूर्ण वेळ काम करीत होता.
त्याचा निकाल लागला , तो बारावीला फर्स्ट क्लासने पास झाला , त्याला पुढे शिकायचं होत , पण घरच्या अचानक आलेल्या जबाबदारी मुळे त्याने पुढच शिक्षण सुरु ठेवलं नाही.
खुपदा विजय त्याला घरी येऊन भेटून जाई , पण तरीही राम ने त्याचा निर्णय काही बदला नाही , विजयने त्याला कॉलेजला न जाता विद्यापीठा तून परीक्षा दे अस देखील सांगून पाहिलं , पण बायडाच्या अवस्थेला कदाचित तो कुठेतरी स्वतःला जबाबदार मनात होता , म्हणून त्याला काहीहि करायची इच्छा राहिली न्हवती, तो विजयला टाळू लागला , जयाची देखील भेट होऊ नये म्हणून , त्याने त्यांच्या घरी जाण कायमच बंद केल.
विजय मग एकटाच कॉलेजला दाखल झाला , जया देखील कॉलेजला जाऊ लागली तिने कला शाखा निवडली , अभ्यास चालू होता पण तिला रामची आठवण यायची, उठाव आणि तडक त्याच्या घरी जाऊन त्याला भेटाव अस खूपदा तिला वाटायचं पण विजयदादाला किंवा आईला कळल तर त्यांना काय वाटेल ह्याची तिला भीती वाटत होती.
तब्बल सहा महिने झाले तरी राम काही येऊन तिला भेटत न्हवता , आता तिला त्याचा राग येऊ लागला होता , न राहवून एकदा ती कॉलेज सुटल्यावर घरी न जाता परस्पर राम कडे गेली , अपेक्षे प्रमाणे राम तिला भेटला नाही, घरी दादा एकटेच होते , दादांनी तिची विचारपूस केल्यावर ती विजय ची धाकटी बहिण आहे आणि रामच एक पुस्तक तिच्या जवळ होत ते द्यायला ती आली आहे अस तीने सांगितलं , काही वेळ थांबून दादांशी थोड्या गप्पा मारून ती निघून गेली.
रात्री जेव्हा राम घरी आला , तेव्हा दादांनी त्याला जया येऊन गेल्याच सांगितलं आणि ते पुस्तक त्याच्या हाती दिल, दादांच्या तोंडून जयाच नाव ऐकताच तो दचकलाच पण त्याने ते दादांना जाणवू दिल नाही , त्याने ते पुस्तक दादांसमोर उघडून पाहिलं देखील नाही.
चार घास खाल्यावर , आणि सर्व निजानीज झाल्यावर दादांसमोर बेफिकीरीने खिडकी जवळ ठेवलेलं पुस्तक त्याने उचललं त्यावरून त्याने प्रेमाने हात फिरवला., त्याक्षणी त्याला जयाची प्रचंड आठवण आली , त्याने डोळे बंद केले , त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागल , तो तसाच खिडकी जवळ उभा होता , अचानक वीज कडाडली आणि अवेळी पाऊस सुरु झाला , त्याने ते पुस्तक उघडल , आत एक कविता त्याची वाट पाहत होती.
पाऊस
सुंदर पडणारा पाऊस आणि तुझी आठवण येते एकाचवेळी
पावसाच्या थेंबात चिंब होताना तुझ्या आठवणीने देखील मी चिंब होते.
सोबत येणार गारवा आणि मातीचा ओला सुगंध
आठवण करून देतो आपल्या जगलेल्या क्षणांची
आठवत ते बेधुंदपणे पाऊसात भिजणं ..छत्री असताना देखील ती न उघडणं
उगीच साचलेल्या पाण्यातून मी चालायचे अधिकाधिक चिंब होण्यासाठी
आताशा हे पावसाचं बरसण.. हे रडणंच जास्त वाटत.
कारण तो देखील मोकळा होत असतो
साचलेलं सगळं उधळत असतो ..
मी देखील साचलेय अशीच गेली कित्तेक दिवस..
पावसाला नाही लागत कुणाचा आधार… पण मी मात्र त्याचाच आधार घेते.
डोळ्यावर चेहऱ्यावर त्याला बरसू देते ..
खूप हलकं वाटत असं एकरूप झाल्यावर …
ओसरतात मनाचे कढ.. मनातला पाऊस थांबल्यावर .
कविता संपली त्याने पुस्तक बंद केल, त्याच्या पोटात काहीतरी तुटल्यासारख झाल , काहीतरी निसटतंय आपल्या हातून ह्याची जाणीव जणू त्याच काळीज पोखरत होती त्याने झोपण्यासाठी डोळे गच्च मिटून घेतले. , त्याला काहीही विचार करावासा वाटत न्हवता , कारण काहीही जरी विचार केला तरी त्याचा त्रास होणार आणि आपल्या निश्चया पासून आपण डगमगले जाऊ अशी भीती त्याला वाटत होती.
कवितेच्या मार्फत निरोप देऊन पण राम कडून काहीही हालचाल नाही म्हणून जया दिवसेंदिवस हतबल होऊ लागली. , ह्याला नक्की झालंय तरी काय , का हा आपल्याला इतका दुर्लक्षित करतोय , आणि ह्याला भेटाव तरी कस , घरी हा सापडणार नाही आणि सुट्टीच्या दिवशी मला घराबाहेर पडता येणार नाही , मग कस भेटायचं आता ह्याला , शेवटी तिने विजयदादाला सर्व सांगायचं ठरवलं , आणि एक दिवस आई घरात नसताना तिने त्याला सर्व काही सांगितलं , विजयदादा फारच समजूतदार होता , राम इतका चांगला मुलगा आहे , आणि म्हणूनच तो जयाला आवडला ह्यात त्याला काही नवल त्याला वाटल नाही , तो स्वत: जाऊन जयाचा निरोप रामला देणार होता .
सुट्टीच्या दिवशी विजय त्याला भेटायला गेला, रामला आता हा परत तेच बोलणार अस वाटल , पण विजय त्याला बाहेर चल म्हणाला, रामला काही अंदाज येईना पण जाणं तर भाग होत म्हणून दोघे सरळ दत्त मंदिरात गेले,
जया ने मला सर्व काही सांगितलं अशीच सुरुवात विजयने केली म्हटल्यावर विजय त्याला भेटायला का आला ह्याची कल्पना रामला आली, त्याला प्रथम जयाची कमालच वाटली कि तिने इतकी हिम्मत दाखवून विजयला सर्व काही सांगितलं ह्याच त्याला मोठ आश्चर्य वाटल.,पण अखेर आपण तिच्याजवळ काही पर्याय ठेवला नाही म्हणून तिला हे करायला आपणच भाग पाडलं ह्याची जाणीव देखील झाली.
विजयने जयाची अवस्था रामला सांगितली , जी रामला आधीच ठावूक होती , पण तरीही काहीतरी मनाशी ठरवून तो इतके दिवस गप्प होता ,
“काय झालय तू तिला का भेटत नाहीस"
“भेटून काही फायदा नाही विजय , म्हणून नाही भेटत”
“म्हणजे , मी समजलो नाही”
“म्हणजे, बायडा आलीये पुन्हा माझ्याकडे मी तिला नाही सोडू शकत” राम आयुष्यात पहिल्यांदा खोट बोलत होता , आणि ते देखील अत्यंत शांतपणे.
“कोण बायडा” विजय ने रामला रागाने विचारल .
“जयाला माहित आहे , तू तिलाच का नाही विचारत” राम त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाला.
“ का , तुला सांगायला लाज वाटते” विजय रामकडे नजर रोखून बोलत होता.
“हे बघ , विजय रागावू नकोस , पण अस समज माझा नाईलाज आहे “
“एखाद्याच आयुष्य उध्वस्त करण हा तुझा नाईलाज, अरे तुझ्यासाठी ती वेडी व्हायची बाकी राहिलीये फक्त , कळतंय का तुला”
“ जयाला सांग , विसरून जा सगळ , आयुष्यात एक राम नसेल तर काही आयुष्य संपत नाही , मी इतका महत्वाचा नाहीये , जर तिने खरच प्रेम केल असेल ना माझ्यावर , तर माझा विचार करण बंद कर म्हणाव आणि स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष दे , स्वता:च्या पायावर उभी राहा , काहीतरी मिळव आयुष्यात जे तिने ठरवलं होत ते ”
विजय पाहतच राहिला त्याला रामच्या डोळ्यात असहायता दिसली , तो पुढे राम ला काहीच बोलू शकला नाही , राम त्याच्या समोरून निघून गेला.
विजयदादा कडून रामचा निरोप मिळाल्यावर , आधी तर तिला विजयच्या बोलण्यावर विश्वासच ठेवावासा वाटत न्हवता , पण जेव्हा विजय ने बायडाच नाव घेतलं तेव्हा मात्र ती बिथरली , राम पुन्हा बायडा सोबत आहे ह्याची कल्पना करण देखील तिला शक्य न्हवत. , जयाला स्वता:चाच भयंकर राग येत होता , का आपण अश्या बिन भरवश्या माणसाच्या प्रेमात पडलो , का आपण त्याची इतकी वाट पाहत होतो , का आपण स्वतःलाच इतके फसवत होतो, जया खूप रडली , विजयदादा होता म्हणून ती कसबस स्वतः ला सावरू शकली नाहीतरी तिने तिच्या जीवाच देखील बरवाईट केल असत , रडून थकल्यावर काही वेळ ती नुसती बसून राहिली , मग अचानक उठून तिची कवितेची वही घेऊन ती मागच्या अंगणात गेली , मनावर दगड ठेऊन रामसाठी केलेल्या बऱ्याच कविता तिने फाडून टाकल्या आणि त्या कागदाच्या कापट्याना तिने पेटवल.
विजय पळतच मागच्या दारी आला , “काय करतेयस तू हे जया” अस तिला विचारल्यावर ,
“शेवट “ इतकच म्हणून ती आत निघून गेली.
दुसर्या दिवसा पासून जया कमालीची बदलली, तिने कॉलेजला जाताना छान सलवार कुडता घालायचं सोडून आईच्या साड्या नेसायला सुरुवात केली , केस चापून चुपून घट्ट बांधले , कानातले , गळ्यातल , बांगड्या काढून ठेवल्या , आधी सारख रंगबेरंगी ओढणी घेण , छान छान कानातले घालण आणि त्यातून पण रामने दिलेले कानातले सतत घालण तिने बंद केल , पण ते कानातले मात्र ती फेकून देऊ शकली नाही , तिने सांभाळून ठेवले , पण खूपच लपवून ठेवल्या सारखे चुकुन देखील तिच्या दृष्टीस पडू नयेत असे , आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिल, आठवणींचा त्रास होऊ नये म्हणून दिवसेंदिवस अभ्यास करू लागली , लायब्ररी मधून पुस्तक आणून भरपूर वाचन करू लागली , जेणे करून मेंदूवर ताण यावा आणि रात्रीची पडल्या पडल्या झोप लागावी , त्यातच तिला चष्मा देखील लागला , काळ्या जाड फ्रेमचा चष्मा तिने स्वतः साठी घेतला, त्या सर्व अवतारात ती वयाने खूपच मोठी दिसू लागली होती, कारण एकच तिला आता कश्यातच स्वारस्य वाटत न्हवत.
इथे रामची पण काही वेगळी परिस्थिती न्हवती ,बायडाचा जरी त्याने शोध घेण थांबवल असल तरी , त्या दिवशी दत्त मंदिरात तिच्या साठी प्रार्थना करताना त्याने मनाशी जो निश्चय केला होता त्यामुळे तो देखील मन मारून जगत होता, दिवसरात्र फक्त काम करत होता , घरासाठी राबत होता.
दहा वर्ष उलटली , जया बी.एड झाली, आणि एका शाळेत तीने शिकवायला सुरुवात देखील केली होती , विजयने देखील त्याच पदवी शिक्षण पूर्ण केल , आणि आता तो एका चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता त्याच्या लग्नासाठी मुलगी बघण चालू होत , जयासाठी देखील स्थळ शोधन सुरु झाल होत पण तिने आईला आणि विजयला निक्षून सांगितलं होत कि माझ्यासाठी स्थळ बघू नका , मी लग्न करणार नाही आणि जर माझ्यावर जबरदस्ती केलीत तर मी हे घर सोडून निघून जाईल , त्यामुळे सुशीलाबाई पुन्हा तो विषय तिच्यासमोर काढायला घाबरत होत्या.
राम त्याची सुतार कामाची नोकरी करता करता त्या कामात खूपच तरबेज झाला , तो आता सुतार कामाची कंत्राट घेऊ लागला , त्याच काम व्यवस्थित आणि वेळेत उरकणार होत , कामात तो प्रामाणिक असल्यामुळे त्याला कामे देखील चांगली येऊ लागली होती , दरम्यानच्या काळात त्याने झेंडूच लग्न लाऊन दिल , घर चांगल बांधल , घरात एक एक करून सर्व वस्तू घेतल्या , नवीन घरासाठी त्याने स्वत :नेच सुसज्ज फर्निचर बनवलं , घर सुंदर सजवलं. मोटारसायकल घेतली , घरकाम आणि जेवण बनवण्यासाठी घरात बाई ठेवली , दादा आता निवांत झाले होते , त्यांना फक्त आता रामने लग्न करून संसाराला लागायची आस होती , जी तो ऐकून देखील घेत न्हवता , दादांच्या नित्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नको म्हणून तो सतत फिरतीवर राहायचा , जेव्हा तो शिकत होता तेव्हा खरतर हे सुतारकाम त्याला कायमस्वरूपी करायचं न्हवत , आईची इच्छा पूर्ण करायची होती , त्याला खूप शिकून मोठा अधिकारी बनायचं होत , पण त्यावेळच्या परिस्तिथीमुळे त्याला शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यायला लागल होत , पण तरीही तो आता चांगले पैसे कामावत होता आणि त्याच्याकडे सर्व काही होत पण शिक्षण घेण्याच वय राहील न्हवत अस त्याला वाटे , हि खंत कायम त्याच्या मनावर कोरली गेली होती आणि त्याच्या मते ह्याला इलाज न्हवता .
विजयच लग्न ठरलं ,रामला लग्नाला बोलवावं अस त्याला मनापासून वाटत होत , पण जया रामला समोर बघून कशी वागेल हे त्याला सांगता येत न्हवत, म्हणून तो गप्प होता , आणि योगायोग म्हणावा कि काय विजयच्या होणार्या पत्नीचा म्हणजे हेमाचा भाऊ हा रामचा मित्र निघाला , म्हणून नवर्यामुली कडून तो त्या लग्नाला जाणार होता , पत्रिकेमध्ये त्याने नवऱ्यामुलाचे नाव विजय असे वाचले होते पण तरीही त्याच्या लक्षात आले नाही , जेव्हा तो लग्नाच्या हॉल मध्ये गेला तेव्हा लग्न लागत होत उभयतांच्या डोक्यावर अक्षता पडत होत्या , रामने विजयला ओळखल , त्याने आपल्याला पाहू नये म्हणून हेमाच्या भावाला कळण्याआधी त्याला तिथून बाहेर पडायचं होत , तो पटापट माणसांमधून वाट काढत बाहेरचा रस्ता शोधत असतानाच अचानक एका स्त्रीला तो धडकला ती बाई देखील घाईघाईत स्टेज जवळ जात होती म्हणून तीच देखील लक्ष न्हवत, त्याने माफ करा अस म्हणत त्या बाईकडे पाहिलं आणि पाहतच राहिला , हिरव्या साडीत , डोळ्यावर जाड आणि काळ्या फ्रेमचा चष्मा घातलेली जया उभी होती.
क्रमश :
हा ही भाग सुंदर
हा ही भाग सुंदर
पण आता ह्या कथेचा शेवट जवळ आला का अस वाटलं हा भाग वाचून,
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत नेहीप्रमाणेच
मस्त लिहिताय.
मस्त लिहिताय.
टिपिकल वळणावर आली कथा
टिपिकल वळणावर आली कथा