काव्यलेखन

विशुद्ध

Submitted by अपूर्व जांभेकर on 4 April, 2023 - 04:28

स्वप्नं आळशी असतात... आपणहून कुठे जात-येत नाहीत
मुद्दामून तर कधीच पडत नाहीत...

खूप चलाख असतात स्वप्नं...
आलंच कुणाच्या मनात फार... तर करतात झोपेत, बंद डोळ्यांपर्यंतचा प्रवास
बघणाऱ्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे आणि स्वप्नांच्या एकंदरीतच मूडनुसार,
असमांतर संदर्भ, गडद-फिकट, चित्र-विचित्र, स्पष्ट-अस्पष्ट
काळी-पांढरी, करडी, क्वचितच रंगीत दृश्य, उमटत राहतात त्रिमितीच्याही पार! - काळत्रिज्येला छेदून!

जाणिवा

Submitted by पुरंदरे शशांक on 3 April, 2023 - 01:51

जाणिवा

डोळे जाणतीना काही
व्योम अफाट केवढे
दिसे पटलावरी ते
पाहूनीच धन्य होते

गंध फुलांचा मोहक
जरी जाणिवा सजग
जग सुगंधाचे थोर
काय जाणवे सलग !

स्पर्श रुप रस गंध
जाणिवेत मावेना की
एका सानुल्या देहात
लाभे जरासी झुळुकी

विश्व होऊनिया जरी
भोगे विशाल सोहळे
थिटी जाणिव फाटता
माझे मीपण मावळे
----------------------------------------

व्योम......आकाश, अंतराळ
पटल.....मानवी डोळ्याच्या आतील पडदा ज्यावर प्रतिमा उमटते/रेटिना
थिटी.... मर्यादित, क्षुद्र

देहाच्या कविता

Submitted by चौबेजी on 27 March, 2023 - 23:29

संथ लयीच्या पठारावर
मध्येच एखादं टेकाड उगवावं
तसे हळूच हिंदकळणारे
चुकार श्वास...
थोडे शहारे टिपत
थोडे रोमांच पेरत
खिडकीतल्या गुलमोहरालासुद्धा
ऐकू जातील
न जातीलशा ठहरावात
एकमेकांच्या देहभर लिहिलेल्या
स्पर्शाच्या धिम्या कविता

निज थोडं निवांत

Submitted by sanjana25 on 24 March, 2023 - 15:41

विसर आता वेड्या मना
सांजवेळेची धुसर खुण
लगोलग सोडव ती कोडी
थोडं कर स्वत: वर ऋण
निशेची हाक ऐकू येतेय
पण तू मग्न आहेस किती
जणू स्वत:च्याच महालात
हरवण्याची सारखी भीती
नको जागू जास्त उगीच
निज आता दिस सरला
नवे प्रश्न उद्भवण्यास
बघ थोडाच अवधी उरला
काल परवा सुद्धा तर तू
असाच अस्वस्थ झोपलास
मनमुरादपणे सांग जरा रे
शेवटचे कधी तू जगलास?
आज पण झोपणार नाहीस
आहे मज खात्रीशीर खंत
जर शांत झालास तर
कधीतरी निज थोडं निवांत

तुझी आठवण कधी निखारा.

Submitted by deepak_pawar on 24 March, 2023 - 12:17

तुझी आठवण कधी निखारा
कणकण कणकण जळते आहे
तुझी आठवण कधी पसारा
भरभर भरभर भरते आहे.

तुझी आठवण रंग नभीचे
तुझी आठवण गंध कळीचे
तुझी आठवण फुल बनुनी
हरपल हरपल फुलते आहे.

तुझी आठवण सलता वारा
तुझी आठवण चढता पारा
तुझी आठवण कधी सरींनी
झरझर झरझर झरते आहे.

तुझी आठवण अंधार रात
तुझी आठवण चांदणं गीत
तुझी आठवण दिप बनुनी
क्षण क्षण क्षण क्षण जळते आहे.

वैखरी कैसेंनि सांगें!

Submitted by स्वाती_आंबोळे on 21 March, 2023 - 12:36

काल गप्पांच्या पानावर झालेल्या एका चर्चेत संत ज्ञानेश्वरांच्या 'पांडुरंगकांती' अभंगाचा विषय निघाला होता, त्यावरून हे स्फुट लिहिण्याचं धाडस करत आहे.

अगा जे घडिलेची नाही

Submitted by अनन्त्_यात्री on 21 March, 2023 - 08:47

एके दिवशी- दुसर्‍या प्रहरी- नेत्र उघडला तिसरा
मितीत चवथ्या- झालो दाखल - थाट तेथला न्यारा
पाचावरती धारण बसली - षट्चक्रे लडखडली
सप्तरंग मिसळले वर्णपटी- श्वेतप्रभा लखलखली
अष्टसिद्धी प्रगटल्या परंतु नवविध भक्तिस भुलल्या
अनाहताच्या अनुनादाने - दाही दिशा कोंदल्या

आले कसे डोळ्यात पाणी.

Submitted by deepak_pawar on 17 March, 2023 - 11:58

आले कसे डोळ्यात पाणी ऐकुनी माझी कहाणी
का काळजी वाटे तुला ही सांग ना तू आज राणी.

डोळ्यातुनी या आसवा आता कशाला ढाळशी तू
वेडे कशी तू विसरली मी पोळलो तुझिया झळांनी.

आता कशाची टोचणी ही लागली तुझिया मनाला
तेव्हा कशाला वाट माझी सजवली तू कंटकांनी.

आली जरीही रात आता भारुनी अंधार सारा
माझ्या तरी या अंबराला उजळले या चांदण्यांनी.

मी चालताना वाट ती हातात होता हात जेव्हा
ती वाट काट्यांची तरीही बहरली होती फुलांनी.

माझ्या बाबाची तुळस

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 March, 2023 - 09:56

अंगणात वृंदावन
त्यात तुळस देखणी
वारीयाने पान हाले
विठ्ठलाचे संकिर्तनी

जरी बाबा परलोकी
येतो पहाटे उठोनी
प्रात:स्नान उरकोनी
घाली तुळसीला पाणी

मग जागतो मुकुंद
दारी वाजता मृदंग
बाबा नाचतो अंगणी
मुखी तुक्याचा अभंग

असे रोजचेच चाले
बाबा विठूसंगे डोले
बघताच तुळसीला
मन वारकरी झाले

पान तुळसा माईचे
बाबा प्रसाद सेवतो
दुःख सागर संसार
विठू पैलतीरा नेतो

तोच क्रम रोजचाच
परी उत्साह आगळा
तुळसीच्या वृंदावनी
वेणूनादी घननीळा

शब्दखुणा: 

उंच मनोरे कोसळताना

Submitted by द्वैत on 14 March, 2023 - 13:27

उंच मनोरे कोसळताना
क्षितिज सरकते सावध मागे
लाट उसळते काठावरती
अन खडकांना करते जागे

निळ्याजांभळ्या कल्लोळातून
प्रवासपक्षी परतून येतो
पिवळ्या पानांचा पाचोळा
वाऱ्यावरती उडू पाहतो

वाट पुसटशी दुरून बघते
ओल्या वाळूचे हळवेपण
आणि किनारा मिटून डोळे
कसा मुक्याने खचतो कणकण

सूत्र कोणते सांगत नाही
दुःख कुणाचे कुणास सलते
गिळून अश्रूंच्या पागोळ्या
दंवभाराने पाते हलते

द्वैत

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन