काल गप्पांच्या पानावर झालेल्या एका चर्चेत संत ज्ञानेश्वरांच्या 'पांडुरंगकांती' अभंगाचा विषय निघाला होता, त्यावरून हे स्फुट लिहिण्याचं धाडस करत आहे.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
लहानपणची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई / आजी म्हणायची - आज कोणीतरी पाहुणा येणार रे ... मी विचारायचो - तुला काय माहित ? त्यावर उत्तर यायचे - हा काय कावळा ओरडतोय ना !! त्याला बरोबर ठाऊक असते कुठल्या घरी पाहुणा येणार ते.. तो बरोब्बर त्या घरापाशीच जाऊन ओरडणार मग ...
माझं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ कोण बरं येणार आज पाहुणा ?? या विचारात छान मजेत जायचा ...
माझ्या सौ. आईने लिहीलेले संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आधारीत काव्यमाले मधून काही पंक्ती मी इथे मांडत आहे. आपला आभिप्राय स्प्रुहणीय आहे.
