“मुद्दाम रुमाल ठेवलास, का , कशासाठी , काही दिवसाने राज कोण आहे कळलच असत मला “ राम त्याचा आवाज शक्य तितका सौम्य ठेऊन बोलत होता.
“ राज, कोण हा राज “ जयाला काहीच समजत न्हवत.
“ते माझ्यापेक्षा जास्त तुला माहित असेल ना “ राम त्याची नजर तिच्याकडे रोखून म्हणाला.
“तू काय बोलतोयस , स्पष्ट बोल काय ते “ जया चिडून म्हणाली.
राम ने शांतपणे तो रुमाल काढला आणि तिच्या पुढे धरून त्यावरची इंग्रजी अक्षर जयाला दाखवली.
“ हा राज “ अस म्हणून जयाने कपाळावर हात मारला.
राम चम्त्कारीकपणे जयाकडे पाहू लागला .
“हे राज म्हणजे तू काय समजलास “ जया ने राम ला विचारल.
“राज म्हणजे असेल कोणीतरी तुझा “ राम ला पुढे काय बोलावे हे सुचेना .
“कोण माझा मित्र,किं प्रियकर “जया ने वाक्य पूर केल .
“हो , म्हणजे तसच काही “ राम शांतपणे म्हणाला .
हे बघ Ra – म्हणजे राम मधला Ra आणि J म्हणजे जया मधला j अस ते “Raj” स्वतःच्या हाताने मी बनवलं होत आणि ते ठेवलं होत तुझ्याघरी मुद्दाम ”
“हो का , मी उगीच काहीतरी बोललो, पण मला वाटल अस कि “ राम ओशाळला.
“कि जया ला कोणीतरी दुसर भेटलं.”
“छे छे ,अस काही नाही , मला तस न्हवत म्हणायचं”
“असुदे रे,समजल, हेच ओळखलस ना मला , मी बोलते एक आणि करते दुसरे “ जया खोट खोट रागवत म्हणाली.
“चुकलो, चुकलो,” राम ने अक्षरशः कान पकडले .
त्याच ते तस माफी मागताना पाहून जयाला हसू आल , तीच ते खळखळणार मुक्त हास्य पाहून राम ला बर वाटल , तो टक लाऊन तिच्याकडे पाहू लागला , त्याच्या त्या तश्या बघण्यामुळे ती हसायची थांबली आणि तिने तिची नजर तिच्या कवितेच्या वही कडे फिरवली , तिची अर्धी राहिलेली कविता पूर्ण करून तिने ती राम कडे दिली , राम कविता वाचू लागला .
विश्वास
दोघां मधल नात जोडणारा विश्वास
दोघां मधल नात तोडणारा विश्वास
दोघां मध्ये हरणारा विश्वास
आनंदात सामावून घेणारा विश्वास
दु:खातही साथ देणारा विश्वास
गैरसमजुतीच्या सागरात बुडणारा विश्वास
माणसाची ओळख ठेवणारा विश्वास
माणसाची ओळख पुसणारा विश्वास
आयुष्यभर दुनियेशी लढणारा विश्वास
आहे हा विश्वास विश्वाचा श्वास
असते प्रत्येकाला त्याचीच आस
शंभर भेटींमधून निर्माण होणारा विश्वास
आणि एका दुर्दैवी क्षणाने उडून जाणारा विश्वास
कविता वाचून राम वरमला “जिथे प्रेम आहे तिथे विश्वास तर हवाच, आणि जर तो नसेल तर आपल प्रेम नक्की आहे ना कि फक्त जया ला आपल्या बद्दल प्रेम वाटत म्हणून मग आपल्याला तिच्याबद्दल प्रेम वाटतंय ,” राम मनातल्या मनात सर्व विचार करत असतानाच ,
जया ने त्याच्या खांद्यावर डोक ठेवलं , “ नको इतका विचार करूस , आहे तुझ पण प्रेम माझ्यावर, माहित आहे मला , मला नाही वाईट वाटल , उलट बर वाटल आणि ह्या राज मुळे निदान कळाल तरी , तू माझा थोडासा तरी विचार करतोस ते आणि ह्याच समाधान वाटतंय मला ”
राम काहीच बोलला नाही , पण त्याचे डोळे भरून आले , जया त्याच्या जवळ गेली अगदी जवळ तिने आपले ओठ रामच्या डोळ्यांवर ठेवले आणि त्याचे ओघळलेले अश्रू तिने तिच्या ओठांनी टिपून घेतले. “हे बघ खाल्ल तुझ मीठ, आता पुन्हा अविश्वास नको दाखवूस हा माझ्यावर ”
तिच्या त्या कृतीमुळे राम ला हसू आल . त्याने तिचा तो रुमाल पुन्हा खिशात टाकला आणि तिचा निरोप घेऊन तो निघाला .
घरात आता बर्यापैकी दुःखाच सावट निवळल होत , झेंडू आता पहिल्यासारखी हसून खेळून राहून लागली होती , तिला बघून दादा पण सावरले होते , रामची परीक्षा जवळ आली होती म्हणून एकतर तो टेकडीवर नाहीतर विजयच्या घरी सतत जाऊ लागला, जया देखील राम ने समजावल्यामुळे मन लाऊन अभ्यास करीत होती , अभ्यासातल्या शंका कधी विजयला तरी रामला विचारात होती , तिला तस अभ्यास करताना बघून विजय आणि सुशीला बाई नी सुटकेचा निश्वास टाकला.
परीक्षा झाली तिघांना पेपर चांगले गेले , सुट्ट्या पडल्या , जया सुट्टीत तिच्या आत्याच्या घरी गेली, राम आता पूर्ण वेळ कामावर जाऊ लागला , विजय ने देखील त्याची आहे ती दुपारची शिफ्ट न बदलता , सकाळी एका केमिस्ट च्या दुकानात काम सुरु केल , काही दिवस अभ्यास करताना एकत्र असणारे हे तिघे आता त्यांची तोंड तीन दिशेला झाली.
एक दिवस दादांना कामावर अस्वस्थ वाटू लागल म्हणून ते दुपारीच घरी आले , रात्री जेव्हा राम घरी आला तेव्हा दादांना अस अवेळी झोपलेलं बघून त्याला थोड विचित्र वाटल , त्याने जवळ जाऊन दादांच्या कपाळाला हात लावला , ताप न्हवता पण ते शांत पण काहीसे विचित्र झोपलेले वाटत होते , त्याने दादांना हाक मारली , एकदा , दोनदा, तीनदा , मग हाकेचा सपाटा सुरु झाला पण काहीच प्रतिक्रिया नाही.
झेंडू देखील घाबरली ती म्हणाली “हे दुपार पासून असेच झोपलेत , मी संध्याकाळी चहा साठी उठवत होते पण ते उठले नाही मला वाटल गाढ झोप लागली असेल पण काय झालंय नक्की दादांना ते उठत का नाहीयेत, दादा , दादा , उठा ना“
झेंडू त्यांना गदागदा हलवीत होती , उठवत होती , रडत होती , रामने तिला तसच दादांकडे ठेऊन डॉक्टरांकडे धाव घेतली.
डॉक्टरांनी त्यांना तपासल आणि तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करायला सांगितलं , दादांना हृदयविकाराचा झटका आला होता ,
दादांवर उपचार चालू झाले पण ते शुद्धीवर येत न्हवते, राम हॉस्पिटल मध्येच बसून होता , रात्रंदिवस दादांची शुद्धीवर येण्याची वाट पाहत , झेंडू यायची काही वेळ रडत बसायची , पण तो तिला घरी जायला सांगायचा , तो स्वतः देखील प्रचंड मानसिक तणावाखाली होता , ते एक सरकारी रुग्णालय होत , म्हणून तिथे खूप प्रकारच्या रुग्णांची ये –जा होती , राम तिथेच बसून राही , त्याला आता दादांना गमवायच न्हवत , त्याला वाटायचं एक क्षण जरी आपण दादांपासून दूर गेलो, आणी त्यांना काही झाल तर कोण धावपळ करेल ,रुग्णांचे नातेवाईक जिथे थांबत तिथेच तो थांबे , तिथेच थोडावेळ आडवा पडे , थोडफार खाई नाहीतर दिवस दिवस उपाशी राही.दादांच्या विवंचनेत त्याची तहानभूक सार काही हरपल होत.
एक दिवस घाई गडबडीत एक तातडीची केस हॉस्पिटल मध्ये दाखल झाली, राम तिथेच बसून होता , रुग्णाचे नातेवाईक धावपळ करीत वार्ड मध्ये जा- ये करत होते , रुग्ण एक बाई होती , आणि तिने जाळून घेतलं होत , अचानक त्या माणसांमध्ये रामला दत्तू दिसला बायडाचा लहान भाऊ ,
राम ने त्याला हाक मारली , “ काय झाल रे , कोणी ओळखीच आहे का “
दत्तू उदास चेहऱ्याने नुसता राम कडे पाहत बसला.
“अक्का “ इतकच त्याच्या तोंडून निघाल ,
“कोण “ राम गडबडला ,
“बायडा,अक्का “ दत्तू ने पुन्हा सांगितलं .
“काय झाल तिला” राम ने उद्विग्नपणे विचारल.
“जळाली ती” दत्तू ने रडवेल्या डोळ्यांनी उत्तर दिल,
रामच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आसपासच जग विरळ होतंय असा भास होऊ लागला , डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, , कसबस स्वतःला सावरत तो उठला आणि आणि त्या वार्डच्या दिशेने जाऊ लागला.
जळालेल्या रुग्णांच्या वार्ड समोर येताच त्याला तिच्या बेड भोवती डॉक्टर, नर्स, तिच्या घरचे असे खूप लोक भोवती दिसले , त्याला लगेचच तिच्या जवळ जाऊन तिला पाहता येईना , तो काही वेळ तिथेच थांबला.
हळू हळू गर्दी पांगली , तो धीर करून पुढे झाला, त्याच संपूर्ण शरीर थरथरत होत त्याने बायडाला पाहिलं.
बायडाचा चेहरा विद्रूप दिसत होता , रामचा मेंदू बधीर झाला , रक्त जागीच गोठतंय अस त्याला जाणवलं , त्याला रडायचं होत पण त्याला ते हि जमेना तो तसाच बेडला धरून उभा होता, ती अजूनही शुद्धीवर न्हवती ,
त्याने तिला हाक मारली पण कसलाही प्रतिसाद नाही , तिचा हात हातात घेऊन तो थोपटू लागला , त्त्याच काळीज खूप जड झाल होत , काही वेळ बसून तो उठला आणि जायला निघाला त्यावेळी तिचा हात हलला , ती क्षीण आवाजात कन्हली, राम ने तिला पुन्हा आवाज दिला , बायडाने डोळे किलकिले केले ती त्याच्या कडे बघून थोडीशी हसली.
“ हे काय झालंय तुझ “ राम ने दुखावलेल्या स्वरात विचारल.
“ नशीब माज” बायडाने तो शब्द मोठ्या कष्टाने उच्चारला.
“कोणी केल ”
“मीच घेतलं जाळून “ बायडा त्याच्याकडे पाहून म्हणाली पण तिला जास्त बोलवेना तिचे डोळे झाकू लागले.
एक नर्स शेजारी आली तिने निर्विकार पणे तिने बायडाच्या दंडात इंजेक्शन दिल आणि ती निघून गेली, बायडा झोपली, जड पावलांनी राम देखील तिथून निघाला , स्वतःशीच विचार करत तो दादांच्या वार्ड जवळ आला ,
एक नर्स त्याच्याजवळ आली “ अहो , कुठे जाता तुम्ही , कधीचे शोधतोय आम्ही तुम्हाला ,तुमचा पेशंट”
“पेशंट , काय झाल त्यांना “ नर्सच वाक्य तोडत राम म्हणाला.
“अहो , शुद्धीवर आलेत ते “ अस म्हणून ती निघून गेली.
राम ने समाधानाने डोळे मिटले , आणि मनोमन ईश्वराचे आभार मानले , त्याने दादांकडे धाव घेतली , दादा त्याला बघून पहलकेच हसले .
राम ला कळत न्हवत दादा शुद्धीवर आलेत त्याचा आनंद व्यक्त करावा कि बायडाच्या अवस्थेच दु:ख कराव.
त्याने घरी जाऊन झेंडूला सांगितलं, आणि तो दत्त मंदिरात गेला , देवा समोर हात जोडून त्याने मनातल्या मनात बायडासाठी प्रार्थना केली, आणि काहीतरी मनोमन निश्चय करून तो तिथून बाहेर पडला,
अजून पाच दिवसांनी डॉक्टर दादांना घरी पाठवणार होते ,
बायडा वर इलाज अजूनही चालू होते तीला भेटायला तो पुन्हा गेला नाही , त्याला ते जमल नाही , पण दादांना घरी घेऊन जाताना मात्र तिला एकदा भेटाव म्हणून तो तिच्या वार्ड मध्ये गेला तर पाहतो तर बायडा तिकडे न्हवती त्याने नर्स कडे चौकशी केली,
“त्या बाई ला तर तिचे नातेवाईक रात्रीच घेऊन गेले, बरच सांगून पाहिलं , अस मधेच घेऊन जाऊ नका , डॉक्टर परवानगी नाही देणार , त्यांची अवस्था अजूनही गंभीर आहे , पण ते लोक ऐकायलाच तयार नाही , शेवटी तिच्या नवर्या कडून आम्ही लेखी लिहून घेतलं आणि मग दिला डिस्चार्ज , आम्ही तरी कुठे कुठे बघणार , पन्नास पेशंट दिवसाला येतात , कोणाच काय तर कुणाच काय “ अस अन्खंड बडबडून ती नर्स निघून गेली ,
राम ला काही कळेना , त्यादिवशी तर दत्तू व्यतिरिक्त कोणीही दिसलं नाही अगदी तिचा नवरा सुहास देखील नाही , पण हे लोक आले आणि तिला घेऊन पण गेले , घरी जाऊन भेटाव का एकदा .
त्याच संध्याकाळी तो बायडाच्या घरी जायला निघाला , काही वर्षांपूर्वी बायडाच्या मावशीच्या घरी घडलेल्या प्रसंगानंतर , राम कधीही आबांना किंवा तिच्या भावांना भेटला न्हवता ,तिच्या घराच्या आसपास फिरकला देखील न्हवता , खूप दिवसांनी त्याजागी जाताना त्याला पुन्हा त्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या , पावलं जड होवू लागली, परत इथून फिरावं अस वाटू लागल , पण बायडाची विचारपूस करण पण गरजेच होत , पण नुसत्या चौकशी ने देखील काय फरक पडणार होता , ती तिच्या आयुष्याच अस काही करून घेईल अस तर कधी स्वप्नात देखील वाटल न्हवत, ती जे म्हणत होती ते पण तर शक्य न्हवत आपल्याला , तीच लग्न झाल्यावर तिला तिच्या मुला सकट कस सांभाळणार होतो , आपल नक्की काय चुकल, तिला समजवायला हव होत , पण ती संधी तरी कुठे दिली तिने आपल्याला , निघून गेली लगेच , बायडा आता जिथे कुठे असेल तिथे चांगली असुदे , ती असेल ना , बायडा जिवंत असेल ना , त्या विचाराने त्याला एकदम हरल्यासारख वाटू लागल. त्या दिवशी दत्त मंदिरात आपण जे मनोमन ठरवलं , ते आयुष्यात भर लक्षात ठेवणार आहोत आणि त्यावर कायम राहणार आहोत , हीच आपली शिक्षा , बायडा सोबत जे झाल त्याला तर आपण आता नाही बदलू शकत , पण...... स्वतःशीच बोलत असताना तो बायडाच्या घरी कधी येऊन पोहोचला हे त्याला समजल देखील नाही.
त्याने घरात डोकवून पाहिलं घरात आबा , तिचे दोन्ही भाऊ ह्या पैकी कोणीही न्हवत , त्याने आबांना आवाज दिला तर आतून एक अनोळखी बाई त्याच्या समोर आली .
“आबा , शंकर्या , दत्तू , कोणी आहे का घरात “ रामने त्या बाईला विचारल.
“घर इकल तेंनी आमाला, कोण र बाबा तू “ त्या बाई नी रामला खालून वर निरखून पाहत विचारल .
“घर विकल , कधी “
“सा –सात , महीन झाल असत्याल”
“सहा – सात महिने , आता कुठे राहतात ते “
“ते काय ठाव न्हाय, कोण इचारत बसतय, आमचा यवहार झाला , आमच काम संपल,”
राम पुढे काही न बोलता तिथून निघाला, ती बाई त्याला त्याच नाव विचारीत होती , पण तो थांबला नाही.
क्रमश:
वाचतोय.
वाचतोय.
राम हे पात्र छान रंगवले आहे .
राम हे पात्र छान रंगवले आहे . जरा सुखाची झुळुक आली तोच काहीतरी गडबड होते आहे त्याच्या आयुष्यात !
थोडी वाट पाहावी लागली ह्या
थोडी वाट पाहावी लागली ह्या भागासाठी, पण नेहमीसारखाच अप्रतिम भाग.
एखाद्या सामान्य माणसाच्या जीवातील चढ-उतार, एकेका प्रसंगातून सुंदर मांडलेत