घाबरट
Submitted by निशा राकेश on 12 October, 2022 - 07:17
नमस्कार , मी सदाशिव रामेश्वर कर्णिक , वय वर्ष चाळीस , मी विवाहित आहे आणि दोन मुलींचा बाप देखील ,खूप पैसेवाला जरी नसलो तरी पोटापुरत आणि कधीमधी मुलींची आणि बायकोची हौस पुरवण्या इतपत कमावतो , हि झाली माझी जुजबी ओळख, काय म्हणता काम काय करतो , काही विशेष नाही ओ एक सामान्य सेल्समन आहे एका कपड्याच्या दुकानात , आणि हो माझ स्वतःच एक घर देखील आहे , वडिलोपार्जित असल तरी स्वतःच , भाड्याच नाही , तीच एक गोष्ट आहे जी मी नेहमी अभिमानाने सांगतो, हे सगळ मी तुम्हाला का सांगतोय , काही महिन्यांपूर्वी माझ आयुष्य हे अगदी सरळमार्गी होत , पण मंडळी मला एक तुम्हाला देखील विचारावस वाटत आपल्याला कधी कधी आपल्याच स
विषय:
शब्दखुणा: