कथाशंभरी - पुणे- रायगड

Submitted by रायगड on 8 September, 2022 - 04:30

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. "अरे हे काय .....पाणी पूलावरूनही गेले की! आपल्या वेळचा लाकडी पूलही राहिला नाही!" जुन्या पूलाच्या जागी आधुनिक पूल बांधला होता.
"आपल्यावेळचा पूल नाही आणि आपले पुलं पण नाही उरले", दुसरीने खंत व्यक्त केली. "आपल्यावेळचं पुणं राहिलं नाही, खरं!"

"वॉव! हे लेटेस्ट टॉय पुण्यात घेतलंस?", बाजूला खेळत असलेल्या पहिलीच्या पाच वर्षीय नातवाने दुसरीच्या ३ वर्षीय नातवाला विचारले.
"हो", चितळे टॉय स्टोअरमधून”.
"ऑसम! नाऊ यू गेट दीस लेटेस्ट मॉडेल्स इन पुणे! आमच्यावेळचं पुणं राहिलं नाही आता", पाच वर्षीय उद्गारलं!

Group content visibility: 
Use group defaults

Lol

अवांतर - शीर्षक वाचून मला रायगड आयडी नाव आहे हे पटकन लक्षात न आल्याने मी कथेत पुणे-रायगड काय संदर्भ आहे हे शोधत होतो Proud

मस्त Proud