Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
long I stood And be one traveler
-------Robert Frost
"So many worlds, so much to do, so little done, such things to be."
—Alfred Lord Tennyson
Everything that can possibly happen does happen.
मित्रांनो ऐन दिवाळीतील घटना, सर जॉनी इंग्लिश, सर ऑस्टिन पॉवर्स आणि माननीय जेम्स बाँड यांना दिवाळीच्या फराळाला आपला लाडका भारतीय गुप्तहेर बबन बोंडे यांनी अर्थातच अत्यंत गुप्तपणे बोलावलेलं नसेल तरच नवल होतं. बबनची माजी गर्लफ्रेंड प्रियांका मस्का (जीने जणू काही भारतात श्रीमंत आणि वीर परंतु बुटके पुरूष अजिबात नाहीतच अशा अविर्भावात एका बुटक्या अमेरिकन माणसाशी लग्न केले, अशी माहिती विकिपीडिया वरती उपलब्ध आहे. असो.) तिने आपल्या बबनशी जरी लग्न नाही केलं तरी ती आजही बबनला दिवाळीचे फराळाचे पदार्थ पाठवते याचं कारण म्हणजे तिच्यावर असलेले संस्कार मुख्य म्हणजे ती स्वतःच्या हातांनी करून पाठवते.
नमस्कार , मी सदाशिव रामेश्वर कर्णिक , वय वर्ष चाळीस , मी विवाहित आहे आणि दोन मुलींचा बाप देखील ,खूप पैसेवाला जरी नसलो तरी पोटापुरत आणि कधीमधी मुलींची आणि बायकोची हौस पुरवण्या इतपत कमावतो , हि झाली माझी जुजबी ओळख, काय म्हणता काम काय करतो , काही विशेष नाही ओ एक सामान्य सेल्समन आहे एका कपड्याच्या दुकानात , आणि हो माझ स्वतःच एक घर देखील आहे , वडिलोपार्जित असल तरी स्वतःच , भाड्याच नाही , तीच एक गोष्ट आहे जी मी नेहमी अभिमानाने सांगतो, हे सगळ मी तुम्हाला का सांगतोय , काही महिन्यांपूर्वी माझ आयुष्य हे अगदी सरळमार्गी होत , पण मंडळी मला एक तुम्हाला देखील विचारावस वाटत आपल्याला कधी कधी आपल्याच स
कॉफी कमी पडली की, मन प्रचंड रिसेप्टिव्ह होउन जातं. तरल-भावुक. मग लॅपटॉपवर, कीबोर्डच्या वरच्या रिकाम्या जागेत ठेवलेल्या , इवल्याश्या निळ्या व पांढर्या रंगांच्या शिंपल्यांच्या डब्याही कशा एकमेकांशी गप्पा मारणार्या सख्या वाटू लागतात. टेबलवरचे बांबूचे रोपटे, आपल्याला त्याच्या मनातील अलवार गूज सांगते आहे असे वाटू लागते. आणि हे सारे केव्हा आता ..... पहाटेच्या तीन-चार वाजता. जेव्हा आख्खे शहर निद्राधिन झालेले आहे, सारे शहर अमूर्त मनाच्या राज्यातून फेरफटका मारीत आहे. स्वप्नांच्या अगणित पालख्या, मिरवणुका निघालेल्या आहेत, काही भरजरी, डौलदार, दिमाखदार तर काही शांत, प्रार्थनेसारख्या.
पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची.
एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?"
माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला. नंतर," तुझ्या पणज्याचं वय किती?" हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकलं.
बाहुली – कुट्टीची गोष्ट
"अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा दत्ता ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता गिलास |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा विलास ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होत्या पिना |
भुलोजीला लेक झाली , नाव ठेवा मीना ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होतं कॅलेंडर |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा अलेक्झांडर ||
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.