देहाच्या कविता

Submitted by चौबेजी on 27 March, 2023 - 23:29

संथ लयीच्या पठारावर
मध्येच एखादं टेकाड उगवावं
तसे हळूच हिंदकळणारे
चुकार श्वास...
थोडे शहारे टिपत
थोडे रोमांच पेरत
खिडकीतल्या गुलमोहरालासुद्धा
ऐकू जातील
न जातीलशा ठहरावात
एकमेकांच्या देहभर लिहिलेल्या
स्पर्शाच्या धिम्या कविता

Group content visibility: 
Public - accessible to all site users