कथाशंभरी - हतबल - गीत

Submitted by गीत१७ on 7 September, 2022 - 16:29

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.
बाजूच्या अंगणात आलेल्या रघु ला पाहून सगळ्या विस्मृती जाग्या झाल्या. आपण यात कधीही एकटे नव्हतोच, का आपली प्रिय मैत्रीण अशी अचानक लपाछपीचा डाव सोडून परत कधी खेळायला आलीच नाही याच उत्तर आज मिळालं होत. अंगात त्या दिवसासारखीच भीती, चीड, घृणा, संताप दाटला होता. पण आज हि त्या अगदी तश्याच २० वर्षांपूर्वीच्या चिमुकल्यांसारख्या हतबल होत्या. जे झाले होते ते ह्याच वाड्यात सोडून, ज्या तोंडाने त्याच्यावर थुंकावेसे वाटत होते त्याच तोंडाने त्याला "रघु अण्णा बरे ना" विचारून त्या आपआपल्या घरी परतल्या.

Group content visibility: 
Use group defaults